Home / मनोरंजन / Bigg Boss Marathi 6: राखी सावंतची वाइल्ड कार्ड एन्ट्री! बिग बॉसच्या घरात येणार मनोरंजनाची त्सुनामी

Bigg Boss Marathi 6: राखी सावंतची वाइल्ड कार्ड एन्ट्री! बिग बॉसच्या घरात येणार मनोरंजनाची त्सुनामी

Bigg Boss Marathi 6: छोट्या पडद्यावरील सर्वात गाजलेला शो ‘बिग बॉस मराठी सिझन 6’ आता एका वेगळ्याच वळणावर पोहोचला आहे....

By: Team Navakal
Bigg Boss Marathi 6
Social + WhatsApp CTA

Bigg Boss Marathi 6: छोट्या पडद्यावरील सर्वात गाजलेला शो ‘बिग बॉस मराठी सिझन 6’ आता एका वेगळ्याच वळणावर पोहोचला आहे. प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, घरामध्ये ‘एंटरटेनमेंटची त्सुनामी’ समजली जाणारी राखी सावंत पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून दाखल झाली आहे. राखीच्या येण्याने घरातील समीकरणे पूर्णपणे बदलणार असून आता खऱ्या अर्थाने ‘धुमाकूळ’ पाहायला मिळणार आहे.

राखीची एन्ट्री अन् गणिते बदलणार

आतापर्यंत घरातील सदस्यांनी जे गट, मैत्री आणि नाती तयार केली होती, त्या सर्वांना राखीच्या येण्याने हादरा बसणार आहे. कुणाशी मैत्री करायची आणि कुणाचा गेम उघडा पाडायचा, यात राखीचा हात कुणीच धरू शकत नाही. राखीचा बिनधास्त स्वभाव आणि बेधडक खेळ पाहता, घरातील जुन्या स्पर्धकांमध्ये आता चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

काय म्हणाली ‘ड्रामा क्वीन’?

घरात जाण्यापूर्वी राखीने आपल्या खास शैलीत भाष्य केले. ती म्हणाली, “राखी सावंत जिथे जाते, तिथे गेम बदलतो. माझ्याशिवाय बिग बॉस अपूर्णच आहे. मी घरात गेल्यावर इतरांचे आवाज आपोआप बंद होतात. मला नवीन कपडे (Costumes) आणि नवनवीन खेळी खेळायला आवडतात. रितेश देशमुख खूप उत्तम प्रकारे हा शो होस्ट करत आहेत आणि त्यांच्याबद्दल मला अभिमान आहे. केवळ महाराष्ट्रातील जनतेच्या मनोरंजनासाठी मी पुन्हा एकदा या घरात येत आहे.”

मनोरंजनाचा ‘डबल डोस’

राखी सावंत आणि बिग बॉस हे जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हिंदी असो वा मराठी, राखीशिवाय हा खेळ काहीसा फिका वाटतो. तिच्या एन्ट्रीमुळे शोमधील ड्रामा आता ‘नेक्स्ट लेव्हल’वर पोहोचणार आहे. राखीच्या आगमनाने प्रेक्षकांना आता रोज रात्री मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राखी या सिझनमध्ये दिसणार अशी चर्चा होती, अखेर त्या चर्चेवर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या