Home / देश-विदेश / Delhi Blast:कारमध्ये शक्तिशाली स्फोट! दिल्ली हादरली ! 8 जणांचा मृत्यू! मुंबईसह देशभर अलर्ट

Delhi Blast:कारमध्ये शक्तिशाली स्फोट! दिल्ली हादरली ! 8 जणांचा मृत्यू! मुंबईसह देशभर अलर्ट

Delhi Blast- दिल्लीतील लाल किल्ला परिसरात एका कारमध्ये (Delhi Blast)जबरदस्त स्फोट झाला. या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला, तर 31...

By: Team Navakal
Delhi Blast
Social + WhatsApp CTA

Delhi Blast- दिल्लीतील लाल किल्ला परिसरात एका कारमध्ये (Delhi Blast)जबरदस्त स्फोट झाला. या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला, तर 31 जण जखमी झाले आहेत. स्फोटाचे कारण स्पष्ट झालेले नाही. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. स्फोटानंतर दिल्ली, मुंबई, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आजच हरियाणाच्या फरिदाबादमध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी छापा टाकून साडेतीनशे किलो ज्वलनशील पदार्थ आणि शस्त्रे पकडली होती.

संध्याकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 च्या पार्किंगजवळ कारमध्ये हा भीषण स्फोट झाला. ही कार उभी होती की, चालती होती, हे कळू शकलेले नाही. या स्फोटानंतर मोटारीने पेट घेतला. ही आग इतकी वेगाने पसरली की जवळच उभ्या असलेल्या आणखी 8 ते 10 वाहनांनी पेट घेतला. स्फोटानंतरचे इथले दृश्य भीषण होते. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी सांगितले की, स्फोटानंतर मोठा आवाज झाला. आजूबाजूच्या इमारती हादरल्या. त्यांच्या काचा तुटल्या. गाड्यांचे पत्रे आणि मानवी अवयव आणि मांसाचे तुकडे उडून दूरवर पडले. स्फोट होताच परिसरातील लोक आणि दुकानदारांचा मोठा गोंधळ उडून पळापळ झाली.
या स्फोटानंतर पोलिसांनी दिल्लीतील चांदणी चौकासह अनेक महत्त्वाचे बाजार बंद करत पोलिसांनी परिसराला वेढा घातला. अग्निशमन दलाने अर्ध्या तासात वाहनांना लागलेली आग  विझवली.  काही वेळातच फॉरेन्सिक टीम पोहोचली आहे. त्यानंतर एनएसजी आणि एनआयएची पथकेही घटनास्थळी पोहोचली. जखमींना लोक नारायण जनप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिल्लीत 14 वर्षांनी मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. यापूर्वी 2011  मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 15 लोक मृत्युमुखी पडले होते. स्फोटानंतर केंद्रीय गृहमत्री अमित शहांनी दिल्ली पोलीस आयुक्त आणि गुप्तचर विभागांच्या प्रमुखांना फोन करून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांना फोन करून घटनेचा आढावा घेतला. अमित शहा या घटनेबद्दल बोलताना म्हणाले की, आय-20 कारमध्ये हा स्फोट झाला. त्यामुळे काही लोकांचा मृत्यू झाला तर काही जखमी झाले आहेत. आम्ही या स्फोटामागच्या सर्व शक्यता तपासू आणि सखोल तपास करू.

दिल्ली पोलीस आयुक्तांनी सांगितले की, आज 6.22 मिनिटांनी एका संथ गतीने सिग्नलकडे जात असलेल्या मोटारीत हा स्फोट झाला. सध्या सगळ्या सरकारी यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या असून त्यांनी तपास सुरू आहे. आम्ही गृहमंत्र्यांना याची माहिती सतत पुरवत आहोत. स्फोट झालेली कार मोहम्मद सलमानच्या नावावर नोंदणीकृत असून, त्याला गुरुग्राम पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सलमानने सांगितले की, ही कार अंबाला येथे देवेंद्र या व्यक्तीला विकली होती. पोलीस आता खरेदीदाराचा शोध घेत आहेत.
रात्री 9.30 वाजता अमित शहा लोक नारायण जनप्रकाश रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यासोबत त्यांनी डॉक्टर आणि पोलीस अधिकार्‍योसोबत चर्चा देखील केली. त्यानंतर रुग्णालयात पत्रकारांना त्यांनी सांगितले की, मला रुग्णालयातील डॉक्टरांनी 8 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले असून, याप्रकरणी उद्या सकाळी मी वरिष्ठ अधिकार्‍यांना गृहमंत्री मंत्रालयात बैठक घेणार आहे. सध्या हा दहशतवादी हल्ला आहे की नाही हे आता सांगू शकत नाही. मात्र आम्ही चौकशीत सर्व पैलू तपासणार आहे. त्यानंतर रात्री 10.20 वाजता ते घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.  

