Home / लेख / Weight Loss Tips: वजन कमी करण्याचे ‘हे’ ७ मार्ग किती प्रभावी? जाणून घ्या आहार, औषधे आणि शस्त्रक्रियेचे सत्य

Weight Loss Tips: वजन कमी करण्याचे ‘हे’ ७ मार्ग किती प्रभावी? जाणून घ्या आहार, औषधे आणि शस्त्रक्रियेचे सत्य

Weight Loss Tips: वाढलेले वजन कमी करणे हे अनेकांसाठी मोठे आव्हान असते. गुगल किंवा सोशल मीडियावरील अर्धवट माहितीवर विसंबून राहण्यापेक्षा,...

By: Team Navakal
Weight Loss Tips
Social + WhatsApp CTA

Weight Loss Tips: वाढलेले वजन कमी करणे हे अनेकांसाठी मोठे आव्हान असते. गुगल किंवा सोशल मीडियावरील अर्धवट माहितीवर विसंबून राहण्यापेक्षा, विविध वैद्यकीय पर्यायांची शास्त्रीय माहिती असणे गरजेचे आहे. वजन कमी करण्याच्या ७ प्रमुख पद्धती आणि त्यांचे मानवी शरीरावर होणारे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:

१. अल्युरियन बलून (Swallowable Balloon)

या पद्धतीत कोणतीही शस्त्रक्रिया, एंडोस्कोपी किंवा भूल दिली जात नाही. रुग्ण एक कॅप्सूल गिळतो, जी पोटात गेल्यावर एका फुग्याचे रूप घेते. यामुळे ४ ते ६ महिने पोटाची अन्नाची क्षमता मर्यादित होते आणि १०-१५ टक्के वजन कमी होऊ शकते. ही एक तात्पुरती पण वेगवान रिझल्ट देणारी पद्धत आहे.

२. बेरियाट्रिक शस्त्रक्रिया (Bariatric Surgery)

ज्यांचे वजन अत्यंत जास्त आहे (बीएमआय ४० पेक्षा अधिक), त्यांच्यासाठी हा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो. ही केवळ वजन कमी करण्याची प्रक्रिया नसून मधुमेह आणि रक्तदाबासारख्या आजारांना उलटवण्याची एक वैज्ञानिक पद्धत आहे. यामुळे २५-३५ टक्के वजन कमी होऊ शकते, मात्र यासाठी कायमस्वरूपी जीवनशैलीत बदल करावा लागतो.

३. आहार आणि जीवनशैलीतील बदल (Natural Way)

हा वजन कमी करण्याचा सर्वात पायाभूत आणि नैसर्गिक मार्ग आहे. घरचा संतुलित आहार, सातत्यपूर्ण व्यायाम आणि पुरेशी झोप यामुळे चयापचय क्रिया (Metabolism) मुळापासून सुधारते. ५ ते ८ किलो वजन कमी करण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे, पण यात शिस्त मोडल्यास वजन पुन्हा वाढण्याचा धोका असतो.

४. ओझिम्पिक आणि वेगोवी इंजेक्शन्स (Weight Loss Jabs)

सध्या जगभरात या इंजेक्शन्सची मोठी क्रेझ आहे. हे मुळात मधुमेहावरील उपचार आहेत, जे भूक पूर्णपणे दाबून टाकतात. वेगोवीमुळे शरीराचे १५ टक्क्यांपर्यंत वजन कमी होऊ शकते. मात्र, हे उपचार थांबवल्यानंतर वजन पुन्हा वेगाने वाढते, त्यामुळे हा एक दीर्घकालीन खर्चिक प्रवास ठरू शकतो.

५. माऊंजरो (Mounjaro)

हे एक प्रगत इंजेक्शन असून ते शरीरातील दोन वेगवेगळ्या रिसेप्टर्सवर काम करते. अभ्यासानुसार, यामुळे २२ टक्यांपर्यंत वजन घटू शकते. ज्या रुग्णांवर इतर औषधांचा परिणाम होत नाही, त्यांच्यासाठी हा पर्याय निवडला जातो.

६. तोंडावाटे घेण्याच्या गोळ्या (Oral Semaglutide)

ज्यांना सुईची भीती वाटते, त्यांच्यासाठी गोळ्यांच्या स्वरूपात हे औषध उपलब्ध आहे. हे भूक नियंत्रित करण्यास मदत करते. मात्र, हे औषध घेण्याचे नियम कडक आहेत; ते रिकाम्या पोटी घ्यावे लागते आणि त्यानंतर ३० मिनिटे काहीही खाण्यापिण्यास मनाई असते.

७. वजन वाढीचे नियंत्रण आणि शिस्त

कोणतीही औषधे किंवा उपचार घेण्यापूर्वी शरीरातील इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी आणि जळजळ (Inflammation) कमी करण्यावर भर दिला जातो. प्रक्रिया केलेले पदार्थ (Processed Foods) टाळून नैसर्गिक अन्नावर भर दिल्यास औषधांशिवायही चांगले परिणाम मिळू शकतात.

सूचना: ही माहिती केवळ सामान्य संदर्भासाठी आहे. आरोग्यस्थितीनुसार कोणता पर्याय निवडावा, यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.

हे देखील वाचा – 

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात वादळी पावसाचे सावट! 20 ते 22 एप्रिल दरम्यान ‘या’ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

Weather Alert: दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री घामाच्या धारा! भारतात रात्री का होतायत अधिक उष्ण आणि धोकादायक?

Hormuz Strait Crisis: होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय जहाजांवर गोळीबार! भारताने इराणला बजावले; सागरी सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या