Home / राजकीय / Five state Election :देशातील पाच राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले; ४ मेला मतमोजणी! महाराष्ट्रात २३ एप्रिलला पोटनिवडणूक

Five state Election :देशातील पाच राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले; ४ मेला मतमोजणी! महाराष्ट्रात २३ एप्रिलला पोटनिवडणूक

Five state Election : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. पश्चिम...

By: Team Navakal
Five state Election
Social + WhatsApp CTA

Five state Election : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. पश्चिम बंगाल,तामिळनाडू,आसाम,केरळ या चार राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेश पुदुचेरीमध्ये या निवडणुका होत आहेत.

एप्रिल महिन्यात मतदान होऊन सर्व विधानसभांचे निकाल ४ मे रोजी एकाच दिवशी जाहीर होणार आहेत. त्याचबरोबर आठ राज्यांमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातील बारामती व राहुरीत पोटनिवडणुकीचे मतदान २३ एप्रिल रोजी होणार आहे. सर्व निवडणुकांचे निकाल ४ मे रोजी जाहीर होतील. एकूण १७.४ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

आसाम,केरळ आणि पुदुचेरीमध्ये ९ एप्रिल रोजी एका टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पाडली जाईल. तामिळनाडूमध्ये २३ एप्रिल रोजी एका टप्प्यात तर पश्चिम बंगालमध्ये २३ एप्रिल आणि २९ एप्रिल असे दोन टप्प्यांत मतदान होईल. महाराष्ट्रासह ८ राज्यांमधील विधानसभेच्या पोटनिवडणुका ९ आणि २३ एप्रिल रोजी होतील. महाराष्ट्रात बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका २३ एप्रिल रोजी होती. उर्वरित ७ राज्यांमधील पोटनिवडणुका ९ एप्रिल रोजी होणार आहेत.या सर्व निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी ४ मे रोजी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहेत.


निवडणूक आयोगाने आज विधानसभा निवडणुकांची घोषणा केल्यामुळे या पाच राज्यांमध्ये निवडणुकीची आदर्श आचारसंहिता आजपासून लागू झाली आहे. नियमित निवडणुका होत असलेल्या राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ मे आणि जून २०२६ मध्ये संपत आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात निवडणुकांची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन निवडणूक आयोगाने केले आहे.


आसाममध्ये सर्व १२६ जागांसाठी केरळमध्ये १४० जागांसाठी, तामिळनाडूमध्ये २३४ जागांसाठी तर पश्चिम बंगालमध्ये एकूण २९४ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे.पहिल्या टप्प्यात १५२ जागांसाठी तर दुसऱ्या टप्प्यात १४२ जागांसाठी मतदान होईल.

प. बंगालच्या निवडणूक घोषणेआधी ममता बॅनर्जींची मोठी घोषणा

कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याच्या काही तास आधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील पुरोहित आणि मुअज्जिन यांना दिल्या जाणाऱ्या मासिक मानधनात ५०० रुपयांची वाढ करण्यात आली असून आता त्यांना दरमहा २,००० रुपये मानधन मिळणार आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत ही माहिती दिली. त्यांनी म्हटले की, पुरोहित आणि मुअज्जिन समुदाय समाजाच्या आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाला आधार देण्याचे महत्त्वाचे काम करतात. त्यांच्या सेवेला सन्मान देण्यासाठी सरकारने मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मानधन योजनेअंतर्गत पुरोहित आणि मुअज्जिन यांनी सादर केलेले सर्व नवीन अर्जही राज्य सरकारने मंजूर केले असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रत्येक समुदाय आणि परंपरेला समान महत्त्व देणारे वातावरण निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

दरम्यान, भारतीय निवडणूक आयोग पश्चिम बंगालसह तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याच्या काही तास आधीच ही घोषणा करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या