Home / महाराष्ट्र / Municipal Corporation Election 2026 : निवडणुकांआधीच महायुतीचा गुलाल! राज्यातील 8 महापालिकांमध्ये 22 उमेदवार बिनविरोध; भाजपची मोठी मुसंडी

Municipal Corporation Election 2026 : निवडणुकांआधीच महायुतीचा गुलाल! राज्यातील 8 महापालिकांमध्ये 22 उमेदवार बिनविरोध; भाजपची मोठी मुसंडी

Municipal Corporation Election 2026 : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून प्रत्यक्ष मतदानापूर्वीच महायुतीने विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली...

By: Team Navakal
Municipal Corporation Election 2026
Social + WhatsApp CTA

Municipal Corporation Election 2026 : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून प्रत्यक्ष मतदानापूर्वीच महायुतीने विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान राज्यातील 8 महत्त्वाच्या महापालिकांमध्ये एकूण 22 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागांवर यश मिळवत विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

महायुतीची जोरदार कामगिरी

आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, बिनविरोध निवडून आलेल्या 22 उमेदवारांपैकी भाजपचे सर्वाधिक 12 उमेदवार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे 7 उमेदवार विजयी झाले असून, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अहिल्यानगरमध्ये 2 जागांवर बिनविरोध यश मिळवले आहे.

मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचा 1 उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. विशेष म्हणजे, कल्याण-डोंबिवली महापालिकेत (KDMC) भाजप-शिवसेना युतीने 9 जागा जिंकून सत्तास्थापनेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे.

कल्याण-डोंबिवली आणि जळगावात वर्चस्व

कल्याण-डोंबिवलीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या रणनीतीमुळे महायुतीला मोठे यश मिळाले आहे. येथे भाजपच्या रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर, ज्योती पाटील आणि मंदा पाटील या पाच महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्या आहेत. शिवसेनेकडून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी आणि हर्षल मोरे यांनी बाजी मारली आहे.

जळगावातही शिंदे गटाने 3 जागांवर वर्चस्व राखले असून गौरव सोनवणे, मनोज चौधरी आणि प्रतिभा देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे.

धुळे, पनवेल आणि अहिल्यानगरचे चित्र धुळे महापालिकेत भाजपने आपले वर्चस्व कायम राखत 3 जागा खिशात घातल्या आहेत. यामध्ये उज्ज्वला भोसले, ज्योत्स्ना पाटील आणि सुरेखा उगले यांचा समावेश आहे. पनवेलमध्ये नितीन पाटील आणि भिवंडीत सुमित पाटील (माजी राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे) बिनविरोध निवडून आले आहेत.

अहिल्यानगरमध्ये अजित पवार गटाचे कुमार वाकळे आणि प्रकाश भागानगरे विजयी झाले आहेत. दरम्यान, अहिल्यानगरमध्ये मनसेचे दोन उमेदवार बेपत्ता झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला असून, राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.

अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title:
संबंधित बातम्या