Home / लेख / ChatGPT Go भारतीयांसाठी 1 वर्षासाठी मोफत; कसा मिळेल फ्री ॲक्सेस? जाणून घ्या

ChatGPT Go भारतीयांसाठी 1 वर्षासाठी मोफत; कसा मिळेल फ्री ॲक्सेस? जाणून घ्या

ChatGPT Go Free : भारतात AI चॅटबॉट्सचा वापर करणाऱ्या कोट्यवधी युजर्ससाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. आपल्या ChatGPT या चॅटबॉटमुळे...

By: Team Navakal
ChatGPT Go
Social + WhatsApp CTA

ChatGPT Go Free : भारतात AI चॅटबॉट्सचा वापर करणाऱ्या कोट्यवधी युजर्ससाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. आपल्या ChatGPT या चॅटबॉटमुळे जगभरात ओळख निर्माण करणाऱ्या OpenAI कंपनीने, सर्वाधिक प्रतिसाद देणाऱ्या भारतीय बाजारासाठी मोठी घोषणा केली आहे.

कंपनीने आपली प्रगत आणि सशुल्क (Paid) असलेली ‘Go’ आवृत्ती भारतात पूर्ण 1 वर्षासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. या खास ऑफरचा लाभ 4 नोव्हेंबर पासून सुरू झाला आहे.

भारतीयांकडून ChatGPT ला मिळणारा जबरदस्त प्रतिसाद आणि उत्साह पाहून OpenAI प्रभावित झाली आहे. भारतात सशुल्क सदस्य एका महिन्यातच दुप्पट झाले होते. यामुळे कंपनीने ‘DevDay Exchange’ इव्हेंटच्या निमित्ताने ही खास सवलत जाहीर केली आहे.

ChatGPT Go मध्ये कोणते प्रगत फीचर्स मिळतील?

‘Go’ आवृत्ती ही मोफत (Free) व्हर्जनपेक्षा अधिक चांगली आहे, कारण ती OpenAI च्या लेटेस्ट GPT-5 मॉडेलवर चालते. ही आवृत्ती प्रामुख्याने विद्यार्थी, डेव्हलपर्स आणि व्यावसायिकांसाठी डिझाइन केलेली आहे. या आवृत्तीमुळे वापरकर्त्यांना खालील प्रगत फायदे मिळतील:

  • वाढलेली मेसेज मर्यादा: रोजच्या संवादासाठी (चॅटिंगसाठी) संदेश पाठवण्याची मर्यादा वाढवली आहे.
  • प्रगत क्षमता: दीर्घ मेमरीसह जटिल प्रश्नांवर अधिक जलद आणि अचूक प्रतिसाद मिळतो.
  • फाइल सपोर्ट: यात इमेज जनरेशनसुविधा उपलब्ध आहे. तसेच, महत्त्वाची डॉक्युमेंट्स आणि इतर फाइल्स अपलोड करून त्यांचे विश्लेषण करण्याची सोय उपलब्ध आहे.

ChatGPT Go मोफत कसे मिळवाल?

या विशेष ऑफरचा लाभ घेण्यासाठी यूजर्संनी विशिष्ट मर्यादित वेळेत नोंदणी करणे आवश्यक आहे.

जे यूजर्स या प्रमोशनल कालावधीदरम्यान ChatGPT Go साठी नवीन नोंदणी करतील, त्यांना पुढील 365 दिवसांसाठी (1 वर्षासाठी) ही सेवा विनामूल्य मिळेल.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जे यूजर्स सध्या ‘ChatGPT Go’ चे सशुल्क सदस्य आहेत, त्यांनाही या मोफत सेवेचा लाभ घेता येणार आहे. यूजर्स चॅटजीपीटीवर लॉगइन करून ChatGPT Go मोफत वापरू शकता.

हे देखील वाचा – बजेट 5G स्मार्टफोनची प्रतीक्षा संपली! अवघ्या 11 हजारात लाँच झाला Vivo चा फोन; पाहा फीचर्स

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या