Home / लेख / Ind vs Pak T20 World Cup: भारत-पाक महामुकाबला! मोबाईलवर फ्रीमध्ये पाहता येणार लाईव्ह मॅच; जाणून घ्या कसे?

Ind vs Pak T20 World Cup: भारत-पाक महामुकाबला! मोबाईलवर फ्रीमध्ये पाहता येणार लाईव्ह मॅच; जाणून घ्या कसे?

Ind vs Pak T20 World Cup: जगभरातील क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० विश्वचषकाचा...

By: Team Navakal
Ind vs Pak T20 World Cup
Social + WhatsApp CTA

Ind vs Pak T20 World Cup: जगभरातील क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. हा महामुकाबला मोबाईलवर विनाअडथळा पाहता यावा यासाठी जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) या कंपन्यांनी ‘जिओ हॉटस्टार मोबाईल’चे सबस्क्रिप्शन देणारे विशेष डेटा प्लॅन्स आणले आहेत.

रिलायन्स जिओचे (Jio) प्लॅन्स

  • 100 रुपयांचा प्लॅन: हा एक डेटा पॅक असून यामध्ये 30 दिवसांसाठी 5 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. विशेष म्हणजे, यासोबत 1 महिन्यासाठी जियोहॉटस्टार मोबाईलचे सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते.
  • 195 रुपयांचा प्लॅन: ज्यांना दीर्घकाळ मॅच पाहायच्या आहेत, त्यांच्यासाठी हा प्लॅन उत्तम आहे. यामध्ये 90 दिवसांची वैधता आणि 15 जीबी डेटासह 3 महीने जिओहॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मिळते.
  • (टीप: या दोन्ही प्लॅन्ससाठी तुमच्या नंबरवर कोणताही एक बेस प्लॅन ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे.)

एअरटेलचे (Airtel) प्लॅन्स

  • 100 रुपयांचा प्लॅन: एअरटेलच्या या 30 दिवसांच्या प्लॅनमध्ये 6 जीबी डेटा दिला जातो. तसेच 1 महिन्याचे जियोहॉटस्टार सबस्क्रिप्शन मिळते.
  • 195 रुपयांचा प्लॅन: यामध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह 12 जीबी डेटा मिळतो. याशिवाय ग्राहकांना एअरटेल एक्सस्ट्रीम प्लेचा फायदा आणि 1 महिन्याचे जियोहॉटस्टार सबस्क्रिप्शन दिले जाते.

व्होडाफोन-आयडियाचे (Vi) प्लॅन्स

व्हीआयने सर्वात कमी किमतीत हे सबस्क्रिप्शन देणारे प्लॅन्स सादर केले आहेत:

  • 44 रुपयांचा प्लॅन: हा टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात स्वस्त प्लॅन आहे. यात 1 दिवस 1 जीबी डेटा मिळतो, परंतु जिओहॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मात्र पूर्ण 30 दिवसांसाठी दिले जाते.
  • 101 रुपयांचा प्लॅन: यामध्ये 30 दिवसांसाठी 5 जीबी डेटा आणि 1 महिन्याचे सबस्क्रिप्शन मिळते.
  • 151 आणि 169 रुपयांचे प्लॅन्स: हे दोन्ही प्लॅन्स 90 दिवसांच्या वैधतेसह येतात. 151 रुपयांत 4 जीबी तर 169 रुपयांत 8 जीबी डेटा मिळतो. या दोन्ही प्लॅन्समध्ये 3 महिन्यांचे जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन समाविष्ट आहे.

या सर्व कंपन्यांचे हे प्लॅन्स केवळ ‘डेटा पॅक’ आहेत. त्यामुळे तुमच्या सिमवर कॉल आणि मेसेजिंगसाठी एखादा मूळ रिचार्ज प्लॅन सुरू असणे बंधनकारक आहे. आता क्रिकेट प्रेमी कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय आपल्या स्मार्टफोनवर भारत-पाकिस्तान सामन्याचा आनंद घेऊ शकतील.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या