Home / महाराष्ट्र / ZP Election Result 2026 : अजितदादांच्या राष्ट्रवादीची ‘पॉवर; महायुतीची घोडदौड सुरूच; २०० जागांच्या कलांमध्ये विरोधक पिछाडीवर

ZP Election Result 2026 : अजितदादांच्या राष्ट्रवादीची ‘पॉवर; महायुतीची घोडदौड सुरूच; २०० जागांच्या कलांमध्ये विरोधक पिछाडीवर

ZP Election Result 2026 : महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांच्या ग्रामीण राजकारणाचे भवितव्य ठरवणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मतमोजणीला वेग...

By: Team Navakal
ZP Election Result 2026
Social + WhatsApp CTA

ZP Election Result 2026 : महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांच्या ग्रामीण राजकारणाचे भवितव्य ठरवणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मतमोजणीला वेग आला असून, सकाळी ११ वाजेपर्यंतच्या कलांनी महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे. शनिवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज ७३१ जिल्हा परिषद सदस्य आणि १,४६२ पंचायत समिती जागांसाठीच्या मतमोजणीत महायुतीने आपली पकड अधिक मजबूत केली आहे. एकूण ७,४३८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य पणाला लागलेल्या या निवडणुकीत, रायगड ते लातूरपर्यंत सर्वत्र चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

पक्षनिहाय बलाबल: सकाळी ११ वाजेपर्यंतची स्थिती
जिल्हा परिषदेच्या एकूण ७३१ जागांपैकी आतापर्यंत २०० जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेही लक्षणीय प्रगती केली आहे

राजकीय पक्ष आघाडीवरील जागा
भारतीय जनता पक्ष (भाजप) ७०
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ४३
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ३८
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २१
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) १४
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ०३
इतर व अपक्ष ११
एकूण कल २००/७३१

या आकडेवारीनुसार, महायुतीने १५१ जागांवर आघाडी मिळवत राज्यातील ग्रामीण भागावर आपले वर्चस्व असल्याचे प्राथमिक संकेत दिले आहेत. दुसरीकडे, महाविकास आघाडीतील घटक पक्ष अद्यापही अपेक्षित कामगिरी करताना दिसत नाहीत.

कोकण विभागातून महायुतीची विजयी सलामी
मतमोजणीच्या प्रत्यक्ष निकालांपूर्वीच कोकण विभागाने महायुतीच्या पारड्यात मोठे यश टाकले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तीन जिल्ह्यांतून महायुतीचे तब्बल २७ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ८ जागांवर आधीच विजय निश्चित झाला असून, त्यात भाजपचे ७ आणि शिंदे शिवसेनेचा १ उमेदवार आहे. तसेच, येथील पंचायत समितीच्या १७ जागांवरही महायुतीने वर्चस्व राखले आहे.

विशेष म्हणजे, रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज पंचायत समिती गणातून शिंदे शिवसेनेच्या उमेदवार डॉ. पद्मजा कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. रायगडमध्येही महाड पंचायत समितीच्या सवाने धामणे गणातून अनिल जाधव यांच्याविरोधातील उमेदवारांनी माघार घेतल्याने त्यांचा विजय सुकर झाला. कोकणातील या ‘बिनविरोध’ विजयामुळे महायुतीचा आत्मविश्वास दुणावला असून, उर्वरित जिल्ह्यांमधील निकालांकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या