Home / महाराष्ट्र / Cyber Crime in Maharashtra: सायबर भामट्यांची मोठी लूट! महाराष्ट्रात दोन वर्षांत ७,५९२ कोटींचा गंडा; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Cyber Crime in Maharashtra: सायबर भामट्यांची मोठी लूट! महाराष्ट्रात दोन वर्षांत ७,५९२ कोटींचा गंडा; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Cyber Crime in Maharashtra: डिजिटल युगात आर्थिक व्यवहार सोपे झाले असले, तरी सायबर भामट्यांनी आता सर्वसामान्यांच्या कष्टाच्या कमाईवर डल्ला मारण्यास...

By: Team Navakal
Cyber Crime in Maharashtra
Social + WhatsApp CTA

Cyber Crime in Maharashtra: डिजिटल युगात आर्थिक व्यवहार सोपे झाले असले, तरी सायबर भामट्यांनी आता सर्वसामान्यांच्या कष्टाच्या कमाईवर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत सायबर गुन्ह्यांचा आलेख प्रचंड उंचावला असून, नागरिकांची तब्बल ७ हजार ५९२ कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विधान परिषदेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही आकडेवारी लेखी स्वरूपात सादर केली.

स्टेट बँकेचे खातेदार सर्वाधिक रडारवर

सरकारी आकडेवारीनुसार, सायबर चोरट्यांनी देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या (SBI) ग्राहकांना सर्वाधिक लक्ष्य केले आहे. २०२४ मध्ये ८४,४३८ गुन्ह्यांची नोंद झाली होती, तर २०२५ मध्ये हा आकडा १ लाख ६ हजार ३१७ पर्यंत पोहोचला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही लूट करण्यासाठी तब्बल २८ लाख ३१ हजार ३२७ ‘म्युल’ (बोगस) बँक खात्यांचा वापर करण्यात आला आहे. केवळ जानेवारी २०२६ या एका महिन्यातच ८ हजार ८१२ तक्रारींच्या माध्यमातून ४१ कोटी ४३ लाख रुपये लुटले गेले आहेत.

लूट मोठी, वसुली मात्र अत्यल्प

सायबर फसवणुकीच्या तक्रारींचा डोंगर वाढत असला तरी, लंपास झालेली रक्कम परत मिळवण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे.

  • २०२४: २ लाख ३२ हजार तक्रारींमधून ४ हजार ५५ कोटी रुपये चोरीला गेले, त्यापैकी केवळ ४४० कोटी रुपये गोठवण्यात यश आले.
  • २०२५: २ लाख ८४ हजार तक्रारींमधून ३ हजार ५३६ कोटींची फसवणूक झाली, ज्यातील ६१७ कोटी रुपये प्रशासनाने गोठवले आहेत. गोठवलेली ही रक्कम मूळ खातेदारांना परत मिळवण्यासाठी अद्याप न्यायालयाच्या कायदेशीर प्रक्रियेची प्रतीक्षा करावी लागत आहे.

सरकारचे ‘सायबर कवच’ आणि सुरक्षा प्रकल्प

वाढत्या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने नवी मुंबईतील महापे येथे ‘महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प’ कार्यान्वित केला आहे. यामध्ये २६ तज्ज्ञ सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली १००० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक सायबर तपासाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

सायबर फसवणूक झाल्यास वेळ न घालवता तातडीने १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच, नागरिक www.cybercrime.gov.in या अधिकृत पोर्टलवर आपली तक्रार नोंदवू शकतात. ‘

हे देखील वाचा – Sukhoi 30 MKI Missing: भारतीय हवाई दलाचे ‘सुखोई ३०’ लढाऊ विमान आसाममध्ये बेपत्ता; रडारशी संपर्क तुटल्याने खळबळ

Web Title:
संबंधित बातम्या