Home / लेख / Nissan Gravite : देशातील सर्वात स्वस्त 7-सीटर ‘कार लाँच; किंमत फक्त 5.65 लाखांपासून सुरू, पाहा फीचर्स

Nissan Gravite : देशातील सर्वात स्वस्त 7-सीटर ‘कार लाँच; किंमत फक्त 5.65 लाखांपासून सुरू, पाहा फीचर्स

Nissan Gravite : जपानी ऑटोमोबाईल दिग्गज निसानने आपली बहुप्रतिक्षित ७-सीटर कार ‘निसान ग्रेव्हाईट’ अधिकृतपणे विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. गुरुत्वाकर्षणापासून प्रेरणा...

By: Team Navakal
Nissan Gravite
Social + WhatsApp CTA

Nissan Gravite : जपानी ऑटोमोबाईल दिग्गज निसानने आपली बहुप्रतिक्षित ७-सीटर कार ‘निसान ग्रेव्हाईट’ अधिकृतपणे विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. गुरुत्वाकर्षणापासून प्रेरणा घेऊन या कारचे नाव ठेवण्यात आले असून, ही कार मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

देशातील सर्वात परवडणारी ७-सीटर कार

निसान ग्रेव्हाईटची सुरुवातीची किंमत ५.६५ लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही कार सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या रेनो ट्रायबरपेक्षाही स्वस्त आहे. निसानने पहिल्या ५,००० ग्राहकांसाठी ही विशेष सुरुवातीची किंमत जाहीर केली आहे. इच्छुक ग्राहक आज रात्रीपासून कंपनीच्या वेबसाईटवर किंवा डीलरशिपवर जाऊन कारची बुकिंग करू शकतात.

आकर्षक डिझाइन आणि लूक

ही कार दिसायला स्टायलिश असून यात अनेक आधुनिक बदल करण्यात आले आहेत:

  • फ्रंट लूक: हनीकॉम्ब पॅटर्न असलेली ग्रिल आणि नवीन सिग्नेचर डीआरएलसह हेडलॅम्प्स दिले आहेत.
  • डिझाइन: सी-शेपचे सिल्व्हर इन्सर्ट असलेले नवीन बंपर आणि आकर्षक अलॉय व्हील्स कारला प्रीमियम लूक देतात.
  • रंग पर्याय: फॉरेस्ट ग्रीन, ओनिक्स ब्लॅक, ब्लेड सिल्वर, स्नो व्हाईट आणि मेटॅलिक ग्रे अशा ५ रंगांत ही कार उपलब्ध आहे.

इंजिन, परफॉर्मन्स आणि सीएनजी

निसान ग्रेव्हाईटमध्ये १.० लिटरचे ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे ७२ एचपी पॉवर आणि ९६ न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते.

  • मायलेज: मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये १९.३ किमी आणि एएमटीमध्ये १९.६ किमी प्रति लिटर मायलेजचा दावा कंपनीने केला आहे.
  • सीएनजी: लवकरच ही कार ड्युअल-सिलेंडर सीएनजी किटसह उपलब्ध होणार आहे.
  • देखभाल खर्च: या कारचा देखभाल खर्च अवघा ४० पैसे प्रति किलोमीटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

कॅबिन आणि हाय-टेक फीचर्स

कारमध्ये ५+२ आसन व्यवस्था असून यात ८ इंचाची टचस्क्रीन, ७ इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, क्रूझ कंट्रोल आणि ६ एअरबॅग्स यांसारखे सुरक्षा फीचर्स दिले आहेत.

तसेच, निसानने ‘लॉन्च एडिशन’ देखील सादर केले असून त्याचे केवळ १,००१ युनिट्स तयार केले जातील. यात जेबीएल साऊंड सिस्टम आणि डॅशकॅमसारखे अतिरिक्त फीचर्स मिळतील.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या