Home / महाराष्ट्र / Sanjay Raut on Ind Vs pak T20 : टी-२० विश्वचषक २०२६; भारत-पाक सामन्यातील ‘हस्तांदोलन’ वादावरून संजय राऊतांचा संताप; खेळाडू आणि सरकारवर डागली तोफ

Sanjay Raut on Ind Vs pak T20 : टी-२० विश्वचषक २०२६; भारत-पाक सामन्यातील ‘हस्तांदोलन’ वादावरून संजय राऊतांचा संताप; खेळाडू आणि सरकारवर डागली तोफ

Sanjay Raut on Ind Vs pak T20 : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर ६१ धावांनी मात करत ‘सुपर-८’...

By: Team Navakal
Sanjay Raut on Ind Vs pak T20
Social + WhatsApp CTA

Sanjay Raut on Ind Vs pak T20 : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर ६१ धावांनी मात करत ‘सुपर-८’ फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. मैदानावरील कामगिरीत भारताने वर्चस्व गाजवले असले, तरी सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्याचे टाळल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वर्तणुकीवर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी टीका केल्यानंतर, आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (BCCI) अत्यंत बोचरी टीका केली आहे.

हा खेळ नव्हे, तर केवळ आर्थिक व्यवहार-
संजय राऊत यांनी या सामन्याला ‘भारत विरुद्ध पाकिस्तान’ न म्हणता ‘जय शाह विरुद्ध पाकिस्तान’ असा आर्थिक सामना संबोधले आहे. ते म्हणाले की, हा सामना केवळ पैशासाठी खेळवला गेला. जर तुम्ही मैदानावर खेळायला उतरता, तर तिथे खिलाडूवृत्ती असणे अनिवार्य आहे. सामना संपल्यानंतर एकमेकांना हस्तांदोलन न करणे हा निव्वळ मूर्खपणा असून भारतीय खेळाडूंनी असे वागणे लज्जास्पद आहे. “खेळाडूंमध्येही आता अंधभक्ती भिनली असून, ड्रेसिंग रूममधून त्यांना अशा प्रकारे वागण्याच्या धमक्या किंवा सूचना दिल्या जात आहेत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शिवसेनेची ठाम भूमिका: ‘जोपर्यंत बदला नाही, तोपर्यंत खेळ नाही’-
पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट संबंधांवर बोलताना राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट केली. जोपर्यंत सीमेवरील दहशतवाद थांबत नाही आणि पहलगाम सारख्या घटनांचा बदला घेतला जात नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतेही संबंध नकोत, ही शिवसेनेची जुनी आणि ठाम भूमिका असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “एक तर त्यांच्याशी खिलाडूवृत्तीने खेळा किंवा त्यांच्याशी खेळणे पूर्णपणे बंद करा; ही दुटप्पी भूमिका देशाला शोभणारी नाही,” असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.

सट्टेबाजी आणि दहशतवादाचा संबंध-
यावेळी राऊत यांनी सरकारवर गंभीर आरोप करताना सांगितले की, पाकिस्तानसोबतच्या सामन्यांमुळे केवळ सट्टेबाजीला ऊत येतो आणि त्यातून हजारो कोटी रुपये निर्माण होतात. यातील मोठा हिस्सा पाकिस्तानकडे आणि पर्यायाने दाऊद इब्राहिमच्या टोळीकडे जातो, ज्याचा वापर पुन्हा भारतांविरुद्ध दहशतवाद पसरवण्यासाठी केला जातो. हे सर्व माहित असूनही केवळ आर्थिक फायद्यासाठी सरकार आणि क्रिकेट बोर्ड हे सामने खेळवत असल्याचा आरोप त्यांनी केला. भारतीय जनता पक्ष आणि सरकारची ही दादागिरी खेळाडूंवर लादली जात असून, अशा प्रकारे हस्तांदोलन नाकारून ‘बेगडी राष्ट्रवाद’ जपण्यापेक्षा सामनाच न खेळणे हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या