Home / लेख / दिवाळी धमाका! Yamaha च्या बाईक्स-स्कूटर्सवर हजारो रुपये डिस्काउंट; पाहा ऑफर्स

दिवाळी धमाका! Yamaha च्या बाईक्स-स्कूटर्सवर हजारो रुपये डिस्काउंट; पाहा ऑफर्स

Yamaha Bikes Diwali Offers: दिवाळीच्या निमित्ताने नवीन बाईक अथवा स्कूटर्स खरेदी करायची असल्यास तुमच्याकडे चांगली संधी आहे. यामाहा कंपनी आपल्या...

By: Team Navakal
Yamaha Bikes Diwali Offers

Yamaha Bikes Diwali Offers: दिवाळीच्या निमित्ताने नवीन बाईक अथवा स्कूटर्स खरेदी करायची असल्यास तुमच्याकडे चांगली संधी आहे. यामाहा कंपनी आपल्या मोटरसायकल आणि स्कूटर्स वर आकर्षक सवलती देत आहे. या सवलती 31 (Thirty-One) ऑक्टोबर 2025 पर्यंत संपूर्ण भारतात लागू आहेत.

या ऑफर्समध्ये ग्राहकांना आकर्षक सूट, कॅशबॅक आणि विमा लाभ अशा सुविधांचा समावेश आहे. जर तुम्ही या दिवाळीत यामाहाची बाईक किंवा स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

यामाहाच्या जवळपास सर्वच मॉडेल्सवर भरघोस डिस्काउंट देण्यात येत आहे.

यामाहाच्या गाड्यांवरील दिवाळी ऑफर्स

मॉडेल/रेंजजीएसटी लाभविमा लाभकॅशबॅकएकूण बचत
Yamaha FZ रेंज12,058 रुपये6,501 रुपये5,000 रुपये18,559 रुपयांपर्यंत
Yamaha R15 रेंज (R15 V4, R15S)3,999 रुपये3,999 रुपयांपर्यंत
Yamaha MT-15 Version 2.03,999 रुपये3,999 रुपयांपर्यंत
Yamaha RayZR 125 Fi Hybrid7,325 रुपये3,799 रुपये2,000 रुपये13,124 रुपयांपर्यंत
Yamaha Fascino 125 Fi Hybrid8,536 रुपये1,999 रुपये10,535 रुपयांपर्यंत

यामाहा FZ रेंज

यामाहा एफझेड रेंजच्या मोटरसायकलवर 12,058 रुपयांपर्यंतचा जीएसटी लाभ आणि 6,501 रुपयांपर्यंतचा पॉलिसी लाभ दिला जात आहे. यामुळे एफझेड रेंजवर ग्राहकांना एकूण 18,559 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे.

यामाहा RayZR आणि Fascino स्कूटर

यामाहाच्या स्कूटरवरही आकर्षक डिस्काउंट आहे. RayZR 125 Fi Hybrid स्कूटरवर 7,325 रुपयांपर्यंतचा जीएसटी लाभ, 3,799 रुपयांपर्यंतचा विमा लाभ आणि 2,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळत आहे. तर Fascino 125 Fi Hybrid स्कूटरवर 8,536 रुपयांपर्यंतचा जीएसटी लाभ आणि 1,999 रुपयांपर्यंतचा विमा लाभ दिला जात आहे.

यामाहा आर15 (R15) आणि एमटी-15 (MT-15) रेंज

यामाहा आर15 रेंजमधील R15 V4 आणि R15S या दोन्ही मॉडेल्सवर 3,999 रुपयांपर्यंतचा पॉलिसी लाभ दिला जात आहे. तसेच, यामाहा एमटी-15 व्हर्जन 2.0 वर देखील 3,999 रुपयांपर्यंतचा विमा लाभ उपलब्ध आहे.

अतिरिक्त लाभ आणि खास ऑफर्स

यामाहा एफझेड रेंजची मोटरसायकल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काही निवडक डीलरशिपवर 5,000 रुपयांपर्यंतचा त्वरित कॅशबॅक मिळत आहे. काही डीलरशिप 10 वर्षांची मोफत वॉरंटी देखील देत आहेत.

हे देखील वाचा – ‘ही’ आहे देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार, किंमत तब्बल 87,700 रुपयांनी झाली कमी; वाचा सविस्तर

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या