Home / News / North Indians Demand OBC Quota : मुंबईतील उत्तर भारतीयांची ओबीसी आरक्षणाची मागणी

North Indians Demand OBC Quota : मुंबईतील उत्तर भारतीयांची ओबीसी आरक्षणाची मागणी

North Indians Demand OBC Quota in Mumbai – मुंबई आणि आसपासच्या महानगरपालिकांमध्ये उत्तर भारतीय मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे.त्यामुळे उत्तर भारतीयांची...

By: Team Navakal
North Indians Demand OBC Quota in Mumbai
Social + WhatsApp CTA


North Indians Demand OBC Quota in Mumbai – मुंबई आणि आसपासच्या महानगरपालिकांमध्ये उत्तर भारतीय मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे.त्यामुळे उत्तर भारतीयांची मते मिळवण्यासाठी सर्वच पक्षांत चढाओढ सुरू आहे.

अशातच शिंदेंच्या शिवसेनेच्या उत्तर भारतीय ओबीसी विभागाच्या बैठकीत महाराष्ट्रात आपल्याला ओबीसी दर्जा द्या,अशी मागणी करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे शिंदेसेनेचे प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीचा सकारात्मकदृष्ट्या विचार केला जाईल,असे आश्वासन दिले आहे.


शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी ही माहिती दिली.ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उत्तर भारतीय ओबीसी समाजाची महापंचायत झाली. उत्तर भारतातून ओबीसी समाजाचे २२ प्रतिनिधी या महापंचायतीला उपस्थित होते. उत्तर भारतीय ओबीसी समाजामध्ये अनेक संघटना आहेत.त्यांचे सर्वांचे दुःख आणि समस्या सारख्याच आहेत.

संपूर्ण उत्तर भारतीय ओबीसी म्हणून सामुहिक लढा उभारण्याचे मी आवाहन केले.महाराष्ट्रात आम्हाला ओबीसी दर्जा आणि त्यानुसार नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळावी ही आमची प्रमुख मागणी आहे. आम्ही त्याबद्दल एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली.त्यांनी याबाबत सकारात्मक पाऊल उचलू,असे आश्वासन दिले असे निरुपम यांनी सांगितले.


हे देखील वाचा-

नवी मुंबई विमानतळाने घेतली पहिली व्यावसायिक उड्डाणाची झेप; भारतीय विमानवाहतूकीसाठी नवा अध्याय

नांदेडमध्ये चार जणांचा रहस्यमय मृत्यू; नांदेडमधील धक्कादायक घटना

Varsha Gaikwad: ‘ठाकरे बंधूंनी आम्हाला विचारात घेतले नाही’; मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा, वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केली भूमिका

Web Title:
संबंधित बातम्या