Home / महाराष्ट्र / Ajit Pawar : अजित पवारांच्या निधनाबाबत रोहित पवारांचा खळबळजनक दावा! 3 नावांचा उल्लेख करत व्यक्त केली शंका

Ajit Pawar : अजित पवारांच्या निधनाबाबत रोहित पवारांचा खळबळजनक दावा! 3 नावांचा उल्लेख करत व्यक्त केली शंका

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash: २८ जानेवारी रोजी झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन...

By: Team Navakal
Ajit Pawar
Social + WhatsApp CTA

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash: २८ जानेवारी रोजी झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण राज्य अद्याप सावरलेले नसतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत खळबळजनक दावे केले आहेत.

हा अपघात होता की घातपात? असा सवाल उपस्थित करत रोहित पवार यांनी या प्रकरणातील काही संशयास्पद बाबींकडे लक्ष वेधले आहे.

विमान कंपनी आणि वैमानिकावर शंका

रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत पुराव्यांसह सादरीकरण केले. यावेळी त्यांनी प्रामुख्याने तीन नावांवर शंका व्यक्त केली:

  1. व्हीएसआर (VSR) विमान कंपनी
  2. ॲरो (Aero) कंपनी
  3. कपूर नावाचा वैमानिक

रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, ॲरो कंपनीने सरकारी नियमांनुसार व्हीएसआरचे विमान भाड्याने घेतले होते. या प्रक्रियेत पवार आडनावाचा एक व्यक्ती हँडलर म्हणून काम करत होता, ज्याने हवामान स्पष्ट असल्याचे सांगितले होते. या कंपन्यांचे राजकीय संबंध असून त्या अनेक राज्यांत कार्यरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

तज्ज्ञांमार्फत चौकशीची मागणी

या प्रकरणाचा तपास सीआयडी (CID) करत असली, तरी रोहित पवार यांनी या एजन्सीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही, मात्र त्यांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. ते म्हणाले, “हृदयाचा त्रास असेल तर हृदयाच्याच डॉक्टरकडे जावे लागते, डोळ्यांच्या नाही. सीआयडीचे हे ‘एक्सपर्टीज’ नाही. या तांत्रिक घटनेचा तपास करण्यासाठी बाहेरच्या तज्ज्ञ कंपन्यांची मदत घेणे आवश्यक आहे.”

ब्लॅक बॉक्स रेकॉर्डिंग आणि पारदर्शकता

रोहित पवार यांनी राज्य सरकारकडे एक महत्त्वाची विनंती केली आहे. विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ तपासताना आणि त्यातील रेकॉर्डिंग ऐकताना पवार कुटुंबातील एका सदस्याला तज्ज्ञांसोबत उपस्थित राहण्याची संधी द्यावी. यामुळे तपासात पारदर्शकता राहील आणि सत्य समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विमानतळावर पोलिसांच्या प्रवेशाला मर्यादा असल्याने या प्रकरणात तांत्रिक तज्ज्ञांचे मत सर्वाधिक महत्त्वाचे ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या खळबळजनक दाव्यांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून, सरकार रोहित पवारांच्या या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या