Home / लेख / PM Kisan 22nd Installment:  शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपर्यंत जमा होऊ शकतो पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता

PM Kisan 22nd Installment:  शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपर्यंत जमा होऊ शकतो पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता

PM Kisan 22nd Installment: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक आधार दिला जातो....

By: Team Navakal
PM Kisan 22nd Installment
Social + WhatsApp CTA

PM Kisan 22nd Installment: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक आधार दिला जातो. या योजनेअंतर्गत वर्षाला ६,००० रुपये तीन टप्प्यांत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

आतापर्यंत या योजनेचे २१ हप्ते यशस्वीरित्या वितरित झाले असून, आता शेतकरी २२ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे यंदा होळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होऊ शकतात.

२२ वा हप्ता कधी जमा होणार?

या योजनेचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी देण्यात आला होता. नियमानुसार दर चार महिन्यांनी हा हप्ता दिला जातो. रिपोर्टनुसार, २२ वा हप्ता २४ फेब्रुवारी २०२६ नंतर कधीही जारी केला जाऊ शकतो. अद्याप याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा होळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

काही शेतकऱ्यांना ४,००० रुपये का मिळणार?

यावेळेस अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० ऐवजी थेट ४,००० रुपये जमा होणार आहेत. हे ते शेतकरी आहेत ज्यांना तांत्रिक कारणांमुळे किंवा कागदपत्रांच्या त्रुटीमुळे २१ व्या हप्त्याचे पैसे मिळाले नव्हते. जर अशा शेतकऱ्यांनी आपल्या त्रुटी वेळेत सुधारल्या असतील, तर त्यांना प्रलंबित २१ वा हप्ता आणि नवीन २२ वा हप्ता असे मिळून एकूण ४,००० रुपये दिले जातील.

ई-केवायसी करणे अनिवार्य

हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी अपूर्ण आहे, त्यांचे पैसे अडकू शकतात. शेतकरी पोर्टलवर जाऊन स्वतःहून ओटीपी द्वारे किंवा जवळच्या ग्राहक सेवा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

असे तपासा तुमचे नाव:

१. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर (pmkisan.gov.in) जा.

२. मुख्य पृष्ठावर असलेल्या ‘Know Your Status’ या पर्यायावर क्लिक करा.

३. तुमचा नोंदणी क्रमांक आणि समोर दिसणारा कोड व्यवस्थित भरा.

४. ‘Get Data’ वर क्लिक करताच तुमच्या हप्त्याची स्थिती स्क्रीनवर दिसेल.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या