Home / लेख / फक्त 5.80 लाखांत Hyundai ची शानदार SUV! नवीन ‘Exter’ लाँच; पाहा फीचर्स

फक्त 5.80 लाखांत Hyundai ची शानदार SUV! नवीन ‘Exter’ लाँच; पाहा फीचर्स

Hyundai Exter price and features : भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी ह्युंदाई मोटर इंडियाने आपली बहुप्रतिक्षित कॉम्पॅक्ट SUV...

By: Team Navakal
Hyundai Exter price and features
Social + WhatsApp CTA

Hyundai Exter price and features : भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी ह्युंदाई मोटर इंडियाने आपली बहुप्रतिक्षित कॉम्पॅक्ट SUV ‘एक्सटर’ (Exter) चे 2026 मॉडेल लाँच केले आहे.

या नवीन कारमध्ये कंपनीने डिझाइन, तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेच्या बाबतीत तब्बल 25 महत्त्वाचे बदल केले आहेत. थेट टाटा पंचशी स्पर्धा करणाऱ्या या कारने आपल्या प्रीमियम लुक आणि प्रगत फीचर्समुळे ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

किंमत आणि व्हेरियंट्स

नवीन एक्सटर पेट्रोल मॅन्युअल, ऑटोमॅटिक (AMT) आणि सीएनजी अशा तिन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत खालीलप्रमाणे आहे:

  • पेट्रोल मॅन्युअल: 5,79,900 रुपयांपासून सुरू (HX 2 व्हेरियंट) ते 8,35,900 रुपयांपर्यंत.
  • ऑटोमॅटिक (AMT): 6,90,900 रुपयांपासून सुरू (HX 3 व्हेरियंट) ते 9,41,900 रुपयांपर्यंत.
  • CNG व्हेरियंट: 6,99,900 रुपयांपासून सुरू (HX 2 व्हेरियंट) ते 9,40,900 रुपयांपर्यंत.

बाह्य आणि अंतर्गत बदल (Exterior & Interior)

ह्युंदाईने या कारला अधिक ‘बोल्ड’ आणि ‘स्पोर्टी’ लूक दिला आहे. कारच्या पुढच्या भागात नवीन ग्रिल, अपडेटेड बंपर आणि नवीन डायमंड कट अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. पाठीमागच्या बाजूला नवीन टेलगेट डिझाइन आणि स्पॉयलरमुळे ही कार अधिक आकर्षक दिसते.

इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये नेव्ही आणि ग्रे रंगाचे ड्युअल टोन फिनिश पाहायला मिळते. डॅशबोर्डला 3D कार्बन पॅटर्न देण्यात आला असून चालकासाठी आरामदायी आर्मरेस्ट आणि स्पोर्टी स्टिअरिंग व्हीलची सोय आहे. या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच मेटल पॅडल्सचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे कारला प्रीमियम टच मिळाला आहे.

सुरक्षा आणि इंजिन क्षमता

सुरक्षेच्या बाबतीत ह्युंदाईने कोणतीही तडजोड केलेली नाही. या कारमध्ये एकूण 45 सुरक्षा फीचर्स असून त्यापैकी 30 फीचर्स हे बेस व्हेरियंटपासूनच (Standard) उपलब्ध आहेत.

  1. एअरबॅग्स: सर्व व्हेरियंटमध्ये 6 एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत.
  2. तंत्रज्ञान: इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि हिल स्टार्ट असिस्ट यांसारखे प्रगत फीचर्स यात मिळतात.
  3. इंजिन: कारमध्ये 1.2 लिटरचे कप्पा पेट्रोल इंजिन आहे. आपल्या सेगमेंटमधील ही एकमेव कार आहे ज्यामध्ये ‘फोर सिलेंडर’ इंजिन मिळते, ज्यामुळे प्रवास अधिक शांत आणि स्मूद होतो.

विशेष म्हणजे, सीएनजी प्रेमींसाठी यामध्ये ड्युअल सिलेंडर सेटअप देण्यात आला आहे, ज्यामुळे डिकीमध्ये (Boot Space) चांगली जागा उपलब्ध होते. 2023 मध्ये लाँच झाल्यापासून आतापर्यंत या कारच्या 2 लाख युनिट्सची विक्री झाली असून, या नवीन बदलांमुळे एक्सटरची लोकप्रियता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा –  US F-35 Shot Down: अमेरिकेचे ‘ब्रह्मास्त्र’ निकामी? इराणने जगातील सर्वात प्रगत स्टेल्थ फायटर जेट कसे पाडले?

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या