Home / मनोरंजन / Ranveer Singh Threat: अभिनेता रणवीर सिंहला धमकी! व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवून मागितली खंडणी

Ranveer Singh Threat: अभिनेता रणवीर सिंहला धमकी! व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवून मागितली खंडणी

Ranveer Singh Received Death Threat : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. रणवीरला व्हॉट्सअ‍ॅपवर एका व्हॉईस...

By: Team Navakal
Ranveer Singh Threat
Social + WhatsApp CTA

Ranveer Singh Received Death Threat : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. रणवीरला व्हॉट्सअ‍ॅपवर एका व्हॉईस नोटद्वारे जीवे मारण्याची आणि खंडणी मागण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

समोरच्या व्यक्तीने स्वतःचा संबंध कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी असल्याचे सांगितले असून करोडो रुपयांची मागणी केली आहे. रणवीरने या प्रकाराची माहिती त्वरित मुंबई पोलिसांना दिली, त्यानंतर त्याच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

सोसायटी व्यवस्थापनाची तक्रार

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण ज्या ठिकाणी राहतात, तिथे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर सशस्त्र रक्षक आणि पोलिसांच्या वावरामुळे सोसायटीतील इतर रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सोसायटी व्यवस्थापनाने यासंदर्भात पोलिसांना पत्र लिहून इतका कडा पहारा का ठेवण्यात आला आहे, याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. सामान्य नागरिकांना येण्या-जाण्यासाठी अडथळा निर्माण होत असल्याचे व्यवस्थापनाने म्हटले आहे.

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार

बॉलिवूड कलाकारांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घराबाहेर गोळीबाराची घटना घडली होती. या हल्ल्याची जबाबदारीही बिश्नोई टोळीने घेतली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले असून त्यांचा संबंध बिश्नोई गँगशी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. शेट्टी यांच्या घराच्या दिशेने 5 राऊंड फायर करण्यात आले होते, ज्यातील एक गोळी जिमच्या काचेला लागली होती.

रणवीरचे आगामी चित्रपट

इतक्या तणावपूर्ण परिस्थितीतही रणवीर सिंह आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘धुरंधर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. आता तो या चित्रपटाच्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या सिक्वेलसाठी सज्ज होत आहे. हा चित्रपट येत्या 19 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

मुंबई पोलीस सध्या त्या व्हॉईस नोटचा तांत्रिक तपास करत असून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या