Netanyahu AI video death rumors response : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा इराणच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून त्यांचे अलीकडचे व्हिडिओ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तयार करण्यात आले आहेत, अशा चर्चांनी सोशल मीडियावर वादळ उठवले होते.
या सर्व अफवा आणि कटाच्या सिद्धांतांना प्रत्युत्तर देण्यासाठी नेतन्याहू यांनी एका कॅफेमध्ये कॉफी पितानाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूच्या बातम्यांची थट्टा उडवली आहे.
Netanyahu Viral Video: मृत्यूच्या अफवा आणि नेतन्याहूंचे प्रत्युत्तर
सोशल मीडियावर असा दावा केला जात होता की, नेतन्याहू आता हयात नाहीत आणि त्यांचे भाषण एआय तंत्रज्ञानाने तयार केलेले आहे. यावर उत्तर देताना नेतन्याहू यांनी ‘एक्स’वर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ते कॉफीची ऑर्डर देताना दिसत आहेत. ए
का हिब्रू वाक्प्रचाराचा वापर करत त्यांनी मिश्किलपणे म्हटले की, “मी तर कॉफीसाठी मरतो” (मला कॉफी प्रचंड आवडते). तसेच “मी माझ्या राष्ट्रावर जीवापाड प्रेम करतो,” असे म्हणत त्यांनी देशवासियांचे कौतुक केले.
אומרים שאני מה? צפו >> pic.twitter.com/ijHPkM3ZHZ
— Benjamin Netanyahu – בנימין נתניהו (@netanyahu) March 15, 2026
Netanyahu Viral Video: सहा बोटांचा तो ‘एआय’ दावा आणि वास्तव
काही दिवसांपूर्वी नेतन्याहू यांच्या एका व्हिडिओमध्ये त्यांच्या एका हाताला सहा बोटे दिसत असल्याचा दावा करत तो व्हिडिओ बनावट असल्याचे म्हटले गेले होते. या नवीन व्हिडिओमध्ये नेतन्याहू यांनी मुद्दाम आपले दोन्ही हात कॅमेऱ्यासमोर धरले आणि आपल्याला दहाच बोटे असल्याचे दाखवून त्या अफवेची खिल्ली उडवली.
इस्रायली पंतप्रधान कार्यालयानेही स्पष्ट केले की, या सर्व बातम्या धादांत खोट्या असून पंतप्रधान पूर्णपणे सुरक्षित आहेत.
Netanyahu Viral Video: इराणची धमकी आणि नवीन संशय
दरम्यान, इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने एक पोस्ट शेअर करून नेतन्याहू यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. “जर नेतन्याहू अजूनही जिवंत असतील, तर आमचे सैन्य त्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा करेल,” असे त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दुसरीकडे, नेतन्याहू यांचा हा नवीन व्हिडिओ देखील वादाच्या भोऱ्यात सापडला आहे. उत्तर कोरियाच्या टीव्हीने हा व्हिडिओ प्रगत एआय तंत्रज्ञानाने बनवलेला असल्याचा दावा केला आहे.
‘ग्रोक’ या चॅटबॉटने देखील हा व्हिडिओ डीपफेक असल्याचे म्हटले आहे. काही सोशल मीडिया युजर्सनी व्हिडिओमधील विसंगतींवर बोट ठेवले आहे, जसे की कपातील कॉफीची हालचाल आणि मागे असलेल्या ग्राहकाचा मास्क. यामुळे नेतन्याहू खरंच समोर आले आहेत की हे तंत्रज्ञानाचे यश आहे, याबाबत जागतिक स्तरावर चर्चा सुरू आहे.









