Home / देश-विदेश / PM MODI SPEECH: “काँग्रेस पंतप्रधानांना इजा करणार होती”, सभापतींचा गंभीर आरोप; मोदींचे राज्यसभेत २ तासांचे वादळी भाषण

PM MODI SPEECH: “काँग्रेस पंतप्रधानांना इजा करणार होती”, सभापतींचा गंभीर आरोप; मोदींचे राज्यसभेत २ तासांचे वादळी भाषण

PM MODI SPEECH: आज भारताच्या संसदीय इतिहासात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. लोकसभेत काल काँग्रेस व मित्रपक्षाच्या खासदारांनी आंदोलन केले, घोषणा...

By: Team Navakal
PM MODI SPEECH
Social + WhatsApp CTA

PM MODI SPEECH: आज भारताच्या संसदीय इतिहासात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. लोकसभेत काल काँग्रेस व मित्रपक्षाच्या खासदारांनी आंदोलन केले, घोषणा दिल्या, महिला खासदारांनी हातात फलक घेऊन पंतप्रधानांची खुर्ची घेरली. त्यानंतर पंतप्रधान मोदी काल आणि आज लोकसभेत आले नाहीत. मोदी सरकार आल्यानंतर प्रथमच राष्ट्रपती अभिभाषणाचा धन्यवाद प्रस्ताव पंतप्रधानांचे भाषण न होताच आवाजी मतदानाने मंजूर केले. यानंतर आणखी धक्कादायक घटना घडली.

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी लोकसभा सभागृहात म्हटले की, काँग्रेसचे खासदार या सभागृहात पंतप्रधानांना इजा करणार होते. या षड्यंत्राची मला माहिती मिळाली. या सभागृहात अप्रिय घटना घडू नये म्हणून आज मीच पंतप्रधान मोदी यांना विनंती केली की, आपण सभागृहात येऊ नका. त्यांनी माझी विनंती मान्य केली आणि ते आज सभागृहात आले नाहीत. मी त्यांचे आभार मानतो.


लोकसभा सभागृहात सभापतींनी काँग्रेस खासदारांवर इतका गंभीर आरोप करणे हे धक्कादायक आहे. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वैतागून म्हणाल्या की, 3 खासदार त्यांच्या खुर्चीपर्यंत गेल्या म्हणून असे आरोप करणे मूर्खपणाचे आहे. पंतप्रधान हे सभापतींच्या मागे लपले हेच सत्य आहे.

लोकसभेत अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मंजूर झाल्यावर सभागृह स्थगित झाले.
त्यानंतर सायंकाळी 5 वाजता पंतप्रधान मोदींचे राज्यसभा सभागृहात निवेदन सुरू झाले. त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करीत दोन तासांचे प्रदीर्घ भाषण केले. त्यांचे भाषण सुरू होताच विरोधकांनी ‘तानाशाही नही चलेगी, विरोधी पक्षनेत्याला बोलू द्या या घोषणा देत सभागृह दणाणून सोडले आणि 10 मिनिटांनी सभात्याग केला. विरोधी खासदार सभागृहातून गेले आणि मोदींनी आपले भाषण पूर्ण केले.

पंतप्रधान काँग्रेसवर तुटून पडलेच, दोन तासांचे प्रदीर्घ भाषण

देश प्रगती करत आहे, जगातील विकसनशील देशांतील लोकसंख्या वृद्ध होत आहे. आपल्या देशात मात्र युवांची संख्या जास्त आहे. हा उत्तम योगायोग आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा आपण पाचव्या स्थानावर होतो. काँग्रेस सरकारने देशाला 11 व्या स्थानावर नेले. आता आपण जगात तिसर्‍या स्थानावर आहोत. जगाचा भारताकडे कल आहे. आपण नऊ मोठ्या देशांशी व्यापार करार केला आहे. जे लोक आता पळून गेले त्यांना जबाब द्यायला लागेल की, कोणताही देश आपल्याशी करार करायला येत नव्हता. अशी देशाची स्थिती का करून ठेवली? मताच्या राजकारणात डूबलेल्यांनी याला महत्त्व दिले नाही. लाल किल्ल्यांवरून काँग्रेस पंतप्रधानांनी केलेल्या भाषणांचा अभ्यास करा. त्यांच्याकडे इच्छाशक्ती नव्हती, दूरदृष्टीही नव्हती. त्यामुळे देशाला परिणाम भोगावे लागले.  त्यांनी देशाची जी प्रतिमा तयार केली ती पुसून काढण्यात माझा बराच वेळ गेला. आता आम्ही सुधारणा करत आहोत. भारत आता जगाशी स्पर्धा करण्यास तयार आहे.
युरोपियन युनियन व अमेरिकेशी झालेल्या कराराने जगाला खात्री पटली की, आता जागतिक स्थैर्य व गती साध्य होईल. भारतातील तरुणांसाठी जग खुले झाले आहे. या वरिष्ठ सभागृहात चर्चेचा स्तर उंच असायला हवा होता. तृणमूल सरकारने सर्वात न्यूनतम स्तर गाठला आहे आणि हे लोक येथे सल्ले देतात. त्या राज्यातील घुसखोरांसाठी हे सरकार न्यायालयात जाते. आदिवासींच्या जमिनी लुटतात. पण ते डोळे मिटून बसले आहेत. एक सदस्य नशेत बुडाले आहेत. ब्लॅक शब्दाशी त्यांचे काय प्रेम आहे माहीत  नाही. मी एवढेच म्हणाले की, तुम कितना दुनियाको धोका दोगे, आईना दिखा तो अपनी सच्चाई कहाँ छुपाओगे।

तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, डावे, द्रमुक अनेक दशकांपासून केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत. पण त्यांची ओळख काय आहे? आज जेव्हा करारांची अभिमानाने चर्चा केली जाते तेव्हा बोफोर्सची आठवण येते. त्यांनी फक्त त्यांचे खिसे भरण्यासाठी काम केले. बँकिंग क्षेत्र हे मुळात अर्थव्यवस्थेचा कणा आहे. 2014 पूर्वी फोन बँकिंग प्रचलित होते. नेते फोन  करून लाखो रुपये घेत असत, तर गरिबांना बँकांच्या दारातून परत पाठवले जात असे. काँग्रेस नेत्यांच्या कॉलच्या आधारे अब्जावधी रुपये दिले जात होते. एनडीए काळात बँक क्षेत्राचा सत्यानाश झाला होता, मी पंतप्रधान झालो तेव्हा बुडित खात्यांचे डोंगर उभे होते. आम्ही पारदर्शक व्यवस्था उभारली आणि तोट्यातील सरकारी बँकांचे विलीनीकरण केले. आम्ही बँका सशक्त केल्या. बुडीत खात्यांचे प्रमाण 1 टक्क्यांपेक्षा खाली आणले. आज बुडीत सार्वजनिक उद्योग नफा करीत आहेत, असे मोदी म्हणाले.


मोदी पुढे म्हणाले की, हे लोक सार्वजनिक उद्योगाबाहेर अर्बन नक्षलींप्रमाणे कामगारांचे आंदोलन घडवायचे. एलआयसी, स्टेट बँक, एचएएल अशा उद्योगांना अडचणीत आणले. ते आता नफ्यात आहेत. या संस्थांना आता देशात व परदेशातून कामे मिळत आहेत. काँग्रेसने शेतकर्‍यांचा विश्वासघात केला, छोट्या शेतकर्‍यांकडे त्यांनी बघितले नाही. आम्ही पंतप्रधान किसान सन्मान योजना आणून आतापर्यंत त्यांच्या खात्यात 4 लाख कोटी रुपये दिले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना या हिमाचलच्या दौर्‍यावर गेल्या होत्या. आणि आल्यावर म्हणाल्या की, मला योजना आयोगाशी संघर्ष करावा लागला.  कारण ते डोंगराळ भागासाठी योजना करायला तयार नव्हते. मी त्यांना सांगितले की, तिथे जीप नकोत. सामान नेण्यासाठी गाढवांची गरज आहे. तिथे जीपसाठी रस्ते नाहीत, पण योजना आयोग म्हणाले की, गाढवे पुरविण्याचे धोरण नाही. त्यामुळे जीपच मिळेल. ज्यांनी योजना आयोग स्थापन केला ते त्यांचे वडील नेहरू होते. आम्ही आल्यावर 2014 साली योजना आयोग समाप्त करून नीती आयोग आणला. हा आयोग जनतेच्या मूळ गरजा पूर्ण करत आहे. आज बस्तरसारख्या मागास भागात बस पोहोचली आहे.

ते पुढे म्हणाले की, माझ्या जन्मापूर्वी सरदार पटेलांनी नर्मदेवर जे धरण बांधण्याचा प्रस्ताव आणला. नेहरूंनी त्याचे भूमिपूजन केले आणि मी पंतप्रधान झाल्यावर त्याचे उद्घाटन केले. ही त्यांची अंमलबजावणीची स्थिती आहे. काँग्रेसने राजकीय फायद्यांसाठी योजना घोषित केल्या आणि त्या कागदावरच ठेवल्या. आता मी त्यातील अडचणी काढून त्या पूर्ण करीत आहे. आपला देश आव्हानांना तोंड देऊ शकतो, हा आमचा विचार आहे. त्यांना देशाची लोकसंख्या ही अडचण वाटते. इंदिरा गांधी इराणमध्ये भाषणात म्हणाल्या होत्या की, जेव्हा माझ्या वडिलांना (नेहरुंना) विचारले की, त्यांच्या समोर किती अडचणी आहेत तेव्हा नेहरू म्हणाले की, 35 कोटी (त्यावेळी 35 कोटी ही भारताची लोकसंख्या होती) त्या पुढे म्हणाल्या की, आता देशाची लोकसंख्या 57 कोटी आहे, त्यामुळे आता माझ्या समोर 57 कोटी अडचणी आहेत.

