Home / लेख / Best 125cc Scooters 2026: 80 हजारांच्या बजेटमध्ये ‘या’ आहेत 5 जबरदस्त 125cc स्कूटर; देतात शानदार मायलेज

Best 125cc Scooters 2026: 80 हजारांच्या बजेटमध्ये ‘या’ आहेत 5 जबरदस्त 125cc स्कूटर; देतात शानदार मायलेज

Best 125cc Scooters 2026: गेल्या काही वर्षांत भारतीय बाजारपेठेत १२५cc इंजिन असलेल्या स्कूटरची मागणी प्रचंड वाढली आहे. जर तुम्ही जुन्या...

By: Team Navakal
Best 125cc Scooters 2026
Social + WhatsApp CTA

Best 125cc Scooters 2026: गेल्या काही वर्षांत भारतीय बाजारपेठेत १२५cc इंजिन असलेल्या स्कूटरची मागणी प्रचंड वाढली आहे. जर तुम्ही जुन्या ११०cc स्कूटरवरून अपडेट होण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी सध्या अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. कमी किमतीत अधिक पॉवर आणि दैनंदिन वापरासाठी सोयीस्कर फीचर्स देणाऱ्या काही लोकप्रिय १२५cc स्कूटरची माहिती खालीलप्रमाणे आहे.

१. सुझुकी ॲक्सेस १२५ (Suzuki Access 125)

किंमत ७८,१८४ रुपयांपासून सुरू होणारी ही स्कूटर भारतीय कुटुंबांची पहिली पसंती आहे. याचे इंजिन अत्यंत स्मूथ असून चालवताना खूप संतुलित अनुभव देते. संपूर्ण भारतात सुझुकीचे सर्व्हिस नेटवर्क उत्तम असल्याने मेंटेनन्सची काळजी करावी लागत नाही.

२. टीव्हीएस ज्युपिटर १२५ (TVS Jupiter 125)

७७,००० रुपयांच्या आसपास किंमत असलेली ही स्कूटर प्रामुख्याने दैनंदिन वापरासाठी डिझाइन केली आहे. याची सर्वात मोठी खासियत म्हणजे यातील ‘अंडर-सीट स्टोरेज’, ज्यात तुम्ही हेलमेट किंवा किराणा सामानाची पिशवी सहज ठेवू शकता. जे लोक स्टाईलपेक्षा ‘प्रॅक्टिकल’ फीचर्सना जास्त महत्त्व देतात, त्यांच्यासाठी ही एक उत्तम निवड आहे.

३. हिरो डेस्टिनी १२५ (Hero Destini 125)

७५,८३८ रुपयांपासून सुरू होणारी ही स्कूटर पूर्णपणे फॅमिली युजसाठी बनवली आहे. यामध्ये एक्सटर्नल फ्युएल फिलिंगची सोय आहे, त्यामुळे पेट्रोल भरताना सीट उघडण्याची कसरत करावी लागत नाही. लांबच्या प्रवासासाठी याची सीट अत्यंत आरामदायी आहे.

४. यामाहा फॅसिनो १२५ (Yamaha Fascino 125)

ज्यांना स्कूटरमध्ये ‘रेट्रो’ आणि स्टायलिश लूक हवा आहे, त्यांनी याकडे नक्की पाहावे. ७४,९१० रुपयांपासून सुरू होणारी ही स्कूटर वजनाला खूप हलकी आहे. त्यामुळे दाटीवाटीच्या ट्रॅफिकमध्ये स्कूटर चालवणे आणि हँडल करणे खूप सोपे जाते.

५. यामाहा रेझेडआर १२५ (Yamaha RayZR 125)

७४,३०० रुपयांपासून सुरू होणारी ही या यादीतील सर्वात किफायती स्कूटर आहे. यात यामाहाचा ‘माईल्ड हायब्रिड असिस्ट’ सिस्टिम आहे, जो सुरुवातीला पिकअप वाढवण्यास मदत करतो आणि इंधन बचत करतो. जर तुम्हाला उत्तम परफॉर्मन्स आणि पॉवर हवी असेल, तर हे एक उत्तम मूल्य देणारे मॉडेल आहे.

हे देखील वाचा – US Waiver for Russian Oil: भारताला मोठा दिलासा! रशियाकडून तेल खरेदीसाठी अमेरिकेची 30 दिवसांची विशेष परवानगी

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या