Home / महाराष्ट्र / Husband VS Wife: पत्नीच्या दहशतीत पती? पत्नीनेच पतीवर ओतलं उकळत तेल;

Husband VS Wife: पत्नीच्या दहशतीत पती? पत्नीनेच पतीवर ओतलं उकळत तेल;

Husband VS Wife : पती पत्नीच्या (Husband and Wife) अतूट प्रेमाविषयी आपण बऱ्याचवेळेला ऐकतो. पती पत्नीमधील वाद कोणालाच सुटले नाही...

By: Team Navakal
Husband VS Wife

Husband VS Wife : पती पत्नीच्या (Husband and Wife) अतूट प्रेमाविषयी आपण बऱ्याचवेळेला ऐकतो. पती पत्नीमधील वाद कोणालाच सुटले नाही पण या या वादाला आता नवीन वळण येताना दिसत आहेत. अश्यातच आता दिल्लीच्या (Delhi)आंबेडकर नगर भागातील मदनगिरी परिसर पहाटे तीनच्या सुमारास एका पुरुषाच्या आरोळ्या-किंचाळ्यां ऐकू येत होत्या. शेजारी लगेचच आवाजाच्या दिशेने धावले. एक व्यक्ती खूप गंभीररित्या भाजली गेली होती. त्याच्या अंगावर गरम तेल (Bolied Oil) आणि तिखट टाकण्यात आले होते. आणि हे सगळं कारस्थान त्याच्याच बायकोने केले होते.

एका औषधनिर्मिती कंपनीत काम करणाऱ्या दिनेश या २८ वर्षीय तरुणावर त्याच्याच पत्नीने पहाटे तीनच्या सुमारास उकळत तेल आणि तिखट टाकल. हे कमीच कि काय यावर तिने त्याला धमकावलं देखील; जास्त आरडाओरडा केला तर आणखीन गरम तेल अंगावर ओतेने. यामध्ये दिनेशचा चेहरा आणि अंगावर २० टक्के भाजण्याच्या जखमा देखील आहेत. सध्या दिनेशवर राजधानीतील सफदरजंग रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याची बायको साधनावर आंबेडकरनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनेशने दिलेल्या जवाबामध्ये तो सांगतो रात्री खोलीत तो झोपला असताना काहीतरी गरम द्रव अंगावर पडल्याच त्याला जाणावल. त्यामुळे तो उठला असता साधना त्याच्या अंगावर उकळत तेल आणि तिखट टाकत असल्याचे त्याला दिसले. तो वेदनेने विव्हळत होता. त्याने यावर प्रतिकार करत ओरडण्याचा प्रयत्न केला त्यावर जास्त ओरडलास तर आणखी गरम तेल अंगावर ओतीन, अशी धमकी साधनाने दिल्याचे दिनेश म्हणाला.

वेदनेच्या भारत दिनेश किंचाळला. त्यांच्या ओरडण्याचा आवाज एकूण घरमालक आणि त्याची मुलगी दोघेही वरच्या मजल्यावर धावले. परंतु साधनाने खोलीचा दरवाजा बंद केला होता. घरमालकाने आरडाओरडा केल्यानंतर दोघेही बाहेर आले परंतु साधना विरुद्ध दिशेने निघून गेली. शेवटीघरमालकाने रिक्षा करून दिनेशला रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांकडून समोर आलेल्या माहितीनुसार दिनेश आणि साधना यांच्या लग्नाला आठ वर्षे झाली आहेत. त्यांच्यात वादविवाद होत असतात. एकदा पोलिसांनी दोघांनाही समज देऊन सोडून दिले होते. मात्र, त्यानंतर साधनाने हे टोकाचे पाउल उचले. तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही पोलिस म्हणाले.


हे देखील वाचा –

Kartik Month Rules: कार्तिक महिन्यात कोणते दान सर्वश्रेष्ठ मानले जाते? जाऊन घ्या दीपदान का करावे..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या