Home / देश-विदेश / Kerala Renamed Keralam: आता ‘केरळ’ नाही, ‘केरळम’ म्हणा! केंद्र सरकारकडून नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी; पाहा संपूर्ण प्रक्रिया

Kerala Renamed Keralam: आता ‘केरळ’ नाही, ‘केरळम’ म्हणा! केंद्र सरकारकडून नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी; पाहा संपूर्ण प्रक्रिया

Kerala Renamed Keralam: दक्षिण भारतातील महत्त्वाचे राज्य असलेल्या केरळचे नाव आता अधिकृतपणे बदलण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी...

By: Team Navakal
Kerala Renamed Keralam
Social + WhatsApp CTA

Kerala Renamed Keralam: दक्षिण भारतातील महत्त्वाचे राज्य असलेल्या केरळचे नाव आता अधिकृतपणे बदलण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने केरळचे नाव बदलून ‘केरळम’ करण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदिल दाखवला आहे. या निर्णयानंतर आता घटनात्मक प्रक्रियेनुसार राज्याचे नाव बदलण्यासाठी पावले उचलली जातील.

नाव बदलण्याची घटनात्मक प्रक्रिया

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता भारताचे राष्ट्रपती ‘केरळ (नाव बदलणे) विधेयक 2026’ केरळ विधानसभेकडे पाठवतील. भारतीय संविधानाच्या कलम 3 नुसार, राज्याचे नाव बदलण्यापूर्वी संबंधित विधानसभेचे मत जाणून घेणे आवश्यक असते. विधानसभेचे मत मिळाल्यानंतर, केंद्र सरकार राष्ट्रपतींच्या शिफारशीने हे विधेयक संसदेत मांडेल. संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर झाल्यानंतर केरळचे नाव अधिकृतपणे ‘केरळम’ होईल.

मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचा पाठपुरावा

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी 2023 आणि 2024 मध्ये विधानसभेत राज्याचे नाव बदलण्याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. केरळ विधानसभेने दोनदा हा प्रस्ताव एकमताने मंजूर करून केंद्राकडे पाठवला होता. मल्याळम भाषेत राज्याचे नाव ‘केरळम’ असेच आहे. 1 नोव्हेंबर 1956 रोजी भाषावार प्रांतरचनेनुसार राज्याची निर्मिती झाली होती, मात्र संविधानाच्या पहिल्या अनुसूचीमध्ये राज्याचे नाव ‘केरळ’ असे नोंदवण्यात आले होते. ते बदलून आता भाषेनुसार ‘केरळम’ करण्याची मागणी पूर्ण झाली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय

केरळमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाकडून अद्याप तारखा जाहीर झाल्या नसली तरी, त्यापूर्वीच केंद्राने हा भावनिक आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या