Home / महाराष्ट्र / Devendra Fadnavis On Election Results : नगर परिषद निवडणुकांच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; एक्स पोस्ट करत व्यक्त केला आनंद..

Devendra Fadnavis On Election Results : नगर परिषद निवडणुकांच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; एक्स पोस्ट करत व्यक्त केला आनंद..

Devendra Fadnavis On Election Results : पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. सर्वोच्च न्यायालयात...

By: Team Navakal
Devendra Fadnavis On Election Results
Social + WhatsApp CTA

Devendra Fadnavis On Election Results : पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हापरिषदा, ग्रामपंचायती, महानगरपालिकांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, अनुक्रमे २ डिसेंबर आणि २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली गेली.

आणि आता या मतमोजणीत भाजपा आणि महायुतीला घवघवीत यश मिळायचे दिसून येत आहे. तर महाविकास आघाडीचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. दरम्यान या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आणि आता या निकालावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट केली आहे.

काय म्हणले देवेंद्र फडणवीस ?
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डाजी आणि भाजपा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीनजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण तसेच सर्व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपा नंबर १ ठरला आहे! सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि मतदारांचे अनेक अनेक आभार, आता विकास अजून अविरत होईल. असा विश्वास त्यांनी या पोस्टच्या माध्यमांतून व्यक्त केला आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या