Home / देश-विदेश / US-Israeli war on Iran : आमची तेल केंद्र नष्ट केली तर याद राखा ! इराणच्या धमकीनंतर ट्रम्पची 5 दिवस हल्लेबंदीची घोषणा

US-Israeli war on Iran : आमची तेल केंद्र नष्ट केली तर याद राखा ! इराणच्या धमकीनंतर ट्रम्पची 5 दिवस हल्लेबंदीची घोषणा

US-Israeli war on Iran : अमेरिकेने होर्मुज मार्ग उघड करण्यासाठी इराणला 48 तासांची मुदत दिली होती. ही मुदत संपत आली...

By: Team Navakal
donald trump j
Social + WhatsApp CTA

US-Israeli war on Iran : अमेरिकेने होर्मुज मार्ग उघड करण्यासाठी इराणला 48 तासांची मुदत दिली होती. ही मुदत संपत आली आहे. मात्र या अल्टिमेटनंतरही इराणने नमते घेण्यास साफ नकार दिला. उलट अमेरिकेलाच धमकी दिली. 48 तासांत होर्मुज सामुद्रधुनी उघड केली नाही, तर आम्ही तुमची सर्व ऊर्जा केंद्रे नष्ट करून तुम्हाला नेस्तनाबूत करून टाकू, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल दिली होती. ती 48 तासांची मुदत संपत असल्याने  जगाचे लक्ष इराणच्या निर्णयाकडे लागलेले होते. इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डने (आयआरजीसी) त्यावर निवेदन जारी केले. त्यात त्यांनी अमेरिकेवर जबरदस्त पलटवार केला. इराणने इशारा दिला की, तुम्ही आमच्यावर हल्ला केला तर आमची सर्व ऊर्जा केंद्र पुन्हा बांधून पूर्ण होईपर्यंत होर्मुजचा जलमार्ग बंद ठेवू, अशी धमकी दिली. इराणच्या या आक्रमक भूमिकेसमोर काहीसे नरमाईचे धोरण स्वीकारत ट्रम्प यांनी 5 दिवस इराणच्या ऊर्जा केंद्रांवर हल्ले करणार नसल्याचे जाहीर केले.


आज इराणने तेल अविववर हल्ला केला.इस्त्रायलच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. इस्त्रायलनेही अराद शहरावर हल्ला केला. बैरूत येथील हिजबुल्लाच्या केंद्रांवर हल्ला केला. युध्दामुळे स्वयंपाकाचा गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने सर्वसामान्यांचे अतोनात हाल होत आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा मागणीच्या निम्म्याने पुरवठा होत असल्याने मुंबईसारख्या महानगरात सामान्यांसाठी आधार ठरणार्‍या रस्त्यांवरील खाद्यपदार्थांच्या टपर्‍या बंद झाल्या आहेत. गावापर्यंत ही झळ पोहोचली आहे. ग्रामीण भागात काही पदार्थ कमी करून चुलींवर स्वयंपाक सुरू आहे. शहरात मात्र चूल पेटवता येत नसल्याने मोठी हॉटेलेसुध्दा अखेरच्या घटका मोजत आहेत. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्याने महागाई वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत युध्द लांबले तर अख्ख्या जगात महागाईचा आगडोंब उसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आणखी दोन जहाजे
होर्मुजमधून भारताकडे रवाना

शारजा – आखातात अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे होर्मुज सामुद्रधुनीतून तेल व वायू वाहतूक अडथळ्यांत सापडली आहे. मात्र भारतीय ध्वज असेल्या ‘पाईन गॅस’ आणि ‘जग वसंत’ ही दोन एलपीजी जहाजे या मार्गातून पुढील  प्रवासाठी रवाना झाली आहेत. ‘पाईन गॅस’ आणि ‘जग वसंत’ ही भारतीय एलपीजी टँकर जहाजे सध्या संयुक्त अरब अमिरातीतील शारजाजवळ तैनात आहेत. जहाज-ट्रॅकिंग संकेतस्थळावरील माहितीनुसार, ही दोन्ही जहाजे प्रवासासाठी असल्याचे संकेत आहेत. भारत सरकारने या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून, आपल्या जहाजांच्या सुरक्षिततेबाबत सावध भूमिका घेतली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, आखातात असलेल्या भारताच्या सुमारे 22 जहाजांच्या सुरक्षित हालचालींसाठी सरकार कटिबद्ध आहे. तसेच या जहाजांच्या सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. यापूर्वी 17 मार्च आणि 18 मार्च रोजी भारतात तीन जहाजे होर्मुज सामुद्रधुनी पार करून आली आहेत. यामध्ये शिवालिक, नंदा देवी आणि जग लाकडी या जहाजांचा समावेश आहे.

जहाजांवर 18 कोटी
रुपये टोल

काही जहाजांवर इराण होर्मुज पार करण्यासाठी 18 कोटी रुपये टोल वसूल करणार. इराणच्या एका मंत्र्याने या वृत्ताला दुजारो दिला आहे. कारण युध्दासाठी पैसा लागतो. म्हणून आम्ही होर्मुजमधून जाणार्‍या काही जहाजांकडून 18 कोटी रुपये टोल वसूल करणार आहोत, असे अलाईद्दीन बोरौजेरडी यांनी सांगितले. या निर्णयामुळे होर्मुजवर इराणचे नियंत्रण आहे, हे सिध्द होते, असा दावाही बोरौजेरडी यांनी केला.

काश्मिरी नागरिकांची इराणला मदत
इस्रायल आणि अमेरिकेचा पूर्ण ताकदीने सामना करणार्‍या इराणबद्दल काश्मिरी लोकांनी सहानुभूती दर्शवली आहे. बडगाम जिल्ह्यात स्थानिकांनी स्वेच्छेने पुढे येत इराण मदत निधीसाठी रोख रक्कम, दागदागिने दान केले आहेत. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बडगामचे आमदार मुंताझीर मेहदी यांनीदेखील इराणला पाठिंबा दर्शविला असून, आपले एक महिन्याचे मानधन मदत निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताचे आभार मानले
इराणच्या भारतातील दूतावासाकडून काश्मिरी लोकांनी केलेल्या मदतीसाठी भारताचे आभार मानले आहेत. तुम्ही दाखवलेला दयाळूपणा आणि माणुसकी आम्ही कधीही विसरणार नाही. या कठीण परिस्थितीत केलेल्या मदतीबद्दल इराण तुमचा सदैव ऋणी राहील, असे इराणीच्या दूतावासाने संदेशात म्हटले आहे. काश्मीरमधील एका विधवा महिलेने 28 वर्षांपूर्वी निधन झालेल्या आपल्या पतीची आठवण म्हणून जतन करून ठेवलेले सोने इराण मदत निधीमध्ये दान केले. त्याचीही विशेष दखल इराणच्या दुतावासाने घेतली. तुम्ही इराणी लोकांप्रती दाखवलेले प्रेम इराणी जनतेला धैर्य देणारे आहे.

क्षेपणास्त्रावर स्पेनच्या पंतप्रधानांचा फोटो
इराणने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये इराणचा एक सैनिक इस्रायलवर मारा करण्यासाठी सज्ज करण्यात आलेल्या क्षेपणास्त्रावर एक स्टीकर चिकटवताना दिसत आहे. या स्टीकरवर स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सान्चेझ यांचे छायाचित्र आहे.तर बाजूच्या चौकटीत सान्चेझ यांचे आभार मानणारा संदेश आहे.थँक यू स्पेन पीएम, हे युध्द नुसते बेकायदेशीरच नव्हे तर मानवताविरोधी आहे, असे या संदेशात म्हटले आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या