Home / लेख / Best 5G Phones: बजेट 20 हजार पण फीचर्स प्रीमियम! सॅमसंगपासून मोटोरोलापर्यंत ‘हे’ आहेत बेस्ट 5जी स्मार्टफोन्स

Best 5G Phones: बजेट 20 हजार पण फीचर्स प्रीमियम! सॅमसंगपासून मोटोरोलापर्यंत ‘हे’ आहेत बेस्ट 5जी स्मार्टफोन्स

Best 5G Phones Under 20000 India 2026 : भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये सध्या कमालीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. २०२६ च्या सुरुवातीलाच...

By: Team Navakal
Best 5G Phones
Social + WhatsApp CTA

Best 5G Phones Under 20000 India 2026 : भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये सध्या कमालीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. २०२६ च्या सुरुवातीलाच अनेक कंपन्यांनी २०,००० रुपयांच्या रेंजमध्ये आपले फ्लॅगशिप लेव्हलचे फीचर्स असणारे फोन लाँच केले आहेत. तुम्हीही नवीन फोन घेण्याच्या विचारात असाल, तर हे ५ पर्याय सध्या बाजारात सर्वात ‘हिट’ ठरत आहेत.

बजेटमधील ५ जबरदस्त ५जी फोन्स:

1. Motorola Moto G67 Power 5G

मोटोरोलाने या फोनमध्ये पॉवर आणि टिकाऊपणाचा मेळ घातला आहे. ७०००mAh ची अवाढव्य बॅटरी हे याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

  • किंमत: सुमारे 17,999 रुपये.
  • फीचर्स: ६.७० इंच १२०Hz डिस्प्ले, Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर आणि ‘मिलिटरी ग्रेड’ बिल्ड क्वालिटी. स्वच्छ अँड्रॉइड अनुभवासाठी हा फोन बेस्ट आहे.

2. Realme Narzo 90 5G

रिअलमीचा हा फोन वेगवान चार्जिंग आणि जबरदस्त बॅटरीसाठी ओळखला जातो. ६०W च्या फास्ट चार्जिंगमुळे ७०००mAh ची बॅटरी सुद्धा झटपट चार्ज होते.

  • किंमत: सुमारे 16,999 रुपये.
  • फीचर्स: ५०MP चा एआय सेल्फी कॅमेरा आणि MediaTek Dimensity 6400 Max प्रोसेसर. फोटोग्राफी आणि गेमिंगसाठी हा एक समतोल पर्याय आहे.

3. Nothing Phone 3a Lite 5G

जर तुम्हाला स्टायलिश आणि वेगळ्या डिझाईनचा फोन हवा असेल, तर नथिंगचा हा फोन उत्तम आहे. याचा युजर इंटरफेस अतिशय स्मूथ आहे.

  • किंमत: सुमारे 19,799 रुपये.
  • फीचर्स: ६.७७ इंच AMOLED १२०Hz डिस्प्ले, ५०MP ट्रिपल रिअर कॅमेरा आणि Dimensity 7300 Pro प्रोसेसर. हा फोन दिसायला अतिशय प्रीमियम वाटतो.

4. Lava Blaze Duo 3

भारतीय कंपनी लावाने या फोनमध्ये चक्क दोन स्क्रीन दिले आहेत. फोनच्या मागील बाजूस १.६० इंचाचा छोटा टच डिस्प्ले आहे, जो सेल्फी घेण्यासाठी किंवा नोटिफिकेशन्स पाहण्यासाठी उपयुक्त ठरतो.

  • किंमत: सुमारे 16,999 रुपये.
  • फीचर्स: ६.६७ इंच मुख्य AMOLED डिस्प्ले, ५०MP सोनी सेन्सर आणि ३३W फास्ट चार्जिंग.

5. Poco M8 5G

पोकोचा हा फोन परफॉर्मन्सच्या बाबतीत आघाडीवर आहे. कमी किमतीत जास्त रॅम आणि स्टोरेज देण्याची पोकोची परंपरा या फोनमध्येही कायम आहे.

  • किंमत: सुमारे 17,200 रुपये.
  • फीचर्स: ६.७७ इंच १२०Hz डिस्प्ले, Snapdragon 6 Gen 3 प्रोसेसर आणि २०MP सेल्फी कॅमेरा.
Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या