Home / महाराष्ट्र / CJP Protest : ६ जूनचा ‘फ्लॉप शो’ पुण्यातही रिपिट? दिल्लीपाठोपाठ पुण्यातही ‘कॉक्रोच जनता पार्टीच’ आंदोलन पुन्हा आपटलं-नियोजनाचा अभाव की विद्यार्थ्यांचा अविश्वास?

CJP Protest : ६ जूनचा ‘फ्लॉप शो’ पुण्यातही रिपिट? दिल्लीपाठोपाठ पुण्यातही ‘कॉक्रोच जनता पार्टीच’ आंदोलन पुन्हा आपटलं-नियोजनाचा अभाव की विद्यार्थ्यांचा अविश्वास?

CJP Protest : ‘नीट’ (NEET) परीक्षेतील पेपरफुटी आणि निकालातील मोठ्या गोंधळामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे. या पार्श्वभूमीवर,...

By: Team Navakal
Cockroach Janata Party
Social + WhatsApp CTA

CJP Protest : ‘नीट’ (NEET) परीक्षेतील पेपरफुटी आणि निकालातील मोठ्या गोंधळामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात ‘कॉकरोच जनता पार्टी’ने आता महाराष्ट्रातील शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातून आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. या पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी लावून धरत, आज संध्याकाळी ४ वाजता पुण्यात या आंदोलनाची सुरुवात केली.

घोषणापत्र प्रसिद्धी आणि ‘चलो दिल्ली’चा नारा-
अभिजित दीपके हे विद्यार्थ्यांच्या विविध हक्कांचे आणि मागण्यांचे विशेष घोषणापत्र प्रसिद्ध करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासोबतच त्यांनी आगामी २० जून रोजी ‘चलो दिल्ली’ असा आक्रमक नारा दिला आहे. यापूर्वी ६ जून रोजी देखील दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली अशाच एका आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्या आंदोलनाला अपेक्षेप्रमाणे कोणताही मोठा प्रतिसाद मिळाला नव्हता.

भव्य दाव्यांच्या तुलनेत गर्दी अल्प-
दिल्लीतील अपयशानंतर या आंदोलनाची पुढील ठिणगी पुणे शहरात पडेल, असा दावा आयोजकांकडून केला जात होता. परंतु, प्रत्यक्षात पुण्यात सुरू असलेल्या या आंदोलनाची अवस्थाही दिल्लीतील आंदोलनासारखीच झाल्याचे पाहायला मिळत आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दीपके यांनी या आंदोलनाबाबत सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर जितके मोठे आणि भव्य दावे केले होते, त्याच्या निम्म्यापेक्षाही कमी गर्दी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी दिसून आली आहे. साहजिकच, आधीच्या दिल्लीतील आंदोलनाप्रमाणेच पुण्यातील हे आंदोलन देखील अत्यंत कमी लोकसंख्येअभावी आणि नियोजनाच्या अभावामुळे पुरते अपयशी ठरले असून, त्याची हवा सुरुवातीलाच गळाली असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

‘नीट’ परीक्षा घोटाळ्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; मराठा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीवर शांत का?
महाराष्ट्र आणि पर्यायाने भारताच्या राजकीय तसेच सामाजिक इतिहासात अनेकदा अशा आंदोलकांचा जन्म झाला आहे, ज्यांनी आपल्या अभूतपूर्व जनआंदोलनांच्या बळावर थेट प्रस्थापित सरकारांना घाम फोडला आणि संपूर्ण व्यवस्थेचे चित्र रातोरात बदलून टाकले. सद्यस्थितीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे अशाच एका वादळी नेतृत्वाचे उत्तम उदाहरण मानले जातात. मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि मराठा समाजातील तरुण मुला-मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने आक्रमक आवाज उठवणारे नेते म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र, सध्या संपूर्ण देशात गाजत असलेल्या ‘नीट’ (NEET) वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील पेपरफुटी आणि निकालातील महाघोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर, मनोज जरांगे पाटील यांनी बाळगलेल्या मौनामुळे आता सर्वसामान्य मराठा समाजात आणि शैक्षणिक वर्तुळातून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

“नीट परीक्षा देणारी मुलं मराठ्यांची नाहीत का?”
या परीक्षा पद्धतीतील गैरव्यवहारामुळे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न टांगनीला लागले. यात मराठा समाजातील गरीब आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांच्या मुलांची संख्या देखील अत्यंत मोठी आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आजवर प्रत्येक व्यासपीठावरून असे ठाम दावे केले आहेत की, ते मराठा समाजाच्या लेकरांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी आपले आयुष्य पणाला लावून उभे आहेत. याच पार्शवभूमीवर आता मनोज जरांगेवर बोट उचल जात आहे. “या भीषण परीक्षा घोटाळ्याचा फटका बसलेले विद्यार्थी मराठा समाजाचे नाहीत का? मग अशा संवेदनशील आणि विद्यार्थ्यांच्या थेट जिवाशी संबंधित असलेल्या राष्ट्रीय मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील अजूनही गप्प का आहेत?”

आरक्षणाची मागणी एकीकडे सुरू असताना, दुसरीकडे सुरू असलेल्या परीक्षा पद्धतीतील भ्रष्टाचारावर जर समाजनेते मौन बाळगणार असतील, तर या आंदोलनांचे मूळ उद्दिष्ट केवळ राजकीय समीकरणांपुरतेच मर्यादित आहे का, अशी शंकाही आता उपस्थित केली जात आहे. या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आगामी काळात ‘नीट’ परीक्षा घोटाळ्यातील विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून काही ठोस भूमिका मांडणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

‘कॉकरोच जनता पार्टी’च्या अपयशी नियोजनावर चौफेर टीका; आंदोलनाच्या तारखांमधील धरसोड वृत्तीमुळे अभिजित दीपके यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
‘नीट’ (NEET) परीक्षा गैरव्यवहाराच्या विरोधात पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी आणि प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. या आंदोलनाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे हे देखील या आंदोलनाला उपस्थित आहेत. अर्थात स्पष्टच दिसत आहे कि हे आंदोलन ज्यांच्यासाठी सुरु आहे त्यांच्या हातातून जाऊन हे आंदोलन काही नेत्यांच्या हातात आले आहे. या सगळ्यामुळे जमिनीवरील वस्तुस्थिती मात्र अत्यंत विदारक आहे.

नियोजनाचा उथळपणा आणि तारखांमधील गोंधळ
त्यांनी मोठे-मोठे दावे केले असले तरी, सलग दुसरे आंदोलन पुरते आपटल्यामुळे आता अभिजित दीपके यांच्यावर सर्व बाजूंनी आणि चौफेर स्तरांतून कडक शब्दांत टीका केली जात आहे. काहींच्या मते, या पक्षाचे आणि दीपके यांचे एकूणच आंदोलन नियोजन अतिशय उथळ, अपरिपक्व आणि बेभरवशाचे असल्याचे सिद्ध झाले आहे. या निष्काळजीपणाचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे, त्यांनी आपल्या आधीच्या आंदोलनादरम्यान जाहीर घोषणा केली होती की, ते पुढील शनिवारी म्हणजेच १३ जून रोजी आपले पुढचे हक्काचे आंदोलन करतील. मात्र, कोणताही ठोस आणि वैध तर्क न देता त्यांनी ही तारीख बदलून थेट २० जून अशी केली. योग्य नियोजनाचा अभाव असल्यामुळेच ही आंदोलने एकामागून एक सपशेल अपयशी ठरत असल्याची घणाघाती टीका आता सर्वच घटकांकडून केली जात आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या