Home / महाराष्ट्र / Shravan 2026 : श्रावण महिन्याचे वेध: यंदा १३ ऑगस्टपासून पवित्र श्रावणारंभ; जाणून घ्या महत्त्व आणि श्रावणी सोमवारच्या तारखा

Shravan 2026 : श्रावण महिन्याचे वेध: यंदा १३ ऑगस्टपासून पवित्र श्रावणारंभ; जाणून घ्या महत्त्व आणि श्रावणी सोमवारच्या तारखा

Shravan 2026 : आषाढ महिना संपत आला की सर्वच आस्तिक आणि शिवभक्तांना वेध लागतात ते म्हणजे अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या...

By: Team Navakal
Shravan 2026
Social + WhatsApp CTA

Shravan 2026 : आषाढ महिना संपत आला की सर्वच आस्तिक आणि शिवभक्तांना वेध लागतात ते म्हणजे अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याचे. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला आध्यात्मिक व धार्मिक दृष्ट्या सर्वोच्च स्थान आहे. हा संपूर्ण महिना विविध व्रतवैकल्ये, धार्मिक विधी, भगवान शिवाची भक्ती, उपासना आणि उपवासासाठी समर्पित असतो. २०२६ या नवीन वर्षात श्रावण महिना कधी सुरू होणार, याविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. यंदाचा श्रावण महिना कधी सुरू होत आहे, त्याचे धार्मिक महत्त्व काय आणि या महिन्यात किती सोमवार येणार आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती पंचांगानुसार समोर आली आहे.

१३ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला प्रारंभ
धार्मिक मान्यतेनुसार, श्रावण महिना हा देवधिदेव भगवान महादेवाचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो. वैदिक पंचांगानुसार, यंदा २०२६ मधील श्रावण महिना गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू होणार असून त्याची सांगता शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी (पिठोरी अमावस्येला) होईल. पावसाळ्याच्या या दिवसांमध्ये संपूर्ण निसर्ग हिरवाईची शाल पांघरून बहरलेला असतो. त्यामुळे श्रावण महिना हा केवळ निसर्गाचाच नव्हे, तर अध्यात्म, भक्ती आणि निसर्गाचा एक अलौकिक व सुंदर संगम मानला जातो. भगवान शिवाला समर्पित असलेला हा काळ ध्यान, साधना आणि आत्मशुद्धीसाठी अत्यंत शुभ मानला गेला आहे.

श्रावणी सोमवारचे विशेष धार्मिक महत्त्व
हिंदू संस्कृतीत श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व असले, तरी या महिन्यातील ‘सोमवार’ हा शिवभक्तांसाठी महाउत्सव असतो. सोमवार हा दिवस प्रत्यक्ष सदाशिवाला समर्पित आहे. अशी दृढ श्रद्धा आहे की, श्रावणी सोमवारी व्रत-उपवास करून शिवलिंगावर बेलपत्र, दूध आणि जलाभिषेक केल्याने भगवान भोलेनाथ अत्यंत प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. म्हणूनच या दिवशी देशभरातील ज्योतिर्लिंगांसह सर्वच शिवमंदिरांमध्ये भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते.

यंदाच्या श्रावण महिन्यात असणार ‘चार’ सोमवार-
श्रावण महिन्याच्या कालावधीनुसार यंदा २०२६ च्या श्रावणात एकूण ४ सोमवार येत आहेत. या चारही दिवशी शिवभक्तांना उपवास करून महादेवाची विशेष पूजा-अर्चना करता येईल. या श्रावणी सोमवारच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत:
पहिला श्रावणी सोमवार: १७ ऑगस्ट २०२६
दुसरा श्रावणी सोमवार: २४ ऑगस्ट २०२६
तिसरा श्रावणी सोमवार: ३१ ऑगस्ट २०२६
चौथा श्रावणी सोमवार: ७ सप्टेंबर २०२६

या पवित्र काळात मनोभावे केलेली शिवभक्ती मानवाला मानसिक शांतता आणि सुख-समृद्धी प्रदान करते, अशी धार्मिक धारणा असल्यामुळे शिवभक्त आतापासूनच या मंगलमयी महिन्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.

( टीप : वरील बातमी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. ह्या बातमीची पुष्टी आम्ही करत नाही. या बातमीत वाचकांच्या भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही)

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या
Raj Thackeray On Maharashtra Politics: "देहविक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईक मिळणारच!"; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा राज्यातील पक्षफोडाफोडीवर घणाघाती हल्ला

Raj Thackeray : लोकांच्या मृत्यूवर हसणाऱ्यांना पाठीशी का घालताय? देवेंद्र फडणवीस, तुमचा आमदार लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसत बसतो.. ‘भाजपच्या नेत्यांना सत्तेचा माज आलाय’; अमित साटम प्रकरणावर राज ठाकरेंचा संताप….