Home / मनोरंजन / Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉसच्या’ घरातून ‘हा’ सदस्य घेणार एक्सिट

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉसच्या’ घरातून ‘हा’ सदस्य घेणार एक्सिट

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वातील उत्कंठावर्धक वळणावर या आठवड्याचा भाऊचा धक्का पार पडणार आहे. आणि...

By: Team Navakal
Bigg Boss Marathi 6 :
Social + WhatsApp CTA

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वातील उत्कंठावर्धक वळणावर या आठवड्याचा भाऊचा धक्का पार पडणार आहे. आणि घरातील एका सदस्याला निरोप देण्याची वेळ देखील येणार आहे. या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी संस्कृती साळुंखे, रेवा कौरासे, दीपाली सय्यद, सागर कारंडे, विशाल कोटियन, प्रभू शेळके आणि राकेश बापट हे सात सदस्य नामांकित (Nominated) झाले होते. मात्र, प्रेक्षकांच्या कमी कौलामुळे वाइल्ड कार्डद्वारे घरात प्रवेश केलेल्या संस्कृती साळुंखे ऊर्फ ‘ससा’ हिला या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले अश्या पोस्ट सध्या जोरदार वायरल होत आहे.

संस्कृती साळुंखे हिने वाइल्ड कार्ड सदस्य म्हणून घरात मोठ्या थाटात प्रवेश केला होता. तिला सुरुवातीलाच काही विशेष अधिकार देण्यात आले होते, परंतु दुर्दैवाने पहिल्याच दिवशी तिने मिळालेली ‘पॉवर’ गमावली. तिला मिळालेली थेट कॅप्टन्सीची उमेदवारी रद्द करण्यात आली आणि त्यासोबतच ‘व्हीव्हीआयपी गेस्ट’ म्हणून मिळणारी सुवर्णसंधीही तिच्या हातातून निसटली होती. घरात आल्यापासूनच तिची इतर सदस्यांशी, विशेषतः अनुश्री आणि प्रभू यांच्याशी झालेली वादावादी जास्त लक्षवेधी ठरली. तिच्या एव्हिक्षनच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरु आहेत.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या