Home / देश-विदेश / Nishikant Dubey : बिहार, झारखंड, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेश राज्यांतील कामगार काढले तर मुंबई बंद होईल ! खा. दुबे पुन्हा बरळले! महाराष्ट्रात संताप

Nishikant Dubey : बिहार, झारखंड, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेश राज्यांतील कामगार काढले तर मुंबई बंद होईल ! खा. दुबे पुन्हा बरळले! महाराष्ट्रात संताप

Nishikant Dubey – मुंबई आणि महाराष्ट्राबाबत सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारे भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा मुंबईविषयी...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA


Nishikant Dubey – मुंबई आणि महाराष्ट्राबाबत सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारे भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा मुंबईविषयी मुक्ताफळे उधळत नव्या वादाला तोंड फोडले आहे. बिहार, झारखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड नसते तर मुंबईत काय दिसले असते? असे वक्तव्य करत त्यांनी महाराष्ट्राच्या योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या या नव्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा संताप व्यक्त होत आहे. सतत मराठी माणसाला खिजवणारी भाषा करणाऱ्या खा. दुबेंना भाजपा आवर घालणार आहे की, नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.


मुंबई आणि महाराष्ट्रातील स्थलांतरितांच्या मुद्यावर भाष्य करताना निशिकांत दुबे म्हणाले की, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, बंगालचे लोक मुंबई व महाराष्ट्रात कामासाठी जातात.  मुंबईतील लोकांना मात्र वाटते की, हे लोक त्यांच्या वाट्याचे घेत आहेत. बिहारी कब्जा करत आहे. त्यांना वाटते की, मुंबई व महाराष्ट्र नसते तर कदाचित देश चालणार नाही. या विचारामुळेच आमच्या विरूध्द आंदोलने करतात. पण बिहार, झारखंड, मध्य प्रदेश व छत्तीसगड नसते तर मुंबईने काय पाहिले असते? स्टेट बँक ऑफ इंडिया संपूर्ण देशातून कर गोळा करते. एलआयसी, सेबी, एनएसई कर देते. टाटाचे मुख्यालयही तिथे आहे. झारखंड नसते तर कधी टाटा, बिर्ला झाले नसते. या देशातील 40 ते 45 टक्के कोळसा व खनिज संपत्ती केवळ झारखंडकडे आहे. आम्ही राजे आहोत. परंतु आमचे दुर्दैव की, येथील वातावरण त्यांना सोसत नाही. त्यामुळे सर्व लोकांनी आपली मुख्यालये मुंबईत बनवली. ते कर भरतात त्या जोरावर मुंबईचे स्वतःला राजे समजतात. या लोकशाहीत जनता राजा आहे. राज ठाकरेंनी गेल्या वर्षी मला धमकी दिली होती, पण त्यानंतर मी 4 वेळा मुंबईला जाऊन आलो. तेथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचीही भेट घेतली.


खा. निशिकांत दुबे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी माणसाला डिवचणारी वक्तव्ये करत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षी हिंदी सक्तीविरोधी भूमिका घेतल्यानंतर दुबे सातत्याने त्यांच्या विरोधात बोलत आहेत. ते म्हणतात की, हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा. महाराष्ट्राच्या बाहेर येण्याची हिंमत दाखवा. हम हिंदी का विरोध करने वालों को पटक पटक कर मारेंगे, अशी गरळ त्यांनी ओकली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी मुंबईतील महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत निशिकांत दुबे यांचा चांगलाच समाचार घेतला होता. ते म्हणाले होते की, दुबे नावाचा कोणीतरी भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणाला, मराठी लोकांना आम्ही पटकून पटकून मारू… तू आम्हाला पटक पटकके मारणार? दुबेला मी सांगतो…दुबे..तुम मुंबई में आ जावो…मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे…,  महाराष्ट्रात येऊन कुणीही मराठी व्यक्तीच्या अंगावर आला तर त्याला ठेचायचे. आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाही. त्यानंतर दुबे यांनी राज यांचा हा व्हिडिओ पोस्ट करत, मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली? असा उपरोधिक पलटवार केला होता. आज त्यांनी पुन्हा कारण नसताना मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल विखारी वक्तव्य केले आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या