Home / देश-विदेश / Navjot Kaur Sidhu : नवज्योत कौर सिधू यांची पक्षातून हकालपट्टी; राहुल गांधींवर केला ‘पप्पू’ शब्दाने प्रहार

Navjot Kaur Sidhu : नवज्योत कौर सिधू यांची पक्षातून हकालपट्टी; राहुल गांधींवर केला ‘पप्पू’ शब्दाने प्रहार

Navjot Kaur Sidhu : पंजाबच्या राजकारणात सिधू कुटुंब आणि काँग्रेसमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत...

By: Team Navakal
Navjot Kaur Sidhu
Social + WhatsApp CTA

Navjot Kaur Sidhu : पंजाबच्या राजकारणात सिधू कुटुंब आणि काँग्रेसमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिधू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिधू यांची काँग्रेस पक्षातून अधिकृतपणे हकालपट्टी करण्यात आली आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस भूपेश बघेल यांनी या निर्णयाची घोषणा केली. विशेष म्हणजे, सात दिवसांपूर्वीच आपण पक्षाचा राजीनामा दिल्याचे कौर यांनी सांगितले होते, परंतु आता पक्षाने त्यांना काढून टाकल्याचे स्पष्ट केले आहे.

राहुल गांधींवर ‘पप्पू’ शब्दाने बोचरी टीका

पक्षातून हकालपट्टी झाल्याचे समजताच नवज्योत कौर सिधू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियाद्वारे राहुल गांधींवर अप्रत्यक्ष पण अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला. “पप्पूने अखेर स्वतःच्या नावावर शिक्कामोर्तब केले,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. विरोधकांकडून राहुल गांधींचा उल्लेख करण्यासाठी वापरला जाणारा हा शब्द वापरून कौर यांनी काँग्रेस नेतृत्वाला उघड आव्हान दिले आहे.

हकालपट्टीचे नेमके कारण काय?

८ डिसेंबर २०२५ रोजीच नवज्योत कौर यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. “जो ५०० कोटी रुपयांची सूटकेस देतो, तोच पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनतो,” असे खळबळजनक विधान त्यांनी केले होते. या शिस्तभंगाच्या कारवाईनंतर ३१ जानेवारी रोजी त्यांनी स्वतःहून राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र, भूपेश बघेल यांनी स्पष्ट केले की, त्या आधीच निलंबित होत्या आणि आता त्यांची हकालपट्टी पूर्ण झाली आहे.

काँग्रेसच्या ‘आतल्या गोटा’वर गंभीर आरोप

कौर यांनी केवळ राहुल गांधींवरच नाही, तर त्यांच्या जवळच्या सल्लागारांवरही गंभीर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की, राहुल गांधींना वाटते की केवळ तेच प्रामाणिक आणि ज्ञानी आहेत, पण प्रत्यक्षात त्यांना जमिनीवरील परिस्थितीची माहिती नाही. त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांना वास्तवापासून दूर ठेवले आहे आणि ते स्वतः मात्र ऐषाराम करत आहेत.

गांधी कोणताही निर्णय घेण्यापूर्वीच त्यांच्या जवळचे लोक निवडणुकीची तिकिटे विकून मोकळे होतात. आणीबाणीच्या प्रसंगी निर्णय घ्यायला राहुल गांधी ६ महिने लावतात, तोपर्यंत पक्षाचे भरून न येणारे नुकसान झालेले असते, असे त्या म्हणाल्या.

    राजकीय प्रवास

    २०१२ मध्ये नवज्योत कौर सिधू यांनी भाजपच्या तिकिटावर अमृतसर पूर्व मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. २०१७ मध्ये त्यांनी पतीसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१८ मध्ये काँग्रेस सरकारने त्यांची पंजाब वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मात्र, आता हा प्रवास कडू आठवणींसह थांबला असून, सिधू कुटुंब भविष्यात कोणती राजकीय दिशा पकडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Web Title:
    For more updates: , , , , stay tuned with Navakal
    संबंधित बातम्या