Home / लेख / Best Mileage Scooters: पेट्रोलच्या खर्चातून सुटका! ‘या’ आहेत देशातील जबरदस्त मायलेज देणाऱ्या टॉप 5 स्कूटर्स

Best Mileage Scooters: पेट्रोलच्या खर्चातून सुटका! ‘या’ आहेत देशातील जबरदस्त मायलेज देणाऱ्या टॉप 5 स्कूटर्स

Best Mileage Scooters in India 2026 : दैनंदिन वापरासाठी स्कूटर खरेदी करताना ग्राहक प्रामुख्याने मायलेज आणि कमी देखभाल खर्चाला प्राधान्य...

By: Team Navakal
Best Mileage Scooters in India 2026
Social + WhatsApp CTA

Best Mileage Scooters in India 2026 : दैनंदिन वापरासाठी स्कूटर खरेदी करताना ग्राहक प्रामुख्याने मायलेज आणि कमी देखभाल खर्चाला प्राधान्य देतात. सध्या बाजारात अशा काही स्कूटर्स आहेत, ज्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून इंधनाची मोठी बचत करतात.

भारतातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या स्कूटर्स:

1. TVS Jupiter 110 – भारतीय घराघरात ओळखीची असलेली टीव्हीएस ज्युपिटर ही एक विश्वासार्ह स्कूटर आहे. यामध्ये 110cc चे इंजिन असून ती प्रति लिटर 56 kmpl पर्यंत मायलेज देते. मोठ्या आकाराचे अंडर-सीट स्टोरेज आणि आरामदायी राइडिंगमुळे ही ग्राहकांची आवडती आहे. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹73,400 इतकी आहे.

2. Yamaha RayZR 125 Fi-Hybrid – मायलेजच्या बाबतीत यामाहाची ही स्कूटर सध्या देशात नंबर 1 वर आहे. हायब्रीड तंत्रज्ञानामुळे ही स्कूटर चक्क 71.33 kmpl पर्यंतचा जबरदस्त मायलेज देते. स्पोर्टी लूक आणि हलक्या वजनामुळे तरुणांमध्ये ही अधिक लोकप्रिय आहे. या स्कूटरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹74,300 पासून सुरू होते.

3. Honda Activa 6G – देशातील सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर म्हणून होंडा ॲक्टिव्हाची ओळख आहे. याचे 110cc इंजिन अतिशय स्मूद असून ती 50 kmpl चा मायलेज देते. मजबूत बॉडी आणि कमी मेंटेनन्समुळे अनेकजण यालाच पसंती देतात. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹75,433 आहे.

4. Yamaha Fascino 125 Fi-Hybrid – ज्यांना स्टाईल आणि मायलेजचे कॉम्बिनेशन हवे आहे, त्यांच्यासाठी फॅसिनो हा उत्तम पर्याय आहे. 125cc इंजिनसह येणारी ही स्कूटर 68.75 kmpl चा मायलेज देते. रेट्रो डिझाइन आणि हायब्रीड सिस्टिम ही याची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. या स्कूटरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹74,910 आहे.

5. Hero Destini 125 – हिरोची डेस्टिनी ही एक पॉवरफुल आणि दणकट फॅमिली स्कूटर आहे. यात 125cc चे इंजिन असून ती सुमारे 59 kmpl चा मायलेज देते. ‘आय3एस’ (i3S) तंत्रज्ञानामुळे ट्रॅफिकमध्ये इंधनाची बचत होण्यास मदत होते. या स्कूटरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹77,715 इतकी आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या