Home / क्रीडा / T20 World Cup: टीम इंडियाचा पुढचा सामना कोणाविरुद्ध आणि कधी? जाणून घ्या

T20 World Cup: टीम इंडियाचा पुढचा सामना कोणाविरुद्ध आणि कधी? जाणून घ्या

T20 World Cup: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारतीय संघाने आपला दबदबा कायम राखला आहे. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करून...

By: Team Navakal
T20 World Cup
Social + WhatsApp CTA

T20 World Cup: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारतीय संघाने आपला दबदबा कायम राखला आहे. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करून भारताने विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली असून सुपर-8 मधील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सध्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे. आता चाहत्यांचे लक्ष भारताच्या चौथ्या आणि शेवटच्या साखळी सामन्याकडे लागले आहे.

भारताचा आतापर्यंतचा प्रवास

भारतीय संघाने या स्पर्धेत विजयाचा धडाका लावला आहे:

  1. पहिला सामना: अमेरिकेविरुद्ध (USA) 29 धावांनी विजय मिळवून मोहिमेची यशस्वी सुरुवात केली.
  2. दुसरा सामना: नामीबियाला 93 धावांच्या मोठ्या फरकाने नमवले. भारताने 210 धावांचे लक्ष्य दिले होते, ज्यासमोर नामीबियाचा संघ 116 धावांवर गारद झाला.
  3. तिसरा सामना: ग्रुप-ए मधील हाय-व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानवर मात करून विजयाची हॅट्ट्रिक साधली.

पुढचा सामना कधी आणि कोणाशी?

भारताचा साखळी फेरीतील चौथा आणि अखेरचा सामना युरोपीय देश नीदरलँड विरुद्ध होणार आहे. हा स्पर्धेतील 18 वा सामना असेल.

  • तारीख: 18 फेब्रुवारी 2026 (बुधवार)
  • वेळ: संध्याकाळी 7:00 वाजता (टॉस संध्याकाळी 6:30 वाजता)
  • ठिकाण: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

अहमदाबादमध्ये रंगणार थरार

जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. या मैदानावर भारतीय संघाचा रेकॉर्ड अत्यंत उत्कृष्ट राहिला आहे. घरच्या मैदानाचा फायदा घेत टीम इंडिया विजयाचा ‘चौका’ मारण्यासाठी आणि दिमाखात बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी सज्ज झाली आहे. डच संघाला हलक्यात न घेता भारत आपली पूर्ण ताकद मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.

Web Title:
संबंधित बातम्या