Home / News / Gas policy change : पीएनजी असणाऱ्यांना एलपीजी सिलेंडर नाही

Gas policy change : पीएनजी असणाऱ्यांना एलपीजी सिलेंडर नाही

Gas policy change – देशातील इंधन पुरवठ्यावर वाढता ताण आणि सबसिडीचा गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारने गॅस कनेक्शनच्या नियमांमध्ये मोठे बदल...

By: Team Navakal
Gas policy change
Social + WhatsApp CTA

Gas policy change – देशातील इंधन पुरवठ्यावर वाढता ताण आणि सबसिडीचा गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारने गॅस कनेक्शनच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार ज्या ग्राहकांच्या घरी पाईपलाईनद्वारे गॅस ( Piped Natural Gas) पुरवठा होतो, त्यांना घरगुती एलपीजी सिलेंडर ( LPG connection) वापरता येणार नाही.

सुधारित मार्गदर्शक(guidelines ) तत्त्वांनुसार एका घरात पीएनजी आणि एलपीजी अशा दोन्ही सुविधा ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. ज्या ग्राहकांकडे आधीपासूनच पीएनजी कनेक्शन आहे, त्यांना त्यांचे एलपीजी सिलेंडर तात्काळ परत करावे लागणार आहे.

इतकेच नाही तर अशा ग्राहकांना आता नवीन सिलेंडरचे रिफिल बुकिंग (cylinder refill booking) देखील करता येणार नाही. भविष्यातही पीएनजी वापरकर्त्यांना नवीन एलपीजी कनेक्शन घेता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.तसेच अशा ग्राहकांना आता नवीन सिलेंडरचे रिफिल बुकिंग करता येणार नाही. भविष्यातही पीएनजी वापरकर्त्यांना नवीन एलपीजी कनेक्शन घेण्याची परवानगी दिली जाणार नाही.ज्या घरांमध्ये पाईप गॅसची सुविधा उपलब्ध आहे त्यांनी एलपीजी सिलेंडरचा वापर थांबवावान असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

सरकारने यापूर्वी पुरवठ्याबाबत ९ दिवसांत ३ वेळा नवीन नियम जारी केले आहेत.गेल्या काही दिवसांत गॅस पुरवठ्याबाबत सरकारकडून टप्प्याटप्प्याने काही नियम जारी करण्यात आले आहेत. ६ मार्च रोजी घरगुती एलपीजी बुकिंगसाठी (cylinder booking gap)लॉक-इन कालावधी २१ दिवसांचा करण्यात आला. त्यानंतर ९ मार्च रोजी शहरांमध्ये वाढत्या मागणीमुळे हा कालावधी २५ दिवसांपर्यंत वाढविण्यात आला. तर १२ मार्च रोजी ग्रामीण भागात सिलेंडर बुक करण्यामधील अंतर ४५ दिवसांचे करण्यात आले.


हे देखील वाचा –

 महापौर तावडें पुन्हा वादात; गाडीवर लाल दिवा; विरोधकांचा हल्लाबोल

नवाकाळचे अचूक विश्लेषण; इराण-इस्रायल संघर्षाचा महाराष्ट्राला फटका; LPG-इंडक्शननंतर पीएनजीवरही येणार ताण? पुढचे संकट पाईप गॅसचे?

१३ वर्षे कोमात असलेल्या हरीश राणा एम्समध्ये दाखल ; इच्छामृत्यू प्रक्रियेची सुरुवात ; व्हिडिओ व्हायरल

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या