Home / मनोरंजन / Dharmendra Passes Away : सहा दशक गाजवणारा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड; वयाच्या ८९ वर्षी घेतला जगाचा निरोप

Dharmendra Passes Away : सहा दशक गाजवणारा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड; वयाच्या ८९ वर्षी घेतला जगाचा निरोप

Dharmendra Passes Away : तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर राज्य गाजवणारा बॉलिवूडचा (Bollywood) लाडका ही मॅन (He Man) धर्मेंद्र (Dharmendra) यांनी...

By: Team Navakal
Dharmendra Passes Away
Social + WhatsApp CTA

Dharmendra Passes Away : तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर राज्य गाजवणारा बॉलिवूडचा (Bollywood) लाडका ही मॅन (He Man) धर्मेंद्र (Dharmendra) यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीत होणाऱ्या बीघाडामुळे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील (Mumbai News) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरू होते. तब्येत खालावल्यामुळे धर्मेंद्र (Actor Dharmendra) यांना साधारणतः बारा दिवसांसाठी रुग्णालयात दाखल केलं गेलं होत. त्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. त्यानंतर ते घरीच होते. पण, अखेर त्यांच्या जुहूतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या प्रकृती बाबत वेगवेगळ्या बातम्या माध्यमांमध्ये आधीच पसरत होत्या. अनेक अफवाही या दरम्यान पसरलेल्या. अवघ्या अर्ध्या तासांतच धर्मेंद्रयांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मोठ्या मुलाकडून सनी देओलकडून त्यांना मुखाग्नी देण्यात आला.

धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी ब्रिटिश भारतातील पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नसराली या गावी झाला होता. आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नसेल की, त्यांचं खरं नाव केवल कृष्ण देओल असं होतं. पण, सिनेसृष्टीत त्यांची ओळख धर्मेंद्र अशीच राहिली. त्यांचा जन्म एका सर्वसामान्य पंजाबी जाट कुटुंबात झाला होता. धर्मेंद्र यांनी लुधियानातील लालटन कलान येथील सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेत शिक्षण घेतलेलं. त्यांचे वडील गावातील शाळेचे मुख्याध्यापक होते.

धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा, आमिषा पटेल, रितेश देशमुख यांसारख्या स्टार्सनी रुग्णालयात जाऊन त्यांची याआधी भेट घेतली होती. धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘सत्यकाम’, ‘सीता और गीता’ यांसारखे अनेक गाजलेले चित्रपट केले.


हे देखील वाचा –

Google Maps : सहलीचे नियोजन करत आहात का? गुगल मॅप्सने काही नवीन टूल्स लाँच केले आहेत जे तुमचा वेळ आणि पैसा वाचवू शकतात.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या