Home / News / President Zardari’s State about India–Pak War : पुन्हा भारत – पाक युद्ध होणार ? राष्ट्रपती झरदारींच्या वक्तव्याने खळबळ

President Zardari’s State about India–Pak War : पुन्हा भारत – पाक युद्ध होणार ? राष्ट्रपती झरदारींच्या वक्तव्याने खळबळ

President Zardari’s State about India–Pak War – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना पाकिस्तानचे...

By: Team Navakal
President Zardari’s State about India–Pak War
Social + WhatsApp CTA

President Zardari’s State about India–Pak War – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भारत आणखी एका युद्धाची तयारी करत असल्याचा दावा झरदारी यांनी पाकिस्तानच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनात केला.


आसिफ अली झरदारी म्हणाले की, भारतातील काही नेते पुन्हा युद्धाची भाषा करत असल्यामुळे प्रादेशिक शांततेला धोका निर्माण होऊ शकतो. आयुष्यभर शांततेचा समर्थक असल्याचे सांगत त्यांनी भारताने संघर्षाचा मार्ग न निवडता संवाद आणि वाटाघाटींना प्राधान्य द्यावे. युद्ध हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही. प्रादेशिक स्थैर्यासाठी अर्थपूर्ण चर्चा हाच योग्य मार्ग आहे.


गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना द रेजिस्टन्ट फ्रंट ला जबाबदार धरले होते. या घटनेनंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाई केल्याचा दावा केला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये चार दिवस लष्करी तणाव निर्माण झाला होता. सीमावर्ती भागात ड्रोन हालचाली, सतर्कता आणि सुरक्षा वाढवण्यात आली होती.

झरदारी यांनी भारताच्या सिंधू जल करारासंदर्भातील भूमिकेवरही टीका करत पाण्याचा राजकीय दबावासाठी वापर होत असल्याचा आरोप केला. त्यांनी या निर्णयाला ‘हायड्रो-टेररिझम’ असे संबोधत आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली. झरदारी यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असला तरी त्याच्या सत्यतेबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. मात्र या विधानामुळे भारत-पाक संबंधांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली असून आगामी काळात दोन्ही देशांच्या भूमिकेकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे.


हे देखील वाचा –

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या