Home / लेख / Mango Side Effects: उन्हाळ्यात ‘आमरस’ आवडीने खात असाल तर सावधान! ‘या’ 5 चुकांमुळे बिघडू शकते पोट

Mango Side Effects: उन्हाळ्यात ‘आमरस’ आवडीने खात असाल तर सावधान! ‘या’ 5 चुकांमुळे बिघडू शकते पोट

Mango Side Effects: उन्हाळ्याचा मोसम सुरू झाला की आंबा खाण्यासाठी खवय्ये आतुरलेले असतात. कोणाला थंडगार आंब्याचे काप आवडतात, तर कोणाला...

By: Team Navakal
Mango Side Effects: उन्हाळ्यात 'आमरस' आवडीने खात असाल तर सावधान! 'या' 5 चुकांमुळे बिघडू शकते पोट
Social + WhatsApp CTA

Mango Side Effects: उन्हाळ्याचा मोसम सुरू झाला की आंबा खाण्यासाठी खवय्ये आतुरलेले असतात. कोणाला थंडगार आंब्याचे काप आवडतात, तर कोणाला आमरस किंवा मॅंगो शेक प्यायला आवडतो. स्वाद आणि पोषणाने परिपूर्ण असलेला हा फळांचा राजा बहुतेकांचा आवडता आहे. मात्र, अनेकांना आंबा खाल्ल्यानंतर पोटात गडबड झाल्यासारखे वाटते.

काही लोकांना गॅस होतो, तर काहींना पोट जड होणे किंवा थेट जुलाब लागणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आंबा हे फळ आरोग्यासाठी वाईट नाही, परंतु तो खाण्याची पद्धत, त्याचे प्रमाण आणि तुमच्या शरीराची पचनक्षमता यावर सर्व काही अवलंबून असते. एकाच वेळी अतिप्रमाणात आंबे खाल्ल्यानेच हा त्रास होतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

आंबा खाल्ल्याने पोट का बिघडते? पाहा ५ मुख्य कारणे

  • फायबरचे अतिप्रमाण: आंब्यामध्ये फायबरचे प्रमाण खूप चांगले असते, जे पचनासाठी उत्तम मानले जाते. मात्र, जेव्हा तुम्ही एकाच वेळी 3 ते 4 आंबे खाता, तेव्हा शरीरात फायबरचे प्रमाण अचानक वाढते. यामुळे पोटावर ताण येतो आणि जुलाब सुरू होऊ शकतात.
  • नॅचरल शुगर (फ्रक्टोज): आंब्यामध्ये नैसर्गिक साखर म्हणजेच फ्रक्टोज असते. काही लोकांचे शरीर ही साखर सहजपणे पचवू शकत नाही. अशा वेळी पोट फुगणे, गॅस आणि पोटात कळा येणे असा त्रास सुरू होतो.
  • जास्त पिकलेले आंबे: जास्त पिकलेले आंबे चवीला खूप गोड लागतात, पण ते काही जणांना अ‍ॅसिडिटी आणि पोटात जळजळ निर्माण करू शकतात. विशेषतः रिकाम्या पोटी जास्त पिकलेले आंबे खाणे टाळावे.
  • बॅक्टेरियाचा संसर्ग: उन्हाळ्यात फळे लवकर खराब होतात. आंबे नीट न धुता खाणे किंवा कापलेले आंबे जास्त वेळ उघड्यावर ठेवल्याने त्यात बॅक्टेरिया तयार होतात. यामुळे फूड पॉइझनिंग होऊन उलट्या आणि जुलाब होऊ शकतात.
  • केमिकलयुक्त आंबे: बाजारात अनेकदा आंबे लवकर पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडसारख्या केमिकल्सचा वापर केला जातो. असे आंबे खाल्ल्याने आतड्यांना सूज येऊ शकते आणि पोट बिघडते.

आंबा खाताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

आंब्यामधून शरीराला अनेक महत्त्वाची जीवनसत्त्वे मिळतात, त्यामुळे आंबा खाणे पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. फक्त खाताना खालील गोष्टी लक्षात ठेवाव्या:

  1. एकाच वेळी खूप जास्त आंबे खाऊ नका, प्रमाणात सेवन करा.
  2. आंबे खाण्यापूर्वी किमान 1 ते 2 तास पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर स्वच्छ धुवा.
  3. कापलेला आंबा जास्त वेळ फ्रीजबाहेर किंवा उघड्यावर ठेवू नका.
  4. जास्त तेलकट आणि मसालेदार जेवणासोबत आंबा खाणे टाळा.
  5. तुमचे पोट संवेदनशील असेल, तर सुरुवातीला कमी प्रमाणातच आंबा खा.

(टीप: ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. पोटाचा त्रास जास्त असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

हे देखील वाचा – Cockroach Janta Party : ‘कॉक्रोच जनता पार्टी’ नक्की काय आहे? कोणी केली या पक्षाची स्थापना? जाणून घ्या

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या