Home / लेख / iPhone 17 Pro Max वर तब्बल 11,500 रुपयांची घसघशीत सूट; भन्नाट ऑफर

iPhone 17 Pro Max वर तब्बल 11,500 रुपयांची घसघशीत सूट; भन्नाट ऑफर

iPhone 17 Pro Max: ॲपलचा सर्वात प्रगत आणि महागडा स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे....

By: Team Navakal
iPhone 17 Pro Max वर तब्बल 11,500 रुपयांची घसघशीत सूट; भन्नाट ऑफर
Social + WhatsApp CTA

iPhone 17 Pro Max: ॲपलचा सर्वात प्रगत आणि महागडा स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. रिलायन्स डिजिटलच्या अधिकृत संकेतस्थळावर या फ्लॅगशिप फोनवर एक भन्नाट ऑफर दिली जात आहे. एरवी थेट किंमत कमी न करणाऱ्या ॲपलच्या या प्रीमियम डिव्हाइसवर सध्या थेट आणि बँक डिस्काउंटचा मोठा फायदा मिळत आहे.

सध्याच्या घडीला इतर कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर या फोनवर थेट अशी किंमत कमी करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा फोन खरेदी करण्यासाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे.

iPhone 17 Pro Max: एकूण ११,५०८ रुपयांची मोठी बचत

हा फोन लाँच झाला तेव्हाची किंमत आणि सध्या रिलायन्स डिजिटलवर मिळणारी सवलत खालीलप्रमाणे आहे:

  • थेट सवलत: या फोनची मूळ लाँचिंग किंमत 1,49,900 रुपये आहे. परंतु, रिलायन्स डिजिटलच्या संकेतस्थळावर हा फोन सध्या 1,44,990 रुपयांना उपलब्ध करण्यात आला आहे, म्हणजेच ग्राहकांना थेट 4,910 रुपयांचा सपाट डिस्काउंट मिळत आहे.
  • बँक कार्ड ऑफर: जर तुमच्याकडे एसबीआयचे क्रेडिट कार्ड असेल, तर तुम्हाला यावर अतिरिक्त 6,598 रुपयांची मोठी सूट मिळेल.
  • प्रभावी किंमत: ही बँक ऑफर लागू केल्यानंतर या फोनची प्रभावी किंमत थेट 1,38,392 रुपयांवर येते. याचा अर्थ ग्राहकांना मूळ किमतीच्या तुलनेत एकूण 11,508 रुपयांचा मोठा फायदा होणार आहे.

एसबीआय व्यतिरिक्त ॲक्सिस बँक आणि आयसीआईसीआय बँकेच्या निवडक कार्ड्सवरही काही ऑफर्स आहेत, परंतु त्यावर मिळणारी सूट वेगळी असू शकते. ही ऑफर कधी संपणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

iPhone 17 Pro Max खरेदी करावा की पुढील मॉडेलची वाट पाहावी?

हा फोन आता खरेदी करावा की काही महिने थांबून पुढील सीरिजची वाट पाहावी, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. सध्याच्या मॉडेलची वैशिष्ट्ये आणि आगामी मॉडेलच्या लीक झालेल्या माहितीवरून तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता:

सध्याच्या मॉडेलचे भन्नाट फीचर्स:

  • मजूद आणि हलकी बॉडी: यात वजनाने हलके असणारे ॲल्युमिनियमचे नवीन डिझाईन आणि मागे बदललेला कॅमेरा सेट मिळतो.
  • दमदार परफॉर्मन्स: यात ॲपलची शक्तिशाली ए19 प्रो चिप असून फोन गरम होऊ नये म्हणून विशेष वेपर चेंबर कूलिंग सिस्टीम दिली आहे.
  • उत्कृष्ट कॅमेरा: मागील बाजूस सर्व कॅमेरे 48 मेगापिक्सलसह येतात, ज्यामुळे फोटोग्राफी अप्रतिम होते.
  • ब्राइट डिस्प्ले: उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसण्यासाठी यावर अँटी-ग्लेअर कोटिंग देण्यात आले आहे.

आगामी iPhone 18 Pro Max मधील संभाव्य बदल

जर तुम्ही आणखी काही महिने थांबू शकत असाल, तर पुढील पिढीच्या मॉडेलमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात. लीक्सनुसार, त्यात स्क्रीनवर छोटी डायनॅमिक आयलंड जागा मिळेल, ज्यामुळे डिस्प्ले अधिक मोठा वाटेल. तसेच, अत्यंत कार्यक्षम अशा 2nm तंत्रज्ञानावर आधारित नवीन ए20 प्रो चिप यात असू शकते.

बॅटरीच्या बाबतीतही मोठा बदल करून थेट 5100mAh ते 5200mAh ची मोठी बॅटरी आणि कॅमेऱ्यात व्हेरिएबल अपर्चर सेन्सर दिला जाण्याची शक्यता आहे, जो कमी प्रकाशात उत्तम फोटो काढेल.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या