Home / महाराष्ट्र / Chhagan Bhujbal on Ashok Kharat : अशोक खरात प्रकरण: रुपाली चाकणकर यांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; प्रदेशाध्यक्षपदावर टांगती तलवार आणि विरोधकांची घणाघाती टीका

Chhagan Bhujbal on Ashok Kharat : अशोक खरात प्रकरण: रुपाली चाकणकर यांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; प्रदेशाध्यक्षपदावर टांगती तलवार आणि विरोधकांची घणाघाती टीका

Chhagan Bhujbal on Ashok Kharat : नाशिकमधील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या कथित संबंधांमुळे राज्याच्या राजकारणात निर्माण झालेले वादळ...

By: Team Navakal
Chhagan Bhujbal on Ashok Kharat
Social + WhatsApp CTA

Chhagan Bhujbal on Ashok Kharat : नाशिकमधील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या कथित संबंधांमुळे राज्याच्या राजकारणात निर्माण झालेले वादळ शमण्याचे नाव घेत नाहीये. या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. खरात याच्या संस्थेवर सदस्य म्हणून कार्यरत असणे आणि त्याच्याशी असलेले कौटुंबिक स्नेहसंबंध चाकणकर यांच्या पदाला बाधक ठरले आहेत. विरोधकांनी लावून धरलेली मागणी आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, या हेतूने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चाकणकर यांचा राजीनामा स्वीकारून तो पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

या राजीनाम्यानंतर आता रुपाली चाकणकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षपदही जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यासंदर्भात विचारले असता राज्याचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सूचक विधान केले आहे. “महिला आयोगाचे पद हे एक घटनात्मक पद होते, ज्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी चर्चा करून निर्णय घेतला आहे. मात्र, पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार या सखोल चौकशीनंतरच घेतील,” असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. तसेच, ज्या महिलांवर अन्याय झाला आहे त्यांनी न घाबरता तक्रार करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दुसरीकडे, रुपाली चाकणकर यांनी राजीनामा देताना घेतलेल्या भूमिकेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. राजीनामा सादर करतानाचा फोटो पाहिल्यास त्यात कुठेही खेद किंवा विनम्रता दिसत नव्हती, उलट चाकणकर एखाद्या मॉडेलप्रमाणे ‘पोझ’ देत उभ्या होत्या, अशी जळजळीत टीका दमानिया यांनी केली आहे. चाकणकर यांच्या बोलण्यातील अहंकार पाहता त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या प्रकरणातील पेच केवळ राजीनाम्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत रुपाली चाकणकर यांना या प्रकरणात ‘सहआरोपी’ करण्याची मागणी केली आहे. खरातच्या गैरकृत्यांची माहिती असूनही त्या गप्प होत्या का, याची चौकशी व्हावी असा त्यांचा दावा आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या