Home / लेख / Smartphone Battery Blast: तरुणाने तोंडात धरली मोबाईलची बॅटरी अन् झाला भीषण स्फोट; तुम्ही करू नका ‘या’ चुका

Smartphone Battery Blast: तरुणाने तोंडात धरली मोबाईलची बॅटरी अन् झाला भीषण स्फोट; तुम्ही करू नका ‘या’ चुका

Smartphone Battery Blast: मोबाईल फोन किंवा बॅटरी हाताळताना थोडासा निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो, याचे एक धक्कादायक उदाहरण समोर आले...

By: Team Navakal
Smartphone Battery Blast
Social + WhatsApp CTA

Smartphone Battery Blast: मोबाईल फोन किंवा बॅटरी हाताळताना थोडासा निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो, याचे एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. एका सर्व्हिस सेंटरमध्ये मोबाईल दुरुस्तीसाठी आलेल्या एका मुलाने बॅटरी तोंडात घालून दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्याच क्षणी बॅटरीचा मोठा स्फोट झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण एका मोबाईल सर्व्हिस सेंटरच्या काउंटरवर उभा होता. त्याच्या हातात मोबाईलची बॅटरी होती. अचानक त्याने ती बॅटरी आपल्या तोंडात धरली आणि दाताने दाबण्यास सुरुवात केली. दातांच्या दाबामुळे बॅटरीचे बाह्य कवच फाटले आणि त्यातील रासायनिक प्रक्रिया वेगाने होऊन मोठा धमाका झाला. स्फोट होताच आगीच्या ज्वाळा आणि ठिणग्या मुलाच्या तोंडाबाहेर निघाल्या.

लोकांनी केली तातडीने मदत

स्फोट होताच दुकानातील कर्मचारी आणि इतर ग्राहकांनी मुलाच्या दिशेने धाव घेतली. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बॅटरीमधील रसायनांमुळे त्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे.

लिथियम आयन बॅटरी का ठरते घातक?

आजच्या आधुनिक स्मार्टफोनमध्ये लिथियम आयन बॅटरी वापरली जाते, जी अत्यंत संवेदनशील असते. यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोड असतात, ज्यांच्यामध्ये एक पातळ सेपरेटर फिल्म असते.

  1. जर ही फिल्म फाटली किंवा तुटली, तर दोन्ही इलेक्ट्रोड्स एकमेकांच्या संपर्कात येतात.
  2. यामुळे रासायनिक प्रक्रिया होऊन बॅटरी गरम होते आणि तिचा बॉम्बसारखा स्फोट होतो.
  3. बॅटरी दाताने दाबल्यामुळे किंवा कोणत्याही अणकुचीदार वस्तूने टोचल्यामुळे हा अडथळा दूर होतो आणि मोठा अनर्थ घडतो.

चूकूनही करू नका या चुका

तुमची सुरक्षा तुमच्या हातात आहे. बॅटरी किंवा स्मार्टफोनबाबत खालील खबरदारी घेणे गरजेचे आहे:

  • बॅटरी कधीही दाताने किंवा हाताने दाबून तपासू नका.
  • फुगलेली बॅटरी वापरणे त्वरित बंद करा.
  • बॅटरीला कोणत्याही टोकदार वस्तूने छिद्र पाडण्याचा प्रयत्न करू नका.
  • बॅटरी गरम होत असेल तर ती शरीरापासून लांब ठेवा.
Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या