Home / महाराष्ट्र / Supriya Sule Daughter Revati Sule Marriage : शरद पवारांच्या लाडक्या नातीच रेवती सुळेंचं लग्न ठरलं; फडणवीस-गडकरींची मध्यस्थी? रेवती सुळे आता उपराजधानीची सून..

Supriya Sule Daughter Revati Sule Marriage : शरद पवारांच्या लाडक्या नातीच रेवती सुळेंचं लग्न ठरलं; फडणवीस-गडकरींची मध्यस्थी? रेवती सुळे आता उपराजधानीची सून..

Supriya Sule Daughter Revati Sule Marriage : खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. नागपूरचे सुपुत्र...

By: Team Navakal
Supriya Sule Daughter Revati Sule Marriage
Social + WhatsApp CTA

Supriya Sule Daughter Revati Sule Marriage : खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. नागपूरचे सुपुत्र सारंग अरुण लखानी यांच्याशी रेवती सुळे यांचा विवाह निश्चित झाला आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या विवाह सोहळ्याबाबतची प्राथमिक माहिती दिली.

राजकीय स्नेह आणि कौटुंबिक जवळीक-
या विवाह जुळणीचे एक वैशिष्ट्य म्हणजे, यात राजकारणापलीकडील स्नेह पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेवती आणि सारंग यांचे हे नाते जुळवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष मध्यस्थी केल्याचे समजते. वैचारिक मतभेद बाजूला ठेवून नेत्यांनी जपलेल्या या वैयक्तिक संबंधांची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे.

नागपूरची सून होणार रेवती सुळे-
सारंग लखानी हे मूळचे नागपूरचे असल्याने, रेवती सुळे आता उपराजधानीची सून होणार आहेत. लखानी कुटुंब हे नागपुरातील प्रतिष्ठित कुटुंब असून, सारंग हे अरुण लखानी यांचे सुपुत्र आहेत. रेवती सुळे यांनी त्यांचे शिक्षण परदेशातून पूर्ण केले असून, त्या आता जीवनाच्या एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहेत.

स्मृती शिंदे यांची सोशल मीडिया पोस्ट-
या बातमीला स्मृती शिंदे यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अधिकृतता मिळाली. त्यांनी रेवती आणि सारंग यांच्यासोबतचे छायाचित्र शेअर करत या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत. सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्या कन्या रेवती यांनी नेहमीच प्रसिद्धीच्या झोतातून दूर राहणे पसंत केले, मात्र त्यांच्या विवाहाच्या बातमीने आता सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कोण आहेत सारंग अरुण लखानी?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाह ज्यांच्याशी निश्चित झाला आहे, ते सारंग अरुण लखानी हे नागपुरातील एका प्रतिष्ठित औद्योगिक घराण्यातील सुपुत्र आहेत. व्यवसायाने उद्योजक आणि आवडीने खेळाडू असलेले सारंग लखानी हे त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामुळे चर्चेत आले आहेत.

औद्योगिक पार्श्वभूमी आणि वारसा-
सारंग हे विदर्भातील प्रख्यात उद्योजक अरुण लखानी यांचे सुपुत्र आहेत. अरुण लखानी हे ‘विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ (Vishvaraj Infrastructure Ltd) या नामांकित समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात या समूहाने राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. सारंग हे देखील त्यांच्या कौटुंबिक व्यवसायात सक्रिय असून, वडिलांचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत.

क्रीडा क्षेत्रातील कामगिरी-
सारंग लखानी केवळ व्यावसायिक वर्तुळातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही परिचित नाव आहे. ते एक उत्कृष्ट बॅडमिंटनपटू आहेत. लहानपणापासूनच खेळाची आवड असलेल्या सारंग यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध बॅडमिंटन स्पर्धांमध्ये आपले कौशल्य सिद्ध केले आहे. जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या (BWF) मानांकनामध्येही त्यांनी स्थान मिळवले होते.

सामाजिक आणि कौटुंबिक स्थान-
सारंग यांचे वडील अरुण लखानी हे केवळ उद्योजक नसून, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे माजी अध्यक्ष देखील राहिले आहेत. यावरून लखानी कुटुंबाची क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील व्याप्ती लक्षात येते. रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या या विवाह संबंधामुळे आता महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या शहरांतील (पुणे-बारामती आणि नागपूर) दोन प्रभावशाली कुटुंबांमध्ये मैत्रीपूर्ण नाते निर्माण होणार आहे.

कोण आहेत रेवती सुळे? पवारांच्या तिसऱ्या पिढीतील आश्वासक चेहरा?
महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे सध्या त्यांच्या विवाह निश्चितीमुळे चर्चेत आहेत. सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्या कन्या असलेल्या रेवती यांची देखील आपली स्वतंत्र ओळख आहे .

उच्चशिक्षित व्यक्तिमत्व-
रेवती सुळे यांचे शिक्षण अत्यंत उच्च दर्जाचे झाले आहे. त्यांनी जगातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या ब्रिटनमधील ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ (LSE) मधून आपली पदवी संपादन केली आहे. त्यांचे बंधू विजय सुळे हे देखील उच्चशिक्षित असून सुळे दांपत्याच्या दोन्ही मुलांनी कायमच प्रसिद्धीच्या झोतात राहण्याऐवजी आपल्या शिक्षणावर आणि वैयक्तिक प्रगतीवर लक्ष केंद्रित केले आहे.

राजकीय पदार्पण आणि प्रचारातील सहभाग-
रेवती सुळे या एरवी सार्वजनिक जीवनात फारशा सक्रिय दिसत नसल्या, तरी २०२४ च्या बारामती लोकसभा निवडणुकीत त्या पहिल्यांदाच राजकारणाच्या मैदानात उतरलेल्या पाहायला मिळाल्या. आपल्या आईच्या, म्हणजेच सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली होती.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या