Home / महाराष्ट्र / BMC Committee: मुंबई महापालिकेत सत्तेची गणिते फिट्ट! महत्त्वाच्या समित्यांवर कोणाला मिळाली संधी? वाचा

BMC Committee: मुंबई महापालिकेत सत्तेची गणिते फिट्ट! महत्त्वाच्या समित्यांवर कोणाला मिळाली संधी? वाचा

BMC Committee Members Appointment 2026 : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या ज्यांच्या हातात असतात, त्या महत्त्वाच्या वैधानिक समित्यांच्या सदस्यांची निवड प्रक्रिया...

By: Team Navakal
BMC Committee
Social + WhatsApp CTA

BMC Committee Members Appointment 2026 : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या ज्यांच्या हातात असतात, त्या महत्त्वाच्या वैधानिक समित्यांच्या सदस्यांची निवड प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे.

महापौर रितू तावडे यांच्या नेतृत्वाखालील महापालिकेत स्थायी, सुधार, शिक्षण आणि बेस्ट (BEST) या चार प्रमुख समित्यांवरील नियुक्त्यांमध्ये भाजपने आणि त्यांच्या मित्रपक्षांनी अत्यंत सावधपणे राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रक्रियेत निष्ठावंतांना डावलून पक्षांतर केलेल्यांना झुकते माप देण्यात आल्याची आणि घराणेशाही जपल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

पक्षांतर केलेल्यांना ‘सुधार’ अन् ‘स्थायी’ची भेट

निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांना भाजपने महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. शिवसेना (UBT) मधून आलेल्या तेजस्वी घोसाळकर यांची वर्णी ‘सुधार समिती’वर करण्यात आली आहे.

तसेच, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या राखी जाधव यांना सर्वाधिक शक्तीशाली मानल्या जाणाऱ्या ‘स्थायी समिती’वर स्थान मिळाले आहे. यासोबतच चंदन शर्मा यांनाही सुधार समितीवर पाठवून भाजपने नवीन सदस्यांना बळ दिले आहे.

नातेवाईक आणि अनुभवी चेहऱ्यांचा मेळ

राजकीय प्रभावी नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांना या वेळी पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर या दोघांनाही पुन्हा एकदा ‘स्थायी समिती’वर स्थान मिळाले आहे. महापौरपदाच्या शर्यतीत असलेल्या राजेश्री शिरवडकर यांची रवानगी ‘शिक्षण समिती’वर करण्यात आली आहे.

आघाडीचा प्रभाव आणि राजकीय समीकरणे

शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या (अजित पवार आणि शरद पवार) संयुक्त आघाडीचा परिणाम समित्यांच्या रचनेवर दिसून आला आहे.

  • स्थायी समिती: अजित पवार गटाच्या डॉ. सईदा खान यांची निवड येथे करण्यात आली असून, आर्थिक निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.
  • सुधार समिती: शरद पवार गटाचे अजित रावराणे यांना या समितीवर संधी देण्यात आली आहे, जे मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष ठेवतील.

या नियुक्त्यांमुळे आगामी काळात मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर आणि विकासकामांवर कोणत्या गटाचे वर्चस्व राहील, याचे चित्र स्पष्ट झाले आहे. अनुभवी नगरसेवकांना सोबत घेतानाच, बिगर नगरसेवकांचे पुनर्वसन करण्यासाठी काही नामनिर्देशित सदस्यांना शिक्षण आणि बेस्ट समितीवर स्थान देण्यात आले आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या