Home / लेख / Valentine’s Day Gifts: बजेट कमी आहे पण गर्लफ्रेंडला खूश करायचंय? ५०० रुपयांच्या आत खरेदी करा ‘हे’ लक्झरी वाटणारे सुंदर गिफ्ट्स

Valentine’s Day Gifts: बजेट कमी आहे पण गर्लफ्रेंडला खूश करायचंय? ५०० रुपयांच्या आत खरेदी करा ‘हे’ लक्झरी वाटणारे सुंदर गिफ्ट्स

Valentine’s Day Gifts: व्हॅलेंटाईन्स डे हा प्रेमाचा दिवस असून या दिवशी जोडीदाराला एखादी भेट देऊन आनंद द्विगुणित करण्याची पद्धत आहे....

By: Team Navakal
Valentine's Day Gifts
Social + WhatsApp CTA

Valentine’s Day Gifts: व्हॅलेंटाईन्स डे हा प्रेमाचा दिवस असून या दिवशी जोडीदाराला एखादी भेट देऊन आनंद द्विगुणित करण्याची पद्धत आहे. जेव्हा एखादा मुलगा आपल्या प्रेयसीसाठी खास भेटवस्तू आणतो, तेव्हा त्या दिवसाचा उत्साह आणखीनच वाढतो.

मात्र, अनेकदा सुंदर आणि आकर्षक भेटवस्तू शोधताना खिसा रिकामा होण्याची भीती वाटते. तुमचे बजेट जर कमी असेल, तरी टेन्शन घेण्याची गरज नाही. अशा काही वस्तू आहेत ज्यांची किंमत ५०० रुपयांपेक्षा कमी आहे, पण त्या दिसायला कोणत्याही महागड्या ब्रँडेड वस्तूंपेक्षा कमी नाहीत.

५०० रुपयांच्या आतील बजेट फ्रेंडली गिफ्ट्स

1. ब्रेसलेट – गर्लफ्रेंडला देण्यासाठी ब्रेसलेट हा एक अतिशय उत्तम पर्याय आहे. चांगल्या दर्जाचे आणि आकर्षक डिझाइन असलेले ब्रेसलेट ५०० रुपयांच्या आत सहज उपलब्ध होतात. हे नाजूक ब्रेसलेट तिच्या हाताची शोभा तर वाढवेलच, शिवाय तिला तुमचे प्रेम नेहमी जवळ असल्याचे जाणवून देईल.

2. झुमके किंवा इअरिंग्स – मुलींना दागिन्यांची, विशेषतः कानातल्या झुमक्यांची खूप आवड असते. ५०० रुपयांचे बजेट कानातल्यांसाठी पुरेसे असते. या किमतीत तुम्ही एकापेक्षा जास्त इअरिंग्स किंवा एखादी सुंदर ‘चांदबाली’ खरेदी करू शकता. पारंपारिक आणि वेस्टर्न अशा दोन्ही कपड्यांवर शोभून दिसणारे झुमके मुलींच्या कायम पसंतीस उतरतात.

3. परफ्यूम – एक छान सुवास असलेला परफ्यूम भेट देणे हा नेहमीच एक क्लासिक पर्याय ठरतो. तुम्ही एखाद्या नामांकित ब्रँडचा परफ्यूम किंवा महागड्या सुवासिक द्रव्यांपासून प्रेरित असलेला ‘इंस्पायर्ड परफ्यूम’ निवडून आपल्या प्रेयसीला खुश करू शकता.

4. पेंडेंट – सिल्व्हर, गोल्ड किंवा रोजगोल्ड प्लेटेड पेंडेंट सध्या खूप लोकप्रिय आहेत. हे नाजूक पेंडेंट गळ्यात घातल्यावर अतिशय मोहक दिसतात. कमी खर्चात एखाद्या लक्झरी दागिन्याचा अनुभव देण्यासाठी पेंडेंट हा एक स्वस्त आणि मस्त मार्ग आहे.

5. सुंदर लॅम्प – जर तिला घराची सजावट करायला आवडत असेल, तर एक छोटा आणि कल्पक ‘लॅम्प’ तिला नक्कीच आवडेल.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या