Home / महाराष्ट्र / Ajit Pawars Mother : आईपासून सत्य लपवण्याचा प्रयत्न… पण मायेपुढे सारेच अपुरे! अजितदादांच्या निधनानंतर पवार कुटुंब कोलमडल

Ajit Pawars Mother : आईपासून सत्य लपवण्याचा प्रयत्न… पण मायेपुढे सारेच अपुरे! अजितदादांच्या निधनानंतर पवार कुटुंब कोलमडल

Ajit Pawars Mother : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाने अवघा महाराष्ट्र हळहळत असताना, बारामतीतील त्यांच्या फार्म हाऊसवरून अत्यंत...

By: Team Navakal
Ajit Pawars Mother
Social + WhatsApp CTA

Ajit Pawars Mother : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाने अवघा महाराष्ट्र हळहळत असताना, बारामतीतील त्यांच्या फार्म हाऊसवरून अत्यंत हृदयद्रावक माहिती समोर आली आहे. आपल्या लाडक्या पुत्राच्या निधनाची बातमी ऐकून ८० वर्षांच्या मातोश्रींची काय अवस्था होईल, या भीतीने तेथील कर्मचाऱ्यांनी सत्य लपवण्यासाठी केलेली धडपड आणि आपल्या मुलाला भेटण्यासाठी व्याकुळ झालेल्या आईची ओढ, हे सर्व पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले आहेत.

टीव्हीची केबल तोडली, मोबाईल ‘फ्लाईट मोड’वर टाकला
फार्म हाऊसचे व्यवस्थापक संपत धायगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता अजितदादांच्या आई टीव्ही पाहत बसल्या होत्या. साडेआठच्या सुमारास टीव्हीवर अपघाताच्या बातम्या झळकू लागल्या. “अरे, दादांचा अपघात झालाय का?” असा प्रश्न त्यांनी कर्मचाऱ्यांना विचारला. मात्र, आईला धक्का बसू नये म्हणून कर्मचाऱ्यांनी पाऊले उचलायला सुरवात केली. बातम्या पुढे दिसू नयेत म्हणून त्यांनी बंगल्याच्या टीव्हीची केबलच तोडून टाकली आणि तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या मोबाईलवर कोणाचा फोन येऊन ही बातमी कळू नये, यासाठी तो फोनही गुपचूप ‘फ्लाईट मोड’वर टाकून देण्यात आला.

मुलाला भेटण्यासाठी आईचा पायी प्रवास-
“दादांना काहीही झाले नाही, त्यांना फक्त खरचटले असेल,” असे सांगून कर्मचारी त्यांचे सांत्वन करत होते. परंतु, आईचे मन मानायला तयार नव्हते. “चला, मला दादाला भेटायला न्या,” असा हट्ट त्यांनी धरला. त्यांना थांबवण्यासाठी चालकाने गाडी बंद असल्याचे खोटे सांगितले, पण माऊलीची ओढ इतकी तीव्र होती की, त्या कोणाचेही न ऐकता फार्म हाऊसच्या बाहेर पायीच चालू लागल्या. अखेर त्यांचा आग्रह पाहून कर्मचाऱ्यांनी नाईलाजाने त्यांना बारामती येथील निवासस्थानी नेले.

चार दिवसांपूर्वीच्या ‘त्या’ गप्पा ठरल्या शेवटच्या
केवळ चार दिवसांपूर्वीच, म्हणजे शनिवारी सकाळी साडेसात वाजता, अजितदादा आपल्या आईला भेटण्यासाठी फार्म हाऊसवर आले होते. तिथे त्यांनी आपल्या आईसोबत तब्बल पाऊण तास मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. आईची विचारपूस केल्यानंतर त्यांनी शेतातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, नवनवीन वृक्षारोपण करण्याच्या सूचना दिल्या आणि सर्वांच्या प्रकृतीची आपुलकीने चौकशी केली होती. आईसोबतच्या त्या सुखद गप्पा हीच आता त्यांच्या स्मृतींची शेवटची शिदोरी ठरली आहे, अशी भावना व्यक्त करत व्यवस्थापक धायगुडे यांनाही अश्रू अनावर झाले.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या