रात्री 9.42 वाजता या घटनेबद्दल नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले की, दिल्लीत झालेल्या स्फोटात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. गृहमंत्री अमित शहा आणि इतर अधिकार्‍यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला. दिल्लीत हा स्फोट होण्याच्या आधी आज सकाळी घातपाताचा एक मोठा कट उघडकीस आला. हरियाणाच्या फरिदाबादमध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी छापा टाकून अल फलाह वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहातील एका डॉक्टरच्या खोलीत सुमारे 360 किलो अमोनियम नायट्रेट हा ज्वलनशील पदार्थ, दोन रायफली, एक पिस्तुल, रिमोट, वॉकीटॉकी आणि स्फोटके बनवण्याचे अन्य साहित्य आढळल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी जम्मू काश्मीरच्या साहरनपूर येथून त्याच्या आणखी एका डॉक्टर साथीदाराला अटक केली. तिसरा डॉक्टर साथीदार फरार आहे. लखनौमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय स्फोटाने उडवून लावण्याचा दहशतवाद्यांचा कट होता, असे म्हटले जात आहे.  ही खोली मुजाहीद शकील नावाच्या डॉक्टरने भाड्याने घेतली होती. खोलीत तो एकटाच रहात होता.

इस्लामिक स्टेट (आयएसआयएस) आणि जैश ए महंमद या दहशतवादी संघटनांसाठी काम करणारे काही लोक घातपाताचा कट आखत असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून फरीदाबाद, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर पोलीस त्यांचा शोध घेत होते. या मोहिमेदरम्यान जम्मू -काश्मीरच्या अनंतनागमधून काही दिवसांपूर्वी डॉ. आदिल याला अटक करण्यात आली होती. त्याने दिलेल्या माहितीवरून हरियाणा आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी राबवलेल्या धाडसत्रात  7 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथून डॉ. मुजम्मिल याला अटक करण्यात आली. त्यानंतर डॉ. आदिल यानेच दिलेल्या माहितीवरून पोलिसांच्या पथकाने आज फरिदाबादमधील अल फलाह वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरच्या खोलीवर धाड टाकली. अमोनियम नायट्रेट हा एक ज्वलनशील पदार्थ असून त्याचा वापर स्फोटके बनवण्यासाठी केला जातो, असे पोलिसांनी सांगितले.दिल्लीतील लाल किल्ला परिसरात एका कारमध्ये जबरदस्त स्फोट झाला. या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला, तर 31 जण जखमी झाले आहेत. स्फोटाचे कारण स्पष्ट झालेले नाही. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. स्फोटानंतर दिल्ली, मुंबई, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आजच हरियाणाच्या फरिदाबादमध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी छापा टाकून साडेतीनशे किलो ज्वलनशील पदार्थ आणि शस्त्रे पकडली होती.

संध्याकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 च्या पार्किंगजवळ कारमध्ये हा भीषण स्फोट झाला. ही कार उभी होती की, चालती होती, हे कळू शकलेले नाही. या स्फोटानंतर मोटारीने पेट घेतला. ही आग इतकी वेगाने पसरली की जवळच उभ्या असलेल्या आणखी 8 ते 10 वाहनांनी पेट घेतला. स्फोटानंतरचे इथले दृश्य भीषण होते. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी सांगितले की, स्फोटानंतर मोठा आवाज झाला. आजूबाजूच्या इमारती हादरल्या. त्यांच्या काचा तुटल्या. गाड्यांचे पत्रे आणि मानवी अवयव आणि मांसाचे तुकडे उडून दूरवर पडले. स्फोट होताच परिसरातील लोक आणि दुकानदारांचा मोठा गोंधळ उडून पळापळ झाली.
या स्फोटानंतर पोलिसांनी दिल्लीतील चांदणी चौकासह अनेक महत्त्वाचे बाजार बंद करत पोलिसांनी परिसराला वेढा घातला. अग्निशमन दलाने अर्ध्या तासात वाहनांना लागलेली आग  विझवली.  काही वेळातच फॉरेन्सिक टीम पोहोचली आहे. त्यानंतर एनएसजी आणि एनआयएची पथकेही घटनास्थळी पोहोचली. जखमींना लोक नारायण जनप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिल्लीत 14 वर्षांनी मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. यापूर्वी 2011  मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 15 लोक मृत्युमुखी पडले होते. स्फोटानंतर केंद्रीय गृहमत्री अमित शहांनी दिल्ली पोलीस आयुक्त आणि गुप्तचर विभागांच्या प्रमुखांना फोन करून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांना फोन करून घटनेचा आढावा घेतला. अमित शहा या घटनेबद्दल बोलताना म्हणाले की, आय-20 कारमध्ये हा स्फोट झाला. त्यामुळे काही लोकांचा मृत्यू झाला तर काही जखमी झाले आहेत. आम्ही या स्फोटामागच्या सर्व शक्यता तपासू आणि सखोल तपास करू.

दिल्ली पोलीस आयुक्तांनी सांगितले की, आज 6.22 मिनिटांनी एका संथ गतीने सिग्नलकडे जात असलेल्या मोटारीत हा स्फोट झाला. सध्या सगळ्या सरकारी यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या असून त्यांनी तपास सुरू आहे. आम्ही गृहमंत्र्यांना याची माहिती सतत पुरवत आहोत. स्फोट झालेली कार मोहम्मद सलमानच्या नावावर नोंदणीकृत असून, त्याला गुरुग्राम पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सलमानने सांगितले की, ही कार अंबाला येथे देवेंद्र या व्यक्तीला विकली होती. पोलीस आता खरेदीदाराचा शोध घेत आहेत.
रात्री 9.30 वाजता अमित शहा लोक नारायण जनप्रकाश रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यासोबत त्यांनी डॉक्टर आणि पोलीस अधिकार्‍योसोबत चर्चा देखील केली. त्यानंतर रुग्णालयात पत्रकारांना त्यांनी सांगितले की, मला रुग्णालयातील डॉक्टरांनी 8 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले असून, याप्रकरणी उद्या सकाळी मी वरिष्ठ अधिकार्‍यांना गृहमंत्री मंत्रालयात बैठक घेणार आहे. सध्या हा दहशतवादी हल्ला आहे की नाही हे आता सांगू शकत नाही. मात्र आम्ही चौकशीत सर्व पैलू तपासणार आहे. त्यानंतर रात्री 10.20 वाजता ते घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.  

रात्री 9.42 वाजता या घटनेबद्दल नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले की, दिल्लीत झालेल्या स्फोटात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. गृहमंत्री अमित शहा आणि इतर अधिकार्‍यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला. दिल्लीत हा स्फोट होण्याच्या आधी आज सकाळी घातपाताचा एक मोठा कट उघडकीस आला. हरियाणाच्या फरिदाबादमध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी छापा टाकून अल फलाह वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहातील एका डॉक्टरच्या खोलीत सुमारे 360 किलो अमोनियम नायट्रेट हा ज्वलनशील पदार्थ, दोन रायफली, एक पिस्तुल, रिमोट, वॉकीटॉकी आणि स्फोटके बनवण्याचे अन्य साहित्य आढळल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी जम्मू काश्मीरच्या साहरनपूर येथून त्याच्या आणखी एका डॉक्टर साथीदाराला अटक केली. तिसरा डॉक्टर साथीदार फरार आहे. लखनौमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय स्फोटाने उडवून लावण्याचा दहशतवाद्यांचा कट होता, असे म्हटले जात आहे.  ही खोली मुजाहीद शकील नावाच्या डॉक्टरने भाड्याने घेतली होती. खोलीत तो एकटाच रहात होता.

इस्लामिक स्टेट (आयएसआयएस) आणि जैश ए महंमद या दहशतवादी संघटनांसाठी काम करणारे काही लोक घातपाताचा कट आखत असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून फरीदाबाद, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर पोलीस त्यांचा शोध घेत होते. या मोहिमेदरम्यान जम्मू -काश्मीरच्या अनंतनागमधून काही दिवसांपूर्वी डॉ. आदिल याला अटक करण्यात आली होती. त्याने दिलेल्या माहितीवरून हरियाणा आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी राबवलेल्या धाडसत्रात  7 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथून डॉ. मुजम्मिल याला अटक करण्यात आली. त्यानंतर डॉ. आदिल यानेच दिलेल्या माहितीवरून पोलिसांच्या पथकाने आज फरिदाबादमधील अल फलाह वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरच्या खोलीवर धाड टाकली. अमोनियम नायट्रेट हा एक ज्वलनशील पदार्थ असून त्याचा वापर स्फोटके बनवण्यासाठी केला जातो, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या