Home / महाराष्ट्र / Mahila Aayog Chairperson : चाकणकरांनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? रोहित पवारांनी सुचवली ‘ही’ 4 नावे

Mahila Aayog Chairperson : चाकणकरांनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? रोहित पवारांनी सुचवली ‘ही’ 4 नावे

Mahila Aayog Chairperson : नाशिकच्या अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा त्याग करावा लागला आहे. चाकणकर...

By: Team Navakal
Mahila Aayog Chairperson
Social + WhatsApp CTA

Mahila Aayog Chairperson : नाशिकच्या अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा त्याग करावा लागला आहे. चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर आता या रिक्त पदावर कोणाची नियुक्ती होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी एक महत्त्वाची सोशल मीडिया पोस्ट शेअर करत या पदासाठी ४ संभाव्य नावे सुचवली आहेत.

राजकीय व्यक्ती नकोच: रोहित पवारांची ठाम भूमिका

रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर केवळ ‘चमकोगिरी’ करणाऱ्या राजकीय व्यक्तीची नियुक्ती केल्याने पीडित महिलांना न्याय मिळत नाही. त्याऐवजी ज्यांना कायद्याचे सखोल ज्ञान आहे आणि ज्यांनी सामाजिक क्षेत्रात मोठे काम केले आहे, अशा निष्पक्ष आणि निर्भिड व्यक्तींची या पदावर वर्णी लागणे गरजेचे आहे.

रोहित पवारांनी सुचवलेली ४ नावे:

  1. मीरा बोरवणकर: निवृत्त आयपीएस (IPS) अधिकारी. आपल्या कडक शिस्तीसाठी आणि निर्भिड कारकीर्दीसाठी त्या ओळखल्या जातात.
  2. अ‍ॅड. वर्षा देशपांडे: सामाजिक कार्यकर्त्या. महिलांच्या हक्कासाठी त्यांनी न्यायालयीन आणि सामाजिक स्तरावर मोठे लढे दिले आहेत.
  3. मनिषा गुप्ते: ‘मासूम’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महिलांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी मोठे कार्य केले आहे.
  4. मेधा गाडगीळ: निवृत्त आयएएस (IAS) अधिकारी. प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

सुनेत्रा पवारांकडे साकडे

रोहित पवार यांनी ही नावे सुचवताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख ‘सुनेत्राकाकी’ असा केला आहे. “हा निर्णय सर्वस्वी सुनेत्राकाकींना घ्यायचा असून, त्या राज्यातील महिलांच्या हितासाठी योग्य आणि अराजकीय व्यक्तीची निवड करतील, अशी मला खात्री आहे,” असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

राज्य महिला आयोगाची प्रतिमा सुधारण्यासाठी आणि पीडित महिलांना खऱ्या अर्थाने आधार देण्यासाठी राजकीय पुनर्वसन करण्यापेक्षा गुणवत्तेला प्राधान्य द्यावे, असा सूर या निमित्ताने उमटत आहे. आता महायुती सरकार या नावांचा विचार करणार की पुन्हा एखाद्या राजकीय चेहऱ्याला संधी देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हे देखील वाचा – Commercial LPG Update: व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; हॉटेल आणि उद्योगांसाठी 20 टक्के अतिरिक्त कोटा जाहीर

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या