Home / लेख / Best Mileage Bikes: ‘या’ आहेत देशातील टॉप 5 जबरदस्त मायलेज देणाऱ्या बाईक्स; पाहा किंमत आणि फीचर्स

Best Mileage Bikes: ‘या’ आहेत देशातील टॉप 5 जबरदस्त मायलेज देणाऱ्या बाईक्स; पाहा किंमत आणि फीचर्स

Best Mileage Bikes: भारतीय ग्राहकांसाठी बाईक खरेदी करताना ‘मायलेज’ हा सर्वात महत्त्वाचा विषय असतो. पेट्रोलचे दर वाढत असताना इंधनाची बचत...

By: Team Navakal
Best Mileage Bikes
Social + WhatsApp CTA

Best Mileage Bikes: भारतीय ग्राहकांसाठी बाईक खरेदी करताना ‘मायलेज’ हा सर्वात महत्त्वाचा विषय असतो. पेट्रोलचे दर वाढत असताना इंधनाची बचत करणाऱ्या आणि खिशाला परवडणाऱ्या बाईक्सची मागणी मोठी आहे. अशाच टॉप 5 बाईक्सची माहिती खालीलप्रमाणे आहे:

1. Honda SP 125

आधुनिक फीचर्स आणि स्टायलिश लूकमुळे होंडाची ही बाईक सध्या खूप चर्चेत आहे. यामध्ये 123.94cc चे इंजिन असून ते 10.87 PS ची पॉवर देते. उत्तम परफॉर्मन्स आणि 65 kmpl चा मायलेज यामुळे ही तरुणांची आवडती बाईक ठरत आहे. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 85,000 रुपयांपासून सुरू होते.

2. Hero HF Deluxe

कमी किमतीत दणकट आणि टिकाऊ बाईक हवी असेल तर हिरो एचएफ डिलक्सला पर्याय नाही. 97.2cc इंजिन असलेली ही बाईक प्रामुख्याने ग्रामीण भागात आणि दररोजच्या कामासाठी लोकप्रिय आहे. ही बाईक 65 kmpl पर्यंत मायलेज देते. याची एक्स-शोरूम किंमत 55,992 रुपयांपासून सुरू होते.

3. Hero Splendor Plus XTEC

भारतीय रस्त्यांवर राज्य करणारी ही सर्वात जुनी आणि विश्वासार्ह बाईक आहे. यामधील ‘i3S’ तंत्रज्ञान ट्रॅफिकमध्ये इंजिन बंद करून पेट्रोल वाचवण्यास मदत करते. ही बाईक 70 kmpl पर्यंतचा शानदार मायलेज देते. या बाईकची किंमत 77,428 रुपयांपासून सुरू होते.

4. Honda Shine

125cc सेगमेंटमध्ये स्मूद इंजिन आणि रिलायबिलिटीसाठी होंडा शाइन ओळखली जाते. यात 10.5 लिटरची इंधन टाकी असून ही बाईक 55 kmpl पर्यंत मायलेज देते. फॅमिली बाईक म्हणून ही एक उत्तम निवड आहे. याची एक्स-शोरूम किंमत 78,789 रुपयांपासून 83,148 रुपयांपर्यंत जाते.

5. Hero Xtreme 125R

जर तुम्हाला स्पोर्ट्स बाईकचा फील आणि चांगला मायलेज एकाच बाईकमध्ये हवा असेल, तर ही बाईक तुमच्यासाठी आहे. 125cc एअरकूल्ड इंजिनसह येणारी ही बाईक चक्क 66 kmpl चा मायलेज देते. याची एक्स-शोरूम किंमत 89,000 रुपयांपासून सुरू होते.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या