Home / महाराष्ट्र / Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार; ‘या’ तारखेपासून ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प सुरू होण्याची शक्यता

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार; ‘या’ तारखेपासून ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प सुरू होण्याची शक्यता

Mumbai Pune Expressway Missing Link 2026 : मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील अंतर आता अधिक जवळ येणार आहे. महाराष्ट्र...

By: Team Navakal
Mumbai Pune Expressway Missing Link 2026
Social + WhatsApp CTA

Mumbai Pune Expressway Missing Link 2026 : मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील अंतर आता अधिक जवळ येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा (MSRDC) महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला करण्याची तयारी सुरू आहे. या नवीन मार्गामुळे प्रवाशांचा तब्बल २५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

डोंगररांगांना जोडणारा आधुनिक पूल

या प्रकल्पाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे दोन सह्याद्रीच्या डोंगररांगांना जोडणारा देशातील सर्वात उंच केबल-स्टेड पूल. तब्बल १८२ मीटर उंचीवर बांधण्यात आलेल्या या पुलाचे काम ९९.९ टक्के पूर्ण झाले आहे. अफकॉन्स या कंपनीने या आव्हानात्मक पुलाची निर्मिती केली असून, सध्या केवळ किरकोळ फिनिशिंगचे काम सुरू आहे. या पुलामुळे वाहनांना आता घाटातील वळणावळणाच्या रस्त्यांऐवजी थेट डोंगर कापून तयार केलेल्या सरळ मार्गावरून जाता येईल.

प्रवासाचे अंतर ६ किमीने होणार कमी

सध्या खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूट हे अंतर १९ किलोमीटर आहे. नवीन ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे हे अंतर केवळ १३.३ किलोमीटर इतकेच राहणार आहे. म्हणजेच प्रवाशांच्या एकूण प्रवासात ६ किलोमीटरची कपात होणार आहे.

  • बोगद्यांची लांबी: या पूर्ण १३.३३ किमी प्रकल्पात ११ किमी लांबीचे दोन अवाढव्य बोगदे आहेत.
  • केबल ब्रिज: अंदाजे २ किमी लांबीचे दोन केबल ब्रिज यामध्ये समाविष्ट आहेत, जे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत प्रगत आहेत.

निसर्गाच्या आव्हानावर मात

या पुलाचे बांधकाम पूर्ण करणे सोपे नव्हते. दुर्गम भाग, सोसाट्याचा वारा, दाट धुके आणि पावसाळ्यातील मुसळधार पाऊस यामुळे कामात अनेक अडथळे आले. यामुळेच मार्च २०२४ ची मुदत उलटून आता २०२५ मध्ये हे काम पूर्णत्वास जात आहे. खराब हवामानामुळे कामात अनेकदा खंड पडला, तरीही इंजिनिअर्सनी हे आव्हान यशस्वीपणे पेलले आहे.

आता १ मे पासून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यावर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होण्यास मोठी मदत होईल.

Web Title:
संबंधित बातम्या