Home / महाराष्ट्र / Lakshminarayan temple Notice : आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील लक्ष्मीनारायण मंदिराला पाडकामाची नोटीस; मंदिर स्थलांतराचा मुद्दा तापला

Lakshminarayan temple Notice : आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील लक्ष्मीनारायण मंदिराला पाडकामाची नोटीस; मंदिर स्थलांतराचा मुद्दा तापला

Lakshminarayan temple Notice – दक्षिण मुंबईतील आर्थर रोड नाका येथील बीएमसी कर्मचारी निवासस्थान परिसरात असलेल्या सुमारे १०० वर्षे (100-year-old) जुन्या...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Lakshminarayan temple Notice – दक्षिण मुंबईतील आर्थर रोड नाका येथील बीएमसी कर्मचारी निवासस्थान परिसरात असलेल्या सुमारे १०० वर्षे (100-year-old) जुन्या श्री लक्ष्मीनारायण मंदिर समितीला मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) आणि संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. पुनर्विकास प्रकल्पांतर्गत (redevelopment project) प्रस्तावित जागेवर मंदिर तात्पुरते स्थलांतरित करण्याच्या हालचालींना परिसरातील स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

ही घटना Mumbai येथील आर्थर रोड (Arthur Road area) परिसरातील असून हा भाग Aditya Thackeray यांच्या वरळी विधानसभेअंतर्गत येतो. मंदिर स्थलांतराच्या मुद्द्यावरून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नोटिशीनुसार, नोटीस प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत लक्ष्मीनारायण मंदिर तात्पुरत्या प्रस्तावित जागेवर स्थलांतरित करून संपूर्ण चाळीची जागा कार्यालयाच्या ताब्यात द्यावी, अन्यथा मनपा नियमांनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. मंदिरासाठी तात्पुरती जागा उपलब्ध करून दिल्यानंतरही स्थलांतर करण्यात आले नसल्याने ही नोटीस बजावण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी मार्च महिन्यात आमदार आदित्य ठाकरे यांनी पालिका-बिल्डरच्या कारभाराविरोधात मंदिरात ठिय्या आंदोलन केले होते. हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले मंदिर तोडू नये, असा इशारा देत बिल्डर आणि पालिकेची दादागिरी चालू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.

आर्थर रोड नाका येथील महानगरपालिका कर्मचारी वसाहतीमध्ये हे श्री लक्ष्मीनारायण मंदिर आहे. या वसाहतीमध्ये मेघवाल समाजबांधव बहुसंख्य आहेत. स्थानिकांच्या मते, लक्ष्मीनारायण मंदिर हे केवळ वसाहतीतील रहिवाशांचे नव्हे तर अनेक मुंबईकरांचे श्रद्धास्थान आहे. इमारत बांधकामात अडथळा ठरत नसतानाही मंदिराला नोटीस का बजावण्यात आली, असा सवाल उपस्थित होत आहे.

महापालिकेकडून मात्र पुनर्विकासनंतर बुद्ध विहार, लक्ष्मीनारायण मंदिर, साईबाबा मंदिर आणि हनुमान मंदिर या धार्मिक वास्तूंना नव्या इमारतीत जागा देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, सुमारे शतकभराची परंपरा असलेले लक्ष्मीनारायण मंदिर पाडण्यास स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला असून, मंदिर मूळ जागेवरच जतन करावे, अशी मागणी होत आहे. या प्रकरणामुळे पुनर्विकास प्रकल्पावरून नव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


हे देखील वाचा –

मुंबई-पुणे हायवेवर वाहतूक कोंडीत अडकलेल्यांचा टोल मिळणार परत; मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर ‘आयआरबी’ नरमली


टी-२० विश्वचषक २०२६: भारत-पाक महामुकाबल्यापूर्वी हार्दिक पांड्या वादाच्या भोवऱ्यात; ‘त्या’ व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण..

पंतप्रधान कार्यालयाचा बदलला पत्ता! ‘सेवा तीर्थ’ या आधुनिक संकुलातून होणार देशाचा कारभार

Web Title:
संबंधित बातम्या