Smart TV Offers: जर तुम्ही बजेटमध्ये नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर सध्याची वेळ तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. सध्या फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर स्मार्ट टीव्हीवर मोठ्या सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे यामध्ये सोनी, सॅमसंग, एलजी आणि शाओमी यांसारख्या दिग्गज कंपन्यांच्या ३२ इंचाच्या टीव्हीवर भरघोस सवलत, बँक ऑफर्स आणि एक्सचेंज बेनिफिट्स मिळत आहेत.
बजेटमधील सर्वोत्तम स्मार्ट टीव्ही डील्स:
1. Realme (32 inch) QLED Smart Google TV
या यादीतील सर्वात स्वस्त आणि आकर्षक टीव्ही म्हणजे रियलमीचा ३२ इंचाचा क्यूएलईडी टीव्ही. याची मूळ किंमत 23,999 रुपये असली तरी, फ्लिपकार्टवर तो सध्या केवळ 9,599 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही हा टीव्ही दरमहा 783 रुपयांच्या सुलभ हप्त्यावरही घरी नेऊ शकता. याशिवाय जुना टीव्ही बदलल्यास 1,900 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सवलतही मिळू शकते.
2. Xiaomi 80 cm (32 inch) F Series Smart Fire TV
शाओमीचा हा टीव्ही सध्या ॲमेझॉनवर स्वस्त मिळत आहे. 24,999 रुपये किंमत असलेला हा टीव्ही कोणत्याही ऑफरशिवाय सध्या 10,999 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. ग्राहकांसाठी 3,666 रुपयांचा ‘नो कॉस्ट ईएमआय’ पर्याय देखील येथे उपलब्ध आहे.
3. Samsung (32 inch) Smart Tizen TV
सॅमसंगचा हा एलईडी स्मार्ट टीव्ही सध्या केवळ 12,990 रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध आहे, तर याची खरी किंमत 17,900 रुपये आहे. या टीव्हीसाठी हप्ते केवळ 537 रुपयांपासून सुरू होतात. तसेच जुन्या टीव्हीवर 1,900 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंटही दिला जात आहे.
4. LG 80 cms (32 inches) Smart webOS LED TV
एलजीचा टीव्ही घेणाऱ्यांसाठी ॲमेझॉनवर 34% सूट मिळत आहे. यामुळे हा टीव्ही तुम्ही 13,990 रुपयांना आपला बनवू शकता. यावर 4,663 रुपयांचा नो कॉस्ट ईएमआय पर्यायही उपलब्ध आहे, ज्यामुळे खिशावर एकदम भार पडणार नाही.
5. Sony Bravia W820K 80 cm (32 inch) Smart LED
ब्रँड आणि दर्जाला महत्त्व देणाऱ्यांसाठी सोनीचा हा टीव्ही फ्लिपकार्टवर 28% डिस्काउंटसह मिळत आहे. 34,900 रुपये किंमत असलेला हा टीव्ही सध्या 24,990 रुपयांना मिळत आहे. यासाठी तुम्ही दरमहा 3,915 रुपयांचा हप्ता भरू शकता. यावरही 1,900 रुपयांची एक्सचेंज सवलत लागू आहे.










