Home / महाराष्ट्र / RBI Rules News : कर्जदारांना दिलासा! धमक्या आणि गुंडगिरी रोखण्यासाठी आरबीआयकडून कठोर नियम जारी

RBI Rules News : कर्जदारांना दिलासा! धमक्या आणि गुंडगिरी रोखण्यासाठी आरबीआयकडून कठोर नियम जारी

RBI Rules News : देशाची नियामक संस्था, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जनतेला बँकिंग सेवांची योग्य तरतूद सुनिश्चित करण्यासाठी वेळोवेळी नवीन...

By: Team Navakal
RBI Rules News 
Social + WhatsApp CTA

RBI Rules News : देशाची नियामक संस्था, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जनतेला बँकिंग सेवांची योग्य तरतूद सुनिश्चित करण्यासाठी वेळोवेळी नवीन नियम लागू करत आली आहे. या वेळी हि त्यांनी अशाच पद्धतीचे काही बदल केले आहेत. या संदर्भात, त्यांनी चुकीच्या विक्रीपासून ते कर्ज वसुलीपर्यंत बऱ्याच नियमांमध्ये सुधारणा केले आहेत. त्यामुळे आता त्याचा थेट फायदा कर्जदारांना होणार असल्याचे दिसून येत आहे. बँकांसाठी कर्ज वसुलीची प्रक्रिया अधिक कठोर आणि पारदर्शक करण्यासाठी आरबीआयने कर्ज वसुलीसाठी नवीन मसुदा नियम जारी केल्याचे समोर आले आहे.

अलिकडच्या वर्षांत बँकिंग सुविधांचा विस्तार झपाट्याने होताना दिसत आहे, परंतु काही प्रकरणांमध्ये, वसुली एजंट्सकडून गैरवर्तनाच्या तक्रारी देखील वाढल्याचे दिसत आहे. २०२६च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलली जातील असे संकेत दिले होते. आरबीआयने आता दुसऱ्या दुरुस्ती निर्देशांचा मसुदा, २०२६ मध्ये जारी केला आहे. या प्रस्तावांवर सूचना मागवण्यात आल्या आहेत आणि मंजूर झाल्यानंतर त्या अंमलात देखील आणल्या जाणार आहे.

बँकांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यावर भर-
नवीन तरतुदींनुसार, प्रत्येक बँकेला एक स्पष्ट आणि लेखी वसुली धोरण स्थापित करणे भाग असेल. हप्ते परत करण्यात अडचणी येणाऱ्या व्यक्तींना ओळखणे आणि त्यांचे समुपदेशन करणे आणि उपाय देणे ही बँकेची महत्वाची जबाबदारी असेल. बँका त्यांच्या वेबसाइट, अॅप्स आणि शाखांमध्ये अधिकृत वसुली एजंट्सची यादी देखील सार्वजनिक करतील जेणेकरून कर्जदारांना हे कळण्यास मदत होतील कि ती व्यक्ती अधिकृत आहे की नाही. जर एखाद्या ग्राहकाने बँकेकडे तक्रार दाखल केली असेल, तर तक्रार सोडवल्याशिवाय केस वसुली एजंटकडे पाठवले जाणार नाही. याचा अर्थ प्रथम सुनावणी, नंतर वसुली करण्यात येईल.

वसुली एजंट्सच्या कामाच्या पद्धती निश्चित-
आरबीआयने एजंट्सच्या कामाच्या पद्धती देखील आता श्चित केल्या आहेत. त्यांना फक्त सकाळी ८ ते संध्याकाळी ७ दरम्यान कर्जदाराशी संपर्क साधण्याची परवानगी असणार आहे. त्यांनी कर्जदाराच्या वैयक्तिक जीवनाचा आणि प्रतिष्ठेचा आदर करणे गरजेचे आहे. नातेवाईक, मित्र किंवा सहकाऱ्यांना फोन करणे किंवा त्रास देणे याला सक्त मनाई असेल. लग्न, शोक किंवा सण यासारख्या संवेदनशील प्रसंगी संपर्क साधण्यास देखील मनाई आहे. प्रत्येक पेमेंटनंतर पावती आवश्यक असणार आहे. शिवाय, बँकेला कॉलची संख्या आणि कॉलची अचूक वेळ याची नोंद ठेवणे देखील आवश्यक असेल. यामध्ये संभाषण देखील रेकॉर्ड केले जाईल आणि ग्राहकांना याची आगाऊ माहिती दिली जाणार आहे.

वसुलीच्या नावाखाली कोणत्याही प्रकारची गुंडगिरी खपवली जाणार नाही-
धमक्या, अपशब्द, बदनामी करण्याचा प्रयत्न, सोशल मीडियावर दबाव किंवा खोटी कायदेशीर माहिती देणे या सर्वांवर कडक निषिद्ध आता असणार आहे. रिझर्व्ह बँकेने स्पष्टपणे सांगितले आहे की वसुलीच्या नावाखाली कोणत्याही प्रकारची गुंडगिरी यामध्ये खपवून घेतली जाणार नाही. या नवीन नियमांचा उद्देश स्पष्ट आहे की, बँकांनी त्यांचे पैसे वसूल करावेत, परंतु मानवतेच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून हे पैसे वसूल करावेत. याचा फायदा असा होईल कि सामान्य लोकांचा मानसिक ताण कमी होईल आणि बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल अशी अपेक्षा आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या