आमच्यासाठी देशवासी आपले देशवासी ही आपली ताकद आहे. काल त्यांनी लोकसभेत जे केले ते वेदनादायक आहे. त्यावेळी आसामचे खासदार स्पीकर होते. काल आंध्र प्रदेशचा दलित पुत्र स्पीकर होता, त्यांच्यावर कागद फेकले. आसामचा त्यांनी अपमान केला. एक दलित पुत्र आहे म्हणून त्याचा अपमान केला, आसामच्या जनतेने त्यांची साथ सोडली, म्हणून हे असे वागतात का? भूपेन हजारिका यांना आम्ही सन्मान दिला. त्यालाही यांनी विरोध केला. काँग्रेसच्या युवराजांनी एका शीख खासदाराला गद्दार म्हटले. हा  शिखांचा अपमान होता.
आम्ही देशाची जमीन विकसित करतो आहोत. तर काँग्रेस माझी कबर खोदायला निघाली आहे. हा  मानवतेचा अपमान आहे. पण याचा त्यांना खेद नाही. आम्ही कलम 370 ची भिंत दूर केली. आम्ही ईशान्य भारतातील दहशतवाद संपवला.  पाकिस्तानी दहशतवाद्यांना घरात घुसून ठार करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर केले. आम्ही माओवाद्यांपासून मुक्ती दिली. आम्ही पाकिस्तानसोबतचा सिंधू करार रद्द केला. आम्ही 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले. अंधारात असलेल्या 18,000 गावांत वीज पोहोचवली, सैनिकांना दारुगोळा, बुलेट प्रूफ जॅकेट पुरवली, त्यांच्यासाठी खजिना रिता केला म्हणून यांना मोदींची कबर खोदायची आहे. त्यांचे सरकार रिमोट कंट्रोल सरकार होते. माझे सरकारदेखील रिमोट कंट्रोल आहे. परंतु 140 कोटी देशवासी हे माझे रिमोट आहेत. आमच्यासाठी सत्ता ही चैन नाही, तर सेवा आहे. बीएसएनएलवर पूर्वी विनोद व्हायचे, पण आज आम्ही स्वदेशी फोर-जी तंत्रज्ञान विकसित केले आहे. आम्ही नवीन तंत्रज्ञानाचा पाया रचला आहे. काँग्रेसपुढे दुसरा मार्ग नाही. म्हणून ‘मोदी तेरी कबर खुदेगी’ म्हणत आहेत. परंतु तुम्ही कितीही घोषणा दिल्या तरी तुम्ही कबर खोदू शकणार नाही. माझ्याबद्दल माता आणि बहिणींच्या मनात भावना आहेत. ज्यांना कोणीही विचारत नव्हते, त्यांची मोदी पूजा करतात. हे त्यांना वाचवणारे आशीर्वाद आहेत. म्हणूनच ते कबर खोदू इच्छितात. ज्यांचा पूर्वजांचा व्यवसाय चोरी करणे आहे. ज्यांनी गुजराती आडनाव चोरले. ज्यांनी महात्मा गांधींचे आडनाव चोरले. अशा लोकांना देशातील लोक पराभूत करतात, असे ते म्हणाले.

आता भारत जगाचे नेतृत्व करत आहे. भारतात विदेशी गुंतवणूक येणार आहे. त्याचा प्रत्येकाला फायदा होणार आहे. मला भारताचे उज्ज्वल भविष्य दिसत आहे. पूर्वी बस चुकणार तर नाही, असे आपल्याला वाटत असे. आता जगाला तसे वाटत आहे. येणारा काळ संधीने भरलेला असेल. या दृष्टीने आम्ही काम करतो आहोत. धोरणे आखतो आहोत. मात्र जगाच्या बाजारात टिकण्यासाठी दर्जाची तडजोड न करता उत्पादने बनवा. तर जग ‘मेड इन इंडिया’चे गीत गाईल. आमचे ध्येय 2047 पर्यंत विकसित भारत आहे. निवडणुका येतील आणि जातील. देशातील तरुणांच्या हातात समृद्ध भारत सोडण्याचे आमचे स्वप्न आहे, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या