Home / महाराष्ट्र / ZP Election Results: ग्रामीण महाराष्ट्राचा कौल कोणाला? १२ जिल्हा परिषदांचा संपूर्ण निकाल एका क्लिकवर

ZP Election Results: ग्रामीण महाराष्ट्राचा कौल कोणाला? १२ जिल्हा परिषदांचा संपूर्ण निकाल एका क्लिकवर

Maharashtra ZP Election Results 2026: महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे निकाल...

By: Team Navakal
ZP Election Results
Social + WhatsApp CTA

Maharashtra ZP Election Results 2026: महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. ७३१ जिल्हा परिषद जागा आणि १,४६२ पंचायत समिती जागांसाठी पार पडलेल्या या निवडणुकीत एकूण ७,४३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होते.

या १२ जिल्ह्यांतील सत्तेचे समीकरण आणि प्रत्येक पक्षाला मिळालेल्या जागांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे:

१. रायगड जिल्हा परिषद (५९ जागा)

कोकणातील या महत्त्वाच्या जिल्ह्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली.

  • शिवसेना: २१
  • भाजप: १५
  • राष्ट्रवादी काँग्रेस: १६
  • शिवसेना ठाकरे गट: ०५
  • काँग्रेस: ०२
  • शेकाप: ००

२. रत्नागिरी जिल्हा परिषद (५६ जागा)

रत्नागिरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एकहाती वर्चस्व राखले आहे.

  • शिंदे शिवसेना: ४०
  • शिवसेना ठाकरे गट: ०६
  • राष्ट्रवादी अजित पवार गट: ०५
  • भाजप: ०४
  • मनसे: ०१

३. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद (५० जागा)

सिंधुदुर्गात भाजपने आपले वर्चस्व सिद्ध करत सत्ता मिळवली आहे.

  • भाजप: २७
  • शिवसेना: १४
  • शिवसेना UBT: ०३
  • अपक्ष: ०६

४. पुणे जिल्हा परिषद (७३ जागा)

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

  • राष्ट्रवादी: ५१
  • भाजप: १०
  • ठाकरे गट: ०६
  • शिवसेना: ०५
  • शरद पवार गट: ०१

५. सातारा जिल्हा परिषद (६५ जागा)

साताऱ्यात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये मोठी टक्कर पाहायला मिळाली.

  • भाजप: २३
  • राष्ट्रवादी: २२
  • शिवसेना: १३
  • काँग्रेस: ०१
  • इतर: ०२

६. सांगली जिल्हा परिषद (६१ जागा)

सांगलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने मुसंडी मारली असून मोठी झेप घेतली आहे.

  • राष्ट्रवादी शरद पवार गट: १८
  • भाजप: १६
  • काँग्रेस: ११
  • शिवसेना शिंदे गट: ०७
  • राष्ट्रवादी अजित पवार गट: ०६
  • रयत क्रांती/जनसुराज्य: प्रत्येकी ०१

७. कोल्हापूर जिल्हा परिषद (६८ जागा)

कोल्हापुरात महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये समसमान लढत झाली.

  • राष्ट्रवादी: २०
  • काँग्रेस: १५
  • भाजप: १२
  • शिवसेना शिंदे गट: ०९
  • जनसुराज्य: ०६
  • शाहू आघाडी: ०४
  • स्वाभिमानी/ठाकरे गट: प्रत्येकी ०१

८. सोलापूर जिल्हा परिषद (६८ जागा)

सोलापूर जिल्ह्यात भाजपने मुसंडी मारत सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.

  • भाजप: ३६
  • राष्ट्रवादी: १०
  • राष्ट्रवादी शरद पवार गट: ०७
  • शिवसेना: ०५
  • शेकाप: ०३
  • इतर: ०२

९. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद (६३ जागा)

मराठवाड्यातील या महत्त्वाच्या जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना युतीचे वर्चस्व दिसून आले.

  • भाजप: २३ (पुरस्कृत ०२)
  • शिवसेना: २१ (पुरस्कृत ०१)
  • शिवसेना UBT: ०९
  • राष्ट्रवादी अजित पवार गट: ०४
  • काँग्रेस/शरद पवार गट: प्रत्येकी ०१
  • अपक्ष: ०१

१०. परभणी जिल्हा परिषद (५४ जागा)

परभणीत भाजपने आघाडी घेतली असून राष्ट्रवादी अजित पवार गटानेही चांगली कामगिरी केली.

  • भाजप: २४
  • राष्ट्रवादी अजित पवार गट: १५
  • शिवसेना ठाकरे गट: ०६
  • शिवसेना: ०५
  • काँग्रेस: ०३
  • अपक्ष: ०१

११. धाराशिव जिल्हा परिषद (५५ जागा)

धाराशिवमध्ये महायुतीचे वर्चस्व दिसून आले असून भाजपने सर्वाधिक १९ जागा जिंकल्या आहेत.

  • भाजप: १९
  • शिवसेना शिंदे गट: १५
  • शिवसेना ठाकरे गट: ०७
  • राष्ट्रवादी काँग्रेस: ०६
  • काँग्रेस: ०३
  • अपक्ष/इतर: ०५

१२. लातूर जिल्हा परिषद (५९ जागा)

लातूरमध्ये काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकत आपले स्थान मजबूत ठेवले आहे.

  • काँग्रेस: २३
  • भाजप: १८
  • राष्ट्रवादी अजित पवार गट: १२
  • अपक्ष: ०२
  • शिवसेना/ठाकरे गट/मनसे/शरद पवार गट: प्रत्येकी ०१
Